Home Blog Page 1174

मराठी सिनेसृष्टीत परिवर्तन घडवण्यासाठी तेजस्विनी पंडित सज्ज!


साजिद नाडियाडवालासोबत हातमिळवणी

मराठी सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनी पंडित हिने आपल्या सर्वोत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. विविधांगी भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अभिनयासोबतच निर्मित क्षेत्रातही प्रवेश केला आणि आता तेजस्विनी लवकरच आपल्यासमोर भव्यदिव्य कलाकृती घेऊन येणार आहेत. यासाठी तिने बॉलिवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणाऱ्या साजिद नाडियाडवाला एंटरटेनमेंटसोबत हातमिळवणी केली आहे. नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेंनमेंट, जोफिएल एंटरप्राईज प्रस्तुत, वर्धा नाडियाडवाला, सह्याद्री फिल्म्स यांच्या नेतृत्वाखाली हे चित्रपट प्रदर्शित होणार असून या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीत एक परिवर्तन घडवून आणण्याचा हा प्रयत्न असणार आहे.

मराठी चित्रपटातील काही निकष बाजूला ठेवून, मराठी कथानकाच्या कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे. या भागीदारीचा मुख्य हेतू म्हणजे पडद्यावर आपल्या भव्य संस्कृतीचे आणि ऐतिहासिक साहित्याचे प्रतिबिंब दाखवणे हा आहे. हृदयाचा ठाव घेणाऱ्या कथा, श्वास रोखून ठेवणारी दृश्ये आणि इतरांपेक्षा वेगळा आशय दाखवण्यासाठी ही टीम सज्ज झाली असून प्रेक्षकांना एक अविस्मरणीय अनुभव या चित्रपटांच्या माध्यमातून मिळणार आहे, हे नक्की!

आपला आनंद व्यक्त करताना निर्मात्या वर्धा नाडियाडवाला म्हणतात, ” मराठी चित्रपटांसाठी सह्याद्री फिल्मसोबत भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे या भूमीशी, संस्कृतीशी आणि भाषेशी विशेष नाते आहे. हे आमचे घर आहे. त्यामुळे हे चित्रपट माझ्यासाठी खूप खास असतील. यात आम्हाला तेजस्विनीची साथ लाभली आहे. तेजस्विनी एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे तिचा दृष्टिकोन खूपच वेगळा असणार, याची आम्हाला जाणीव असून मराठी चित्रपटाबद्दलच्या अंतर्दृष्टीवर आमचा विश्वास आहे. म्हणूनच तिच्या सहकार्याने प्रभावी कथा सादर करण्याचे उद्दिष्ट आहे. तेजस्विनीसोबत आम्ही आमच्या या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. तिच्यासोबत आम्ही प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो आणि यासाठी आम्हाला प्रेक्षकांचे प्रेम आणि सहकार्य गरजेचे आहे.”

या भागीदारीबद्दल तेजस्विनी पंडित म्हणते, ” ही भागीदारी खरोखरच अपवादात्मक आहे. माझ्यासाठी आणि माझ्या संपूर्ण टीमसाठी हा एक सन्मान आहे. ऐतिहासिकदृष्ट्या मराठी चित्रपट हे प्रतिभावान कलाकार आणि निर्मितीसाठी ओळखले जातात. ज्यांनी आजवर प्रेक्षकांना अनेक अविस्मरणीय आशय दिले आहेत. परंतु मराठी चित्रपटांमध्ये भव्यतेचा आणि वितरणाचा अभाव अनेकदा दिसतो. आता प्रतिष्ठित निर्माते साजिद नाडियाडवाला आणि वर्धा नाडियाडवाला यांच्यासोबत एकत्र येऊन आम्ही हे चित्र बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही भागीदारी ‘गेम चेन्जर’ ठरणारी असेल. जी प्रेक्षकांना मोठ्या सिनेमॅटिक प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी एक विशाल कॅनव्हास देईल. या सहकार्याबद्दल आम्हाला अत्यंत आनंद आहे आणि आमची ही असाधारण कलाकृती प्रेक्षकांसमोर सादर करण्यासाठी आम्हीही खूप उत्सुक आहोत. ”

मजेशीर रहस्ये दडलेला ‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’चा टिझर प्रदर्शित

‘अलीबाबा आणि ‘चाळीशी’तले चोर’ या नावातच आपल्याला कळतेय की, हा चित्रपट ‘चाळीशी’भोवती फिरणारा आहे. मात्र यात काही रम्य रहस्ये दडलेली आहेत. काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये लिपस्टिकचे एक निशाण दिसत होते. या निशाणाबाबत तर्कवितर्क काढत असतानाच आता या चित्रपटाचा जबरदस्त टिझर प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये चाळिशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जातेय आणि अचानक कसलातरी आवाज ऐकू येतोय. लिपस्टिकचे निशाण, संशयास्पद आवाज, त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहाता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की! सध्यातरी चाळीशीतील या चोरांबद्दलचे हे गूढ अधिकच वाढत आहे, मात्र ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना २९ मार्चपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृद् गंध फिल्म्स एल. एल. पी निर्मित या चित्रपटाचे आदित्य इंगळे दिग्दर्शक असून या धमाल चित्रपटात मुक्ता बर्वे, सुबोध भावे, श्रुती मराठे, उमेश कामत, आनंद इंगळे, मधुरा वेलणकर आणि अतुल परचुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विवेक बेळे लिखित या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, वैशाली विराज लोंढे, निखिल वराडकर आणि संदीप देशपांडे निर्माते आहेत.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात, ”हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे. परंतु चाळीशीनंतरच जगण्याची खरी मजा सुरु होते. हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही. त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते. चाळीशीतील हीच भावना या चित्रपटात मजेशीररित्या दाखवण्यात आली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल. विशेषतः चाळीशीतील प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल.”

अण्णा बास की आता,पदांची खिरापत ओरबडणार तरी किती?

की खासदार होऊन पीएम बी व्हायचंय? ठराविक लोकांचीच भरती करायचीय काय?

दिल्लीत गणितं..पुण्यात फलकं

फडणवीस साहेब ही पतंग बाजी नव्हे

पुणे: पुण्यातील भाजपा मध्ये महापालिकेत सलग 5 वर्षे पदाधिकारी पद भोगल्यावर आता पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागणार्‍या माजी महापौर यांना पक्षांतर्गत प्रचंडच विरोध होताना दिसत असून आज महापालिकेच्या बाहेर यासंदर्भात लागलेला एक फ्लेक्स पालिकेने काढून आपल्या ताब्यात घेतला आहे.

आता तुला नक्कीच पाडणार असं वक्तव्य एकेरी वक्तव्य असलेल्या या फलकावर, स्टँडींग दिली, महापौर पद दिलं, सरचिटणीसपद दिलं… खासदारकी पण देणार? तर तुला नक्की पाडणार..

असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. आणि खाली कष्टाळू भाजपा कार्यकर्ते असे म्हटले आहे. हाच फलक आता महापालिका सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात असताना काढलेला हा फोटो पहा..

पुणे कि नारी सबसे भारी- अमृता फडणवीस यांचे विधान

  • पुणे कला क्रीडा सांस्कृतिक महोत्सवात होम मिनिस्टर अर्थात “खेळात रंगली पैठणी” कार्यक्रम उत्साहात.

पुणे – लोकमान्य नगर- नवी पेठ. द हिंदू फाउंडेशन आणि माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव यांच्या वतीने आयोजित, पुणे कला, क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवामध्ये हळदी कुंकू आणि होम मिनिस्टर अर्थात “खेळात रंगली पैठणी” या लाखो रुपयांच्या बक्षीसांचा वर्षाव असलेला कार्यक्रम, अभिनेत्या, गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला.
या महिला एकत्रीकरण सांस्कृतिक कार्यक्रमात चार हजार महिला उपस्थित होत्या.लोकमान्य नगर जॉगिंग पार्क येथे झालेल्या या खेळ, गाणी, नृत्य अशा कार्यक्रमा मध्ये अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि बक्षिसे जिंकली.
यावेळी अमृता फडणवीस यांनी महिलांचे कौतुक करून मनोगत व्यक्त केले.

त्या म्हणाल्या, महिलां छान नटून थटून आल्या आहेत. पुण्यातल्या महिला नेहमी काहीतरी वेगळं करतात. त्यामुळं छान वाटत आहे. आज एक चांगला दिवस आहे. या कार्यक्रमामुळे महिलामध्ये पूर्ण एनर्जी भरली आहे. तुमच्या खेळातूनहि तुमचा भारी पणा दिसून येतोय. तुमचा खेळ पाहून मलाही खेळ खेळावासा वाटत होता. आपली महाराष्ट्रीयन पैठणी जग प्रसिद्ध आहे. पूर्वी चीन मधून रेशीम यायचे पण आता बेंगलोर मधूनच आपल्याला आपल्या देशातून रेशीम मिळते, त्यामुळे मेक इन इंडिया हा फुल फॉर्म पूर्ण होतो. हा आहे आपला नवीन भारत जिकडे पाहाल तिकडे प्रगती दिसत आहे. आपल्या प्रत्येक महिलेला असे वाटते कि आपल्या कडे पैठण्या असाव्यात, आपल्याला आपले पती किंवा जिवलग पैठणी घेतात. पण या कार्यक्रमात भाग घेउन तुम्ही पैठण्या जिंकल्या त्या बाबत छान वाटते. महिलांचे एकत्रिकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रम गेले अनेक वर्ष द हिंदू फाउंडेशन करत आहे, महिलांच्या सबलीकरणा करिता करत असलेल्या अनेक उपक्रमाची तसेच संयोजकांनी ठेवलेल्या बक्षीसांची प्रशंसा केली.
अमृता फडणवीस यांना पत्रकारांनी पुण्यातील महिलां विषयी काय वाटते असे विचारल्यावर त्यांनी त्वरित पुणे कि नारी सबसे भारी असे उद्गार काढले.सोन्याचा दागिन्या साठी काढलेल्या लकी कुपन मधून एक तोळ्याचा अस्सल सोन्याचा नेकलेस रूपाली शिंदे यांना मिळाला.विविध खेळां मधून विजेत्या झालेल्या ६ महिलां मध्ये फायनल घेण्यात आली.
फायनल खेळात अनुक्रमे क्रमांक १ ते ६ विजेत्या आणि त्यांना मिळालेली बक्षिसे.
पहिला क्रमांक- क्षितिजा खेळगे – २८० लिटर डबल डोअर फ्रिज.
दुसरा क्रमांक क्रमांक- कल्पना इंगळे- ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन.
तिसरा क्रमांक- आशा हरपुडे – ४२ इंची स्मार्ट टीव्ही.
चौथा क्रमांक – पल्लवी वाघमारे- ३२ इंची स्मार्ट टीव्ही.
पाचवा क्रमांक- दीप्ती बनकर – मिक्सर ग्राइंडर ज्यूसर फूड प्रोसेसर.
सहावा क्रमांक – मनीषा मते – इंडक्शन.
बक्षिसे स्वीकारताना या विजेत्या महिला अक्षरशः भाराऊन गेल्या होत्या.
२५ पैठण्यासाठी भाग्यवंत महिलांच्या नावांची काही लकी कुपन अमृता फडणवीस यांच्या शुभहस्ते काढण्यात आली. या लकी कुपन निघालेल्या भाग्यवंत महिलांना अमृता फडणवीस यांच्या हस्ते पैठण्या देण्यात आल्या. प्रथमच आपल्याला एवढ्या मोठ्या स्टेजवर आणि अमृता फडणवीस यांच्या हस्ते अस्सल पैठणी बक्षीस मिळतेय म्हूणन भारावल्या होत्या.
या प्रसंगी कला क्षेत्रात आपल्या अभिनयाने आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या, देव माणूस फेम गायत्री बनसोडे, साकाव, सफरचंद मूवी फेम वैभवी चव्हाण आणि ढीशक्याव मूवी फेम मेघा शिंदे यांना अमृता फडणवीस यांच्या शुभ हस्ते कला गौरव पुरस्कार २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सन्मानचिन्ह, शाल, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.पुरस्कार वितरण समारंभाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.खेळातून विजेत्या ठरलेल्या १ ते ६ विजेत्या महिलांना पुणे मनपा माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर, भाजपा प्रदेश प्रवक्ते कुणाल टिळक, भाजप कसबा मंडल अध्यक्ष राजेंद्र काकडे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या प्रसंगी भा. ज . पा . व्यापारी आघाडी अध्यक्ष उमेश शहा, मा. नगरसेविका सुशीला नेटके, अश्विनी पवार, सुनीता जंगम, दिव्या लोळगे उपस्थित होते
होम मिनिस्टर “अर्थात खेळात रंगली पैठणी” या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाडके भाऊजी अभिजित राजे यांनी केले.
महोत्सवाचे संयोजन माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव आणि जयश्री जाधव यांनी केले.
महोत्सव यशस्वी करण्यासाठी रवींद्र कांबळे, शिवाजी लोहकरे, तुषार ढावरे, अमन करडे, सीमा शिंदे, संध्या निकम, वनिता सोपे, मालती शिंदे, नीता भिसे, निलम चव्हाण यांनी कष्ट घेतले.

                     

शिपिंग उद्योगात महाघोटाळा, राज ठाकरेंचे थेट मोदींना पत्र

राज ठाकरे यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहित भारतीय शिपिंग इण्डस्ट्रीतील मोठा घोटाळा झाल्याचा दावा केला आहे. या ज्वलंत विषयाकडे लक्ष दिले जावे, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे.

भारतीय शिपिंग इण्डस्ट्रीतील 2 लाख सीफेरर्सची होणारी आर्थिक पिळवणूक रोखून त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी, त्यांना सर्वार्थाने अधिकाधिक सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, कामगार कायदा व मर्चट शिपिंग कायदा तसंच ‘कलेक्टिंग बार्गेनिंग अॅग्रीमेंट’सह (CBA) संबंधित सर्व कायद्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी आपण तातडीने योग्य ती कार्यवाही कराल, असा विश्वास राज ठाकरे यांनी पत्राद्वारे व्यक्त केला आहे.

राज ठाकरेंनी लिहिलेले पत्र जसेच्या तसे,

सविस्तर वाचा

जय हिंद ! जय महाराष्ट्र !!

महोदय,

  • देशाच्या अर्थव्यवस्थेत अत्यंत महत्वाचा वाटा ज्या क्षेत्राचा आहे, त्या शिपिंग इण्डस्ट्रीतील काही अनुभवी, व्यावसायिक तज्ज्ञांनी नुकतीच माझी भेट घेतली आणि शिपिंग इण्डस्ट्रीशी संबंधित काही कामगार संघटनांमुळे सुमारे 2 लाख भारतीय सीफेरर्सची आर्थिक पिळवणूक आणि फसवणूक होत असल्याचे माझ्या निदर्शनास आणून दिले. संबंधित प्रकरणातील आर्थिक घोटाळा महाप्रचंड असून त्याबाबत केंद्र सरकारच्या पातळीवर तातडीने पावलं उचलण्याची गरज आहे आणि म्हणूनच आज हे पत्र मी आपणास लिहित आहे.
  • देशातील दोन लाखांहून अधिक सीफेरर्स हे भारतीय आणि परदेशी जहाजांवर कार्यरत आहेत. त्यांपैकी 40 हजार अधिकारी (ऑफिसर्स) आहेत, तर 1.6 लाख सीमेन (खलाशी) आहेत. भारतातील बहुतांश सीमेन हे ‘नुसी’ या कामगार संघटनेचे सदस्य आहेत. तर, सर्व अधिकारी हे ‘मुई’चे सदस्य आहेत. या दोन्ही संघटना भारतातील ‘रिक्रूटमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिसेस लायसन्स’ धारक कंपन्यांसोबत ‘कलेक्टिंग बार्गेनिंग अॅग्रीमेंट’वर स्वाक्षरी करतात. गंभीर बाब म्हणजे, या करारावर शिपिंग महासंचालक किंवा अन्य कोणत्याही शासकीय प्राधिकरणाची स्वाक्षरी अथवा अधिकृत मान्यतेची मोहोर नसते.
  • DGS याबाबत कोणतीही कार्यवाही का करत नाही? हे प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. याचबरोबर, ‘डीजी शिपिंग सीफेरर्स वेल्फेअर फंड’ अंतर्गतही निधी संकलन केले जाते आणि त्याअंतर्गत हजारो कोटी रुपये जमा झालेले आहेत. या महाप्रचंड निधीचा कधी, कुठे, कसा विनियोग केला जातोय; हे जाणून घेणं सीफेरर्सचा अधिकार आहे आणि त्यासाठी ‘डीजी शिपिंग सीफेरर्स वेल्फेअर फंड’चेही सक्षम शासकीय यंत्रणेमार्फत ऑडिट होणे गरजेचे आहे.

‘नुसी’ संघटनेची चौकशी व्हावी

  • नाविक क्षेत्रातील कामगारांची आर्थिक शोषण आणि फसवणूक करून महाप्रचंड आर्थिक घोटाळा करुन ‘नुसी’ ही संघटना भारतातील आणि भारताबाहेरील अतिरेकी- दहशतवादी संघटनांना कोट्यवधींचा निधी पाठवून देशद्रोही कारवायांना बळ तर पुरवत नाही ना, याचीही सखोल चौकशी व्हायला हवी.
  • आणखी एक मुद्दा. शेवटचा. अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनीय. भारतीय सीफेरर्सच्या वतीने करार करणारी ‘नुसी’ ही कामगार संघटना आणि त्या करारांना अधिकृत मान्यता देणारे ‘नॅशनल मेरिटाइम बोर्ड’ या दोहोंचा कार्यालयीन पत्ता एकच आहे- 4, गोवा स्ट्रीट, बेलार्ड इस्टेट, मुंबई 400001, भारत. आता याबद्दल आणखी काही लिहिण्याची आवश्यकता आहे का?
  • नाविक क्षेत्रातील अनुभवी, व्यावसायिक तज्ज्ञांनी उपस्थित केलेले वरील सर्व मुद्दे अत्यंत गंभीर असून माझी आपल्याकडे आग्रहाची मागणी आहे की, NUSI, MUI या दोन संघटनांचे गेल्या अनेक दशकांचे सर्व आर्थिक व्यवहार, त्यांनी स्थापन केलेल्या ‘ट्रस्ट’चे आर्थिक व्यवहार, तसंच ‘डीजी शिपिंग सीफेरर्स वेल्फेअर फंड’ यांच्यासाठी केले गेलेले प्रचंड निधी संकलन आणि त्याचा विनियोग यांची सक्तवसुली संचालनालय, नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या केंद्रीय यंत्रणांमार्फत सखोल, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. नॅशनल मेरिटाईम बोर्डाचे सर्व करार रद्द करण्यात यावेत.
  • सर्वात महत्वाचं म्हणजे, शिपिंग इण्डस्ट्रीची भविष्यातील वाटचाल व व्यवहार सुरळीत व पारदर्शक व्हावेत, यासाठी भारतीय नाविक क्षेत्रातील अनुभवी, व्यावसायिक तज्ज्ञ मंडळी तसंच संबंधित सर्व कामगार संघटनांना विश्वासात घेऊन एका सुकाणू सर्व सीफेरर्स म्हणजेच ऑफिसर्स आणि सीमेन यांच्या रोजगाराची तरतूद ही ‘मर्चट शिपिंग अॅक्ट’ अंतर्गत अटी-शर्तीमध्ये करण्यात आलेली आहे. मात्र, त्यांना किती वेतन असावे याबाबतची कोणतीही तरतूद ‘मर्चट शिपिंग अॅक्ट’मध्ये नाही. ‘इंटरनॅशनल मेरिटाइम ऑर्गनायजेशन’च्या माध्यमातून 2016पासून ‘मेरिटाइम लेबर कन्व्हेंशन’ कार्यान्वित करण्यात आले.

याच संघटना कारणीभूत?

  • MLC नियमांनुसार, प्रत्येक सीफेररची नेमणूक ही RPSL कंपन्यांद्वारेच व्हायला हवी आणि प्रत्येक सीफेररकडे ‘रोजगार करार हा असायलाच हवा. भारतीय सीफेरर्ससोबत हा करार ‘नुसी’ आणि ‘मुई’ या दोनच संघटना करतात आणि जहाज मालकांशी संगनमत करून सीफेरर्सचे वेतन व ओव्हरटाइम चार्जेससुद्धा या दोन संघटनाच निर्धारित करतात. ज्यांचे कल्याण करण्यासाठी या दोन संघटना स्थापन झाल्याचा दावा करतात, त्या सीफेरर्सना त्यांचा कामाचा जो मोबदला मिळू शकतो त्यापेक्षा कमी मोबदला मिळण्यास याच दोन संघटना कारणीभूत आहेत.
  • भारतातील ब्रिटिश सत्तेच्या काळात मर्चट शिपिंग कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आणि ब्रिटिश जहाजांवर कार्यरत असलेल्या भारतीय सीफेरर्सच्या कल्याणासाठी भारतातील तत्कालीन ब्रिटिश सरकारने ‘नॅशनल मेरिटाइम बोर्ड’ची स्थापना केली होती. भारतीय सीफेरर्सशी संबंधित करारांमध्ये NMB असतेच. मात्र, देशातील विद्यमान माहितीच्या अधिकारात दिनांक 1 ऑक्टोबर 2018 रोजी मागितलेली माहिती आणि शिपिंग मंत्रालयाने दिनांक 12 डिसेंबर 2018 रोजी दिलेला प्रतिसाद यांतून हे स्पष्ट झालेलं आहे की, NMB ही संस्था भारत सरकारच्या अखत्यारित नोंदणीकृत नाही! भारत सरकारचे NMB वर कोणत्याही प्रकारचे प्रत्यक्ष नियंत्रण नाही!
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत सरकारच्या अखत्यारित ‘नॅशनल शिपिंग बोर्ड’ची (NSB) दिनांक 1 मार् 1959 रोजी स्थापना करण्यात आली. NSB जरी शिपिंगसाठीच स्थापन करण्यात आले असले तरी सीमेन्सचे कल्याण, त्यांचा रोजगार आणि विशेष करुन त्यांचे वेतन तसंच प्रॉव्हिडंट फंड, पेंशन आर्दीबाबत कोणताही निर्णय घेण्याचा अधिकार किंवा भूमिका पार पाडण्याची संधी NSB कडे नाही. सीफेरर्सचे वेतन तसंच कोणतीही भरपाई यांसंदर्भातील कोणत्याही कराराला आजवर भारताचे शिपिंग महासंचालनायल, NSB किंवा अन्य कोणत्याही शासकीय प्राधिकरणाने मान्यता दिलेली नाही.
  • ‘मर्चट शिपिंग अॅक्ट’ अंतर्गत ‘आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंट’ हा सीफेर्सना मिळणारा रोजगाराचा एकमेव कायदेशीर पुरावा असला तरी त्यात पेंशन, पीएफ आदींचा समावेश नसतो. याचाच अर्थ, सीफेरर्ससंबंधी जे महत्वाचे करार आहेत त्यात सरकारची किंवा सरकारमान्य प्राधिकरणाची काही भूमिकाच नाही.
  • भारतातील सीफेरर्स सोबत जे कोणतेही करार केले जातात ते NMB करार ‘नुसी’ आणि ‘मुई’ या दोनच संघटना करतात. हे करार केले जात असताना ‘नुसी’ आणि ‘मुई’ या संघटना जहाजांचे मालक आणि फॉरेन ओनर्स रीप्रेझेंटेटिव्हज अँड शिप मॅनेजर्स असोसिएशन’, ‘मेरिटाइम असोसिएशन ऑफ शिपओनर्स, शिपमॅनेजर्स अँड एजंट्स’ यांसारख्या संघटनांसोबत संगनमत करून वेतन, पीएफ, कालावधी, भरपाई आदींविषयीचे निर्णय घेतात. हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असून त्याला कोणत्याही प्रकारची शासकीय मान्यता नाही. या करारांवर NMB च्या सेक्रेटरीची सही असते आणि NMB ही शासकीय मान्यताप्राप्त संस्था नसल्यामुळे हे करार चुकीचे- नियमबाह्य आहेत.
  • खरंतर हे करार म्हणजे बेकायदेशीर कागदपत्रं असून, त्यांना NMB ची ‘मान्यता आहे’ हे भासवणंच गैर आहे. सीफेरर्सचे वेतन, भरपाई, नोकरीच्या अटी-शर्ती आर्दीबाबत वाटाघाटी होत असतानाही त्यात शिपिंग मंत्रालय, शिपिंग महासंचालनालय किंवा नॅशनल शिपिंग बोर्ड कधीही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे सहभागी होत नाही. होऊ शकत नाहीत! असं असतानाही सीफेरर्सचे वेतन निश्चित केलेच कसे जाते? आणि संबंधित करार बंधनकारक कसे?

अनेक दशक नुसी, ‘मुई’ने फसवणूक केली
सर्वात गंभीर बाब म्हणजे, ‘नुसी’ आणि ‘मुई’ यांनी गेली अनेक दशकं लक्षावधी सीफेरर्सची फसवणूक केली आहे. या दोन्ही संघटना त्यांच्या ‘ट्रस्ट’च्या नावाखाली सीफेरर्सकडून कल्याण, प्रशिक्षण आदी तथाकथित सेवाभावी उपक्रमांसाठी शुल्क जमा करतात.

लक्षावधी सीमेन आणि ऑफिसर्स यांच्याकडून अशा विविध मार्गानी जमा झालेल्या प्रचंड बिनहिशोबी रकमेचं आजवर कधीही कोणत्याही सरकारी प्राधिकरणाकडून लेखापरिक्षण (ऑडिटिंग) केलं गेलेलं नाही. दुसरीकडे, ‘नुसी’ आणि ‘मुई’ असं दाखवतात की, त्यांनी केलेल्या करारांना (कोणतीही सरकारी मान्यता नसलेल्या) नॅशनल मेरिटाइम बोर्डाची परवानगी आहे, तसंच भारतीय आणि परदेशी जहाजांसाठी क्र कर्मचारी निवडीसाठीची ITFची मान्यता फक्त त्यांनाच मिळालेली आहे. दर पाच वर्षानी ‘नुसी’ आणि ‘मुई’ या संघटना जहाजांचे भारतीय मालक तसंच परदेशी जहाजांसाठी कर्मचारी पाठवणा-या RPCL कंपन्या यांच्याशी कम्बाइन्ड बार्गेन अॅग्रीमेंट करतात. त्यामुळेच या दोन्ही संघटनांचे सदस्य नसलेल्यांना भारतीय आणि परदेशी जहाजांचे मालक नोकरी देत नाहीत, कामावर घेत नाहीत.

NMB कराराला अधिकृत मान्यता नाही?

  • NMB करारांना शासनाची मान्यता आहे आणि अशी मान्यता फक्त ‘नुसी’ आणि ‘मुई’ यांनाच मिळालेली आहे” हे चुकीचं चित्र दाखवून या दोन्ही संघटनांनी आपली एकाधिकारशाही (मोनोपोली) निर्माण करून गेली अनेक दशकं ती कायम राखली आहे. देशाचे कामगार मंत्रालय, शिपिंग मंत्रालय किंवा नॅशनल शिपिंग बोर्ड शिपिंग महासंचालनालय यांच्याद्वारे हे सिद्ध होऊ शकते की, ‘NMB करार’ असा कोणताही करार त्यांच्याकडे नोंदणीकृत नाही. ‘NMB करारा’ला कोणतीही अधिकृत मान्यता नाही.
  • इतर कोणत्याही क्षेत्रातील कामगारांसाठी ज्याप्रमाणे प्रॉव्हिडंट फंडची तरतूद आहे, अगदी त्याचप्रमाणे भारतीय किंवा परदेशी जहाजांवर कार्यरत असलेल्या भारतीय सीमेन्ससाठी आपल्या देशाच्या ‘सीफेरर्स प्रॉव्हिडंट अॅक्ट’ १९६६ अंतर्गत त्यांना नोकरीवर ठेवणा-या जहाज मालकाने / कंपनीने प्रत्येक सीमेनच्या प्रॉव्हिडंट फंडसाठी आपले योगदान देणे बंधनकारक आहे. ‘सीमेन्स प्रॉव्हिडंट फंड कमिशनर’ आणि त्यांचे कार्यालय हे भारतीय सीमेन्सच्या प्रॉव्हिडंट फंडशी संबंधित सर्व बाबींचे नियमन करतात. ही कायदेशीर तरतूद असतानाही भारतीय सीफेरर्सच्या प्रॉव्हिडंट फंडमध्ये संबंधित रक्कम खूपच अनियमितपणे जमा केली जाते.
  • DGS किंवा अन्य कोणत्याही शासकीय यंत्रणेमार्फत याचे आडिट झालेले नाही किंवा आजवर किती निधी जमा झाला- खर्च झाला, या बाबतची कोणतीही आकडेवारी जाहीर केली गेलेली नाही. आजवर या गोष्टी गुप्त का राखण्यात आल्या, हे तर स्पष्टच आहे. अशा स्थितीत DGS ची नेमकी भूमिका समितीची स्थापना करण्यात यावी आणि नाविक क्षेत्राशी संबंधित सर्व पैलूंवर परिपूर्ण चर्चा घडवून आणून भारत सरकार, शिपिंग मंत्रालय यांचे थेट नियंत्रण भारतीय नाविक क्षेत्रावर आणि विशेषतः नाविक क्षेत्रातील कामगारांशी संबंधित सर्व बाबींवर प्रस्थापित करावे.
  • भारतीय शिपिंग इण्डस्ट्रीतील दोन लाख सीफेरर्सची होणारी आर्थिक पिळवणूक रोखून त्यांना योग्य मोबदला देण्यासाठी, त्यांना सर्वार्थाने अधिकाधिक सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यासाठी, कामगार कायदा व मर्चट शिपिंग कायदा तसंच ‘कलेक्टिंग बार्गेनिंग अॅग्रीमेंट’सह (CBA) संबंधित सर्व कायद्यांचे सुसूत्रीकरण करण्यासाठी आपण तातडीने योग्य ती कार्यवाही कराल, असा विश्वास वाटतो.

भाजपचे नेते जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत , आकड्यांची पतंगबाजी नको: म्हणाले,फडणवीस

महाराष्ट्रातील भाजपचे नेते जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान, दिल्लीत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या ज्या काही माध्यमांमध्ये चर्चा चालू आहेत त्या चूकीच्या आहेत. आमच्या मित्रपक्षांना आम्ही सन्मानजनक जागा देणार आहोत, असे विधान त्यांनी केले.

  • भाजपने पहिल्या यादीमध्ये ज्या जागा जाहीर केल्या आहेत तिथे भाजप स्वतंत्र आहे. इतर ठिकाणी भाजप अलायन्समध्ये असल्याने त्यावर चर्चा सुरु आहेत. त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल.
  • प्रत्येक राज्यासोबत केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चा केली जात आहे. आज महाराष्ट्रातील आम्ही नेते चर्चेसाठी आलेलो असून युतीमध्ये असलेल्या राज्यांची यादी लवकरच देणार आहोत.
  • मित्र पक्षांना एक डिजिट जागा मिळतील, असं सांगणं म्हणजे पतंगबाजी आहे. अशा प्रकारे बतावण्या करणं योग्य नाही. आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य तो सन्मान देऊन जागा दिल्या जातील.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील टपाल तिकीटाचे सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण

0

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही होणार प्रकाशन

चंद्रपूर, दि.०६– राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या दि.०७ मार्च (गुरुवार) छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण होणार आहे. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी सभागृहात सकाळी ११.०० वाजता हा कार्यक्रम होईल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष राज्य सरकारच्या वतीने साजरे केले जात आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून गेल्या वर्षभरापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गुरुवारी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाचे अनावरण केले जाणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ पत्रांचेही अनावरण होणार आहे. याशिवाय मराठेकालीन टाकसाळी संबंधीची मोडी कागदपत्रे खंड-१, ब्रेल लिपीमध्ये मुद्रित छत्रपती शिवाजी महाराज, ‘महाराष्ट्र – गोंड समुदाय’ हे महाराष्ट्र राज्य गॅझेटिअर यांचेही प्रकाशन या सोहळ्यामध्ये होणार आहे. ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, शहाजीराजे भोसले, माँ जिजाऊ यांच्यावर आधारित टपाल तिकिटाचे प्रकाशन झालेले आहे. याशिवाय ना. मुनगंटीवार यांनी अधिवेशनात औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर होण्यासाठी तत्कालीन सरकारसमोर मागणी लावून त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता.आता छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित टपाल तिकिटाच्या माध्यमातून एक महत्त्वाकांक्षी कार्य पूर्णत्वास येणार असल्याची भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

राज्याभिषेक सोहळा अन् अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटविले!
ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेल्या अनेक ऐतिहासिक निर्णयांमुळे ऐतिसाहिक वारसा आणि परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५०वे वर्ष साजरे करताना सांस्कृतिक कार्यक्रमांसह ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने देखील त्यांनी पुढाकार घेतला. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा प्रतापगड येथील अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण सरकारने हटवले. ५ नोव्हेंबर २०२२ ला हे अतिक्रमण हटविण्यात आले. आग्रा येथील किल्ल्यामध्ये १९ फेब्रुवारी २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती अतिशय दिमाखात साजरी करण्यात आली. २ जून २०२३ ला रायगडावर साजरा झालेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा सोहळा संपूर्ण जगाने अनुभवला. महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्याची जिद्द त्यांनी बाळगली. सातत्याने पाठपुरावा करून ब्रिटन सरकारसोबत त्यांनी सामंजस्य करार देखील केला. यासोबतच जम्मू-काश्मीर मधील कुपवाडा येथे मराठा इन्फन्ट्री सैन्य दलाच्या सहकार्याने ‘आम्ही पुणेकर’ या संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाकिस्तानच्या दिशेने तलवार धरलेल्या पुतळ्याचे देखील काही दिवसांपूर्वी अनावरण झाले.

आणि दांडपट्टा ‘राज्यशस्त्र’ झाले!
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या श्रीशैलममध्ये तपश्चर्या केली, तिथे महाराजांचे एक छोटे मंदिर होते. सरकारने तिथे भव्यदिव्य मंदिर उभे केले. १९ फेब्रुवारी २०२४ ला पोंभुर्णा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘दांडपट्टा’ राज्यशस्त्र म्हणून ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच घोषित केला. याशिवाय रायगडावर शिवराज्याभिषेक मिरवणूक सोहळ्यासाठी चांदीची पालखी रायगड उत्सव समितीस भेट देणे, मुंबई येथे पुरातत्त्व विभागामार्फत आयोजित शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन, विशेष लोगोचे प्रसारण करून शासकीय कामकाजात त्याचा वापर आदी कल्पक कामे ना.सुधीर मुनगंटीवार पुढाकाराने करण्यात आली.

‘कृषी सेवक’ पदांची भरतीप्रक्रिया अंतिम टप्प्यात

मुंबई, दि. ६ : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व) यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया आय.बी.पी.एस या संस्थेमार्फत १६ व १९ जानेवारी रोजी राबविण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असून यथाशिघ्र निकाल लावण्यासाठी आय.बी.पी.एस या संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाचे प्रशासकीय अधिकारी अखिल शेंडे यांनी दिली आहे.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ८ ते १० मार्च कालावधीत महिला कला महोत्सव २०२४ – ‘उत्सव स्त्री शक्तीचा’

मुंबई, दि. ६ : सांस्कृतिक कार्य विभाग, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आणि अमर हिंद मंडळ, दादर यांच्या संयुक्त विद्यमाने महिला कला महोत्सव 2024- ‘उत्सव स्त्री शक्तीचा’ या महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, 8 मार्च ते रविवार, 10 मार्च, 2024 या कालावधीत करण्यात आले आहे. तीन दिवसांच्या या महोत्सवात रोज  संध्याकाळी 6 ते 10 या वेळेत  विविध चर्चासत्र, मुलाखती, नृत्य, गाण्याचे कार्यक्रम, नाटक सादर केले जातील.

            महोत्सवाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते 8 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता होणार असून त्यानंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या उपकार्यकारी संपादक सरिता कौशिक यांची मुलाखत शिबानी जोशी घेतील. सायंकाळी 7.30 ते रात्री 10 या कालावधीत शेतक-यांच्या विषयांवर भाष्य करणारे विनोदी लोकनाट्य ‘दादला नको  गं बाई’ याचे सादरीकरण सम्यक कलांश  प्रतिष्ठानचे कलाकार सादर करतील.

            9 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता मिशन विश्व ममत्व फाऊंडेशन, नागपूर या संस्थेचे तृतीयपंथी कलाकार ‘तू है शक्ति’ हा बहारदार नृत्याविष्कार सादर करतील. त्यानंतर सायंकाळी 6:45 ते 9.30 या कालावधीदरम्यान  प्रसिद्ध यूट्युबर आणि शेफ मधुरा बाचल, वित्तीय सल्लागार रचना रानडे आणि वन्यजीव छायाचित्रकार ॠता कळमणकर यांची मुलाखत अभिनेत्री आणि लेखिका मुग्धा गोडबोले घेतील. या कार्यक्रमांतर्गत धनश्री देशपांडे आणि श्रावणी वागळे यांच्या सुमधुर गाण्यांचा कार्यक्रमही होईल, या कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित करतील.

            10 मार्च, 2024 रोजी सायंकाळी 6 ते 7.15 या कालावधीत अभिराम भडकमकर लिखित ‘सीता’ या कादंबरीवर चर्चा आणि अभिवाचन लेखिका रोहिणी निनावे, अभिनेत्री व लेखिका मधुरा वेलणकर आणि लेखिका स्वरा मोकाशी करतील आणि सायंकाळी 7.30 ते 9.30 या कालावधीत विदुषी देवकी पंडित यांचा ‘देवी – दिव्य शक्तींचे प्रतीक’ या संकल्पनेवरील रचना सादर होतील. त्याचे सूत्रसंचालन  डॉ. समीरा गुजर-जोशी करतील.

            अमर हिंद मंडळ, दादर येथे आयोजित हा महोत्सव सर्व रसिकांसाठी खुला असून रसिकांनी या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

रोजगार देणे पुण्याचेच काम – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणेदि. :- कुटुंबातील एका व्यक्तीला रोजगार मिळाला की, संपूर्ण कुटुंबाला आधार मिळतो. म्हणूनच एखाद्याला रोजगार देणे हे पुण्याचे काम आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

येथील कोपरी येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ संचालित संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, माजी आमदार रविंद्र फाटक, माजी महापौर नरेश म्हस्के, कौशल्य विकास आयुक्तालयाच्या आयुक्त श्रीमती निधी चौधरी, कुलगुरु अपूर्वा पालकर, बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाड, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना आदि मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, शासनाकडून निर्णय झाला होता की, राज्यातील बेरोजगार युवकांना 75 हजार शासकीय नोकऱ्या देणार, मात्र प्रत्यक्षात एक लाख 60 हजार शासकीय नोकऱ्या आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. शासनाने शासकीय नोकर भरती बंदी उठविली. कौशल्य विकास विभागाने अतिशय उल्लेखनीय काम करून दाखविले असून या विभागाकडून आतापर्यंत 1 लाख नोकऱ्या दिल्या गेल्या असून 1 लाख स्वयंरोजगार  उभे करण्यात आले आहेत.

ते पुढे म्हणाले की, गरज म्हणून नोकरी तर करायला हवी मात्र नोकऱ्या देणारे हातही घडविले पाहिजे. बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी पुढच्या दहा वर्षात दहा लाख नोकऱ्या देण्याचे नियोजन केले आहे. यासाठी आजच लोकार्पण केलेले देशातील पहिले स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी आणि संत गाडगेबाबा स्वच्छ भारत स्किल डेव्हलपमेंट केंद्र मोलाची भूमिका बजावणार आहे. संत गाडगेबाबांनी स्वच्छतेतून समाजाच्या स्वस्थतेकडे जाण्याचा मार्ग दाखविला. हाच आदर्श समोर ठेवून या शासनाने देखील डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून संपूर्ण महानगरांमध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्याला स्वच्छतेचे महत्व पटवून दिलेच आहे. त्याच पद्धतीने डीप क्लिन ड्राईव्हचे अभियान सुरु आहे.

विविध सामाजिक संस्थांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी बेरोजगारांची यादी बनवावी व ही यादी अशा संस्थांकडे द्यावी. या बेरोजगार तरुण-तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षणानंतर त्यांना तीस हजार ते दीड लाख रुपयांपर्यंत पगार मिळणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेच्या माध्यमातून अनेकांनी आपले स्वयंरोजगार सुरू केले. आजच्या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देखील दहा हजार आठशे महिलांना आपण शिलाई मशीन व घरघंटी दिल्या. ही व्यवसायाची सुरुवात आहे, अशा छोट्या छोट्या व्यवसायातून तोच व्यवसाय व्यवस्थित केल्यानंतर भविष्यात ती व्यक्ती एक मोठी व्यावसायिक बनते, असे सांगून मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले,  महाराष्ट्र हे माझे कुटुंब आहे, मी स्वत:ला सीएम पेक्षा कॉमन मॅन समजतो. कार्यकर्ता समजतो. म्हणूनच मला सर्वसामान्यांचे दुःख समजते. सामान्य माणसाचे हे दु:ख समजून घेवून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी हे शासन सर्व प्रकारे प्रयत्नशील आहे. राज्यात पायाभूत सुविधांचे जाळे सर्वत्र तयार होत आहे. समृद्धी महामार्ग, अटल सेतू यासारखे प्रकल्प हे गेम चेंजर प्रकल्प आहेत. पायाभूत सुविधांच्या माध्यमातून राज्याचा जास्तीत जास्त विकास करण्याचे आमचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्र, गड किल्ले स्वच्छ ठेवणे, ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत अनेक तीर्थक्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याचा या शासनाचा प्रयत्न सुरु आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. समाजातील सर्व घटकांसाठी काम करणारे हे सरकार आहे

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राज्यगीताने झाली. सूत्रसंचलन शिबानी जोशी यांनी केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) यांच्यामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित महत्वपूर्ण करार झाला. कौशल्य विकास आणि रोजगार या विषयात उल्लेखनीय योगदान दिल्या बद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बी.व्ही.जीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हणमंतराव गायकवाड, नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NSDC) चे अजय रैना यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना कुलगुरु अपूर्वा पालकर यांनी स्वच्छ भारत अभियान हे भारत सरकारचे अतिशय महत्वाकांक्षी अभियान आहे. आज वाढती कार्यक्षेत्रे, मॉल्स, रुग्णालये, औद्योगिक आस्थापना, शैक्षणिक संस्था इत्यादी सर्वांना सुविधा स्वच्छ ठेवण्यासाठी मनुष्यबळाची गरज आहे. सुविधा क्षेत्र विकसित होत असून असून या क्षेत्रात 2024 सालात 3 लाख 50  हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 2023 च्या तुलनेत ही वाढ 15 ते 20 टक्के जास्त असेल.

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारचे प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले जातात. अभ्यासक्रमाची रचना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरज लक्षात घेऊन करण्यात आली असून नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. येथे मॅकेनाईज्ड हाऊसकिपींग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे, अशी माहिती दिली.

या अकॅडमीची वैशिष्ट्ये

  • सुविधा व्यवस्थापनातील आवश्यक प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम युवक घडवण्यासाठी लघु आणि दीर्घ कालावधीचे शिक्षण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
  • सुविधा क्षेत्रात कार्य करण्यासाठी आवश्यक व्यावहारिक ज्ञान देण्यावर भर.
  • उत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी अत्याधुनिक सोयी आणि उपकरणांनी सज्ज.
  • भारत विकास ग्रुपचे सर्वांगीण व्यवस्थापनासाठी सहकार्य.

सर्व काही कोथरूडमध्येच देणार असाल तर..भाजपात जोरदार राजकिय उसळी

एकीकडे पुण्यातून उमेदवारी देतांना जरा जपून: इशारा

दुसरीकडे फडणवीसांसह महाराष्ट्रातील सहा ‘दादा’ नेत्यांना शाहांचं दिल्लीत बोलावणे

पुणे:एकीकडे पुण्यातून उमेदवारी देतांना जरा जपून, सारे काही कोथरूडमध्येच देऊ नका, महापालिका पदाधिकारी राहिलेल्यांना उमेदवारी दिली तर कसबा विधानसभा निवडणुकीच्या निकालाच्या पुनरावृत्ती चा धोका लक्षात घ्या असा पुण्यातून इशारा देणारी सोशल मीडियातून जोरदार चर्चा उसळली असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर दिल्लीत तातडीने हालचाली सुरू झाल्या आहेत. लोकसभा उमेदवारांच्या निश्चितीसाठी आज बुधवारी सायंकाळी स्क्रिनिंग कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी मंत्री आमदार आशिष शेलार, प्रविण दरेकर तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आज सायंकाळपर्यंत दिल्लीत दाखल होणार असल्याचे समजते. या बैठकीत भाजपकडून राज्यातील उमेदवारांवर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचा दावा उच्चपदस्थ सूत्रांनी केला आहे.

शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी जागावाटपाबद्दल चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर लगेचच दिल्लीत महाराष्ट्रातील उमेदवारांची नावे निश्चित करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी स्क्रिनिंग कमिटीची बैठक आयोजित केली असून या बैठकीसाठी फडणवीस, पाटील, बावनकुळे, शेलार, दरेकर हे उपस्थित राहणार असल्याचे समजते.

मनोर ते वाडा आणि वाडा ते भिवंडी या एकूण ६४.३२ किमी लांबी रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी रुपये १०४२.६० कोटी निधीची मान्यता

सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न

मुंबई, दि. ६ – पालघर जिल्ह्यातील मनोर ते वाडा (राज्य मार्ग ३४ ) व वाडा ते भिवंडी (राज्य मार्ग ३५) या एकूण ६४.३२ किमी लांबी रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण , नागरी वसाहती दरम्यान पक्की गटर व सांडपाणी निचरा व्यवस्थाच्या कामास विशेष बाब म्हणून या सर्व कामांसाठी रुपये १०४२.६० कोटी किंमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे गेले काही वर्षे रखडलेल्या या महामार्गाचे काम अखेर मार्गी लागली आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील रस्त्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता सरसकट पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील समस्त ग्रामस्थ वाहतूकदार व अवजड वाहने यांना मोठ्या प्रमाणात दिलासा प्राप्त झालेला आहे.
खाजगीकरणांतर्गत ठाणे जिल्हयातील मनोर ते वाडा व वाडा ते भिवंडी हया एकूण लांबी ६४.३२ किमी रस्त्याचे व देखभाल दुरुस्ती करणे. या कामास सुप्रीम मनोर वाडा भिवंडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लिमिटेड कंपनीला २०१० मध्ये रोजी काम देण्यात आले होते. त्यानंतर रस्त्याची कामे पूर्ण करून २०१३ पासून पथकर सुरू करण्यात आलेला होता .
उद्योजकाकडुन रस्त्याची आवश्यक अशी देखभाल व दुरुस्ती व रस्त्याचे सुधारणेचे काम पुर्ण झालेली नव्हती जिल्हास्तरीय बैठकांमध्ये याबाबत लोक प्रतिनिधींकडून गंभीर तक्रारी झाल्या होत्या. रस्ता मोठया प्रमाणात खराब होऊन वाहतुकीस असुरक्षित होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी वारंवार सुचना देऊन सुध्दा, उद्योजकाकडून आवश्यक ती कार्यवाही वेळच्यावेळी होत नव्हती त्यामुळे करारनाम्याच्या अटी शर्तीनुसार २०१९ मध्येउद्योजकाशी झोलेला करारनामा संपुष्टात आणून पथकर वसुली बंद करण्यात आलेली आहे.

परंतु सदर रस्त्यालगत झालेले औद्योगीकरण व नागरी वसाहत यामुळे तसेच मूळ उद्योजकाने देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे झालेली रस्त्याची दुरावस्था फक्त डांबरीकरणाने किंवा दुरुस्ती करून टिकत नसल्याने याबाबत शासन स्तरावर मंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेऊन सदरच्या कामास मंजुरी दिली आहे.

दहिसरमध्ये नारीशक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन:आ. मनीषा चौधरी यांचा पुढाकार

मुंबई दिनांक ६ मार्च २०२४
जागतिक महिला दिनानिमित्त दहिसर विधानसभेत भाजपा आ. मनीषा चौधरी यांच्या उपस्थितीत नारी शक्ती वंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महिलांशी संवाद साधला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने गेल्या १० वर्षांत महिलांच्या विकासाला महत्त्व दिले आहे. महिला सक्षमीकरणाला या काळात प्राधान्य देण्यात आले. सरकारी योजनांचा महिलांना प्राधान्याने लाभ मिळाला पाहिजे यासाठी भाजपा सरकार आग्रही आहे असेही आ. मनीषा चौधरी म्हणाल्या. या कार्यक्रमाला दहिसरमधील महिला बचत गट, भाजपा महिला पदाधिकारी कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

जुना मुंबई -पुणे हायवेच्या कामाची आढावा बैठक:- आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे – जुना मुंबई पुणे हायवे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याबाबत पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व सबंधित विभागाचे अधिकारी यांचेबरोबर आज (बुधवारी) सविस्तर बैठक घेण्यात आली.

बैठकीत जुना मुंबई पुणे हायवे रस्ता रुंदीकरणाचा आढावा घेण्यात आला, जय हिंद टॉकीजच्या पुढचा पट्टा लवकरच सुरु करण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर दुहेरी मार्ग सुरु करण्याबाबत सकारत्मक चर्चा झाली. येत्या १० ते १५ मार्चपर्यंत हा रस्ता दुहेरी करण्यात येईल असे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले असून. याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. नागरिकांना यातून लवकरच दिलासा देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील, असे आमदार शिरोळे यांनी बैठकीतील निर्णयांची माहिती देताना सांगितले.

दुर्योधन भापकर, कार्तिकी हिवरकर, शैलेश बडदे, सचिन वाडेकर, प्रकाश सोलंकी, राहुल दुर्गे, तसेच पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे व पथ विभागाचे अधिकारी, वाहतूक विभागाचे अधिकारी, खडकी छावणी परिषदेचे अधिकारी, पोलीस प्रशासन, खडकीचे व्यापारी व नागरिक बैठकीला उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेश काँग्रेसची मुंबई वगळून २० लोकसभा मतदारसंघाची चर्चा – नाना पटोले

लोकसभेचे उमेदवार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन देणार, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर

बाळासाहेब थोरात, शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत उद्या ६ तारखेला मविआची बैठक.

अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

मुंबई
लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केले जाईल. काँग्रेसच्या पक्षाच्या संभाव्य जागांवरील स्थानिक पदाधिकारी यांचे मते व राजकीय परिस्थिती याची चर्चा करण्यात आली. मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.
प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई वगळता राज्यातील २० मतदारसंघाबाबत चर्चा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोवा, दिव, दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे सर्व जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, आमदार, जिल्हा प्रभारी, सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील आघाडी व संघटनांचे प्रमुख आदी उपस्थित होते.
नाना पटोले पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोकशाही पद्धतीने कामकाज चालते त्यासाठी सर्वांची मते विचारात घेतली जातात. संभाव्य उमेदवारांच्या नावावरही चर्चा करून त्यानंतरच उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल. सांगली व कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाची आहे. तिथून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती काँग्रेसकडून लढणार आहेत. सांगलीही काँग्रेसच लढणार आहे. उत्तर मध्य मुंबई मधूनही निवडणुक लढवण्यास अनेकजण इच्छुक आहेत. दिल्लीतून थेट उमेदवार जाहीर करायचे व त्यानंतर उमेदवारांनी उमेदवारी नाकारायची अशी पद्धत काँग्रेसमध्ये नाही. आजच्या बैठकीनंतर उद्या ६ तारखेला महाविकास आघाडीची बैठक होत आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व वंचितचे प्रकाश आंबेडकर हे या बैठकीत उपस्थित असतील असे पटोले यांनी सांगितले.

अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घराणेशाहीवर टीका केल्याच्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अमित शाह यांचा मुलगा कोणते क्रिकेट खेळला की बीसीसीआयचा सचिव केला आहे. दुसऱ्याकडे एक बोट केले की चार बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवावे. अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर भाजपाकडूनच अन्याय…

भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे नाव आहे परंतु भाजपाचे वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव मात्र नाही. २०१९ साली पंतप्रधानपाने उमेदवार अशी गडकरी यांची चर्चा होती. भाजपाने पहिल्या यादीत गडकरींची उमेदवारी जाहीर न करून त्यांच्यावर अन्याय केला आहे, असे पटोले म्हणाले.

भाजपा नाही आता ‘मोदी परिवार’…
नरेंद्र मोदी यांना ज्या भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री केले, पंतप्रधान केले तो पक्ष आता मोदी परिवार झाला आहे. भाजपाच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून भाजपा नाहीतर ‘मोदी परिवार’च दिसत आहे. असा टोलाही पटोले यांनी लगावला.