Home Blog Page 1175

स्त्रियांनी जीवनात यशस्वी होण्याकरिता सकारात्मक भूमिका ठेवावी आणि मनशांतीसाठी आध्यत्मिकतेकडे वळावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्यस्तरीय कारागृह महिला परिषद उदघाटन व महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी पुस्तिका सन २०२२ चे प्रकाशन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांच्या हस्ते संपन्न

पुणे दि.६: ८ मार्च रोजी जगभर साजरा करण्यात येणारा जागतिक महिला दिन हा फक्त महिलांचा उत्सव म्हणून साजरा न होता तो महिलांना हक्क, न्याय मिळवून देणारा आणि महिला सशक्तीकरणावर भर देणारा असावा. स्त्री-पुरुष या दोघांमध्ये समानतेची भूमिका येणे आवश्यक आहे. दोघांनाही समान काम, समान अधिकार असावेत. जिथे अतिरेक झालेला आहे तिथे सरकार नेहमीच काम करताना दिसते. घरकामात पुरुष वर्गाचा सहभाग वाढला पाहिजे. यामुळे स्त्रियांना त्यांच्या कामात प्रगती करता येईल. समाजात वावरताना प्रत्येकाबद्दल सकारात्मक भूमिका ठेवली पाहिजे. यासोबतच मनाला संतुलन करण्यासाठी आध्यत्मिकतेची आवश्यकता आहे यातून एक विशिष्ठ शक्ती निर्माण होत असते. स्त्री संवेदनशील आहे पण ती तेवढीच हुशार आणि तल्लखही आहे. प्रत्येक वेळी आपल्यासोबत कोणी असेलच याची वाट न पाहता एकट्याने संकटाला सामोरे जावे. त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची क्षमता स्त्रियांनी ठेवली पाहिजे असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

तसेच जे समाजात दबंग लोक येतात त्यांना ज्ञान देण्याचा काम कारागृह करत असल्याचे मत डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केले. भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष कायदा हे सर्व कायदे केंद्रात मंजूर झाले असून देशभर ते लागू करण्यात येणार आहे. दिशा कायद्याअंतर्गत सुचविलेल्या तरतुदींचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. याबद्दल उपसभापती डॉ गोऱ्हे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या वतीने ८ मार्च रोजी असलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त राज्यस्तरीय कारागृह महिला परिषद उदघाटन व महाराष्ट्र कारागृह सांख्यिकी पुस्तिका सन २०२२ चे प्रकाशन विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह अमिताभ गुप्ता, कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग येरवडा स्वाती साठे, कारागृह उपअधीक्षक पल्लवी कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

स्वाती साठे म्हणाल्या, डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून महिलांना आश्वासक मदत मिळते. कारागृह प्रशासनात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे ही आनंदाची बाब आहे.

अमिताभ गुप्ता म्हणाले,जीवनात नेहमी चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. सर्वांना समानतेची वागणूक दिली पाहिजे ही आपली स्वतःची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

“उदंड” झाली महासंस्कृती..!

महासंस्कृती महोत्सवाच्या निमित्ताने राज्यातील लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे , त्याच प्रमाणे स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात लढावययाची माहिती सर्व भावी पिढीला समजावी .म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाने राज्यभर “महासंस्कृति महोत्सवाचे”आयोजन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपयाचा भरघोस निधी दिला आहे. जिल्हाधिकाऱ्याने आपल्या जिल्ह्यात महोत्सवाचे आयोजन करताना स्थानिक कला प्रकाराला प्राधान्य दयावे.तेथील लोककलावंतांचा कार्यक्रमात मान – सन्मान करावा. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम आयोजित करण्यात यावे. विविध लोककलेचे सादरीकरणाचे नियोजन करावे. कविता, देशभक्ती गीतांचे कार्यक्रम, विविध विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात यावे. या महोत्सवाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातील इतर प्रांतातील संस्कृती यांचे आदान -प्रदान व्हावे तसे यावर कार्यक्रमाचे आयोजन करावे.अशा अनेक सूचना वजा मार्गदर्शन करणारे नियम आणि अटी सांस्कृतिक कार्य विभागाने दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजीच्या “शासन निर्णया”नुसार सर्व जिल्हाधिकारी यांना घालून दिल्या होत्या.परंतु हा महोत्सव ज्या उद्देशाने आयोजित करण्यात आल्या होत्या.मात्र तो उद्देश खरोखरच सफल झाला का? याचे आत्मचिंतन सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी करण्याची गरज आज वाटत आहे.
याचे कारण ही तसेच आहे. जळगाव, नाशिक, धुळे, अहमदनगर, पालघर, धाराशिव या महत्वाच्या जिल्ह्यात जोरदार असा महासंस्कृती महोत्सव झाला. पण स्थानिक लोककलावंतांना जिल्ह्याधिकाऱ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमासाठी प्राधान्य दिले नाही. त्यामुळे तेथील लोककलावंतांची खूप निराशा झाली. अनेक कलावंतांना आपल्या हक्काच्या लढाईसाठी यामुळे रस्त्यावर उतरावे लागले, तेथील स्थानिक प्रशासनाशी त्यांना वाद घालावा लागला. या स्थानिक कलाकारांचा आलेल्या “पाहुणा” कलाकाराबद्दल अजिबात विरोध नाही. उलट त्यांचे स्वागतच आहे पण शासनाचे अधिकारी जो कलेमध्ये भेदभाव करते. त्या मानसिकतेला आमचा विरोध असल्याचे त्यांचे मत आहे.आम्हाला उपकार केल्यासारखे कर्यक्रम नको आहेत. सन्मानाने निमंत्रित करा. अशी माफक अपेक्षा या स्थानिक कलाकारांची होती आणि आहे.
खरी गडबड तर पुढे झाली. आतापर्यत ज्या ज्या जिल्ह्याने महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन केले, त्यांनी “सेलिब्रिटी” आणण्याच्या नादात स्थानिक लोककलावंतांना पुरते विसरून गेले होते. सांगली जिल्ह्यात तर एका कला पथकाला कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. पण मानधन केवळ दहा हजार रुपये मिळणार असे सांगितले. आता यावर विचार करण्याची गोष्ट आहे की, प्रत्येक कला पथकात किमान दहा -बारा कलाकार असतात. त्यात जर शाहीरीचा कार्यक्रम असेल तर त्याची वेशभूषा ही महागडी असते. मग असा कार्यक्रम घेणे कला पथकांना कसे परवडले असते. मात्र एखाद्या “सेलिब्रिटी”ला बोलवायचे असते तेव्हा तो सांगेल ती रक्कम दयायला प्रशासन तयार झाले होते.मात्र लोककलावंतांची दहा बारा हजार रुपयात बोळवण करणे योग्य वाटते का? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही.
सेलिब्रिटी आणून कार्यक्रम खूप मोठा दाखविण्याचा प्रयत्न झाला. पण अनेक ठिकाणी कला रसिकांनी पाठ फिरविली. केवळ ढिसाळ कारभारामुळे या कोट्यावधी रुपयांची केवळ उधळपट्टी झाली, अशी तक्रार स्थानिक कलावंतांची आहे. ग्रामीण भागात एखाद्या गावात यात्रेतील तमाशामध्ये केवळ ढोलकीवर थाप जरी पडली की, चार पाच हजार लोकं सहज जमतात.इथं मात्र अमाप निधी आहे, सरकारी यंत्रणा संपूर्ण कामाला लागली होती. पण या महोत्सवामुळे कला प्रेमिंना समाधान मिळाले का? असे कोणी विचारले तर त्याचे उत्तर नाही असे येईल.
मुळातच महासंस्कृति महोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली “जिल्हा समन्वय व संनियंत्रण समिती”गठीत करण्यात आली होती. या समितीमध्ये पोलीस प्रशासन, विविध खात्याचे अधिकारी, आणि कला क्षेत्रातील तज्ञ मंडळीचा समावेश होता. मात्र त्याच समितीला नेमका कार्यक्रमाचे नियोजन काय करावे याचे योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. येवढे दोन कोटी रुपये पाच दिवसात कसे खर्च करायचे यावर हे सर्वच कार्यक्रमाचे आयोजक संपूर्ण गांगारून गेले होते. या समितीमध्येच काही जिल्ह्यात सावळागोंधळ दिसत होता. कोणत्या कार्यक्रमावर व कोणत्या कलावंतांवर नेमका किती खर्च करावा, याचा समितीमध्ये ताळमेळ दिसत नव्हता. असे अनेक कलाकार आपला अनुभव सांगत होते. जे सेलिब्रिटी मोठ मोठ्या शहरांत हाऊसफुल गर्दी खेचतात.त्यांना निमंत्रण देण्याऐवजी स्थानिक कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे गरजेचं होते.पण केवळ तोंडी लावण्यापुरते “महासंस्कृति महोत्सवात”स्थानिक कलावंतांना संधी देण्याचा प्रयत्न झाला. म्हणजे स्थानिक कलाकारांना वाऱ्यावर सोडून पंचतारांकित संस्कृती आणली. त्यामुळे “उदंड झाली महासंस्कृति” अशी म्हणायची वेळ राज्यातील लोककलावंतांवर आली.
तमाशाची महाराष्ट्राला खूप मोठी परंपरा आहे. जवळपास दोनशे वर्षांपासून लोकशिक्षक, लोकजागृती, समाज प्रबोधनाचे कार्य तमाशा कलावंतांनी केले. दि.22 डिसेंबर 2023च्या शासन निर्णयात तमाशा या कलेचा साधा उल्लेख ही करण्यात आलेला नाही. त्यामुळे या महोत्सवात कुठेही तमाशाला स्थान देण्यात आले नाही.
मग येवढा भव्य खर्च करून ही कला रसिकांना हा महोत्सव भावला का? याचा आढावा सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाने घेण्याची गरज आहे.
या ढिसाळ नियोजनाबद्दल अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या, लोकप्रतिनिधीनी सुद्धा जाहिर टिका केली. सोशल माध्यमातून या उधळपट्टीबद्दल जोरदार आक्षेप घेण्यात आला. अनेक कलावंतांनी याबाबत तक्रारी केल्या परंतु सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक आणि त्यांचे अधिकारी हे या महोत्सवाच्या ढिसाळ नियोजनाबद्दल कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. जिल्हाधिकारी कार्यालयाला महोत्सव पार पडल्यावर आम्ही केवळ झालेल्या कार्यक्रमाचे “उपयोगिता प्रमाणपत्र”देण्यापुरते आहोत. असे सांगत आहे.तर मंत्रालयातील सांस्कृतिक कार्य विभागाचे अधिकारी म्हणत आहे की, संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्यावरच महासंस्कृति महोत्सवाची जबाबदारी आहे. त्यांच्या प्रमाणपत्राशिवाय एकाही कलेक्टर कार्यालयाला बिल दिले जाणार नाही. म्हणजेच एकमेकांच्या अंगावर जबाबदारी ढकलणाऱ्या या सांस्कृतिक कार्य खात्याच्या कारभारामुळे मात्र राज्यातील लोककलावंतांचे मोठे नुकसान झाले आहे. हे मात्र सर्वांना आवर्जून सांगावे लागते.

खंडूराज गायकवाड
Khandurajgkwd@gmail.com

पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला झेंडा

पंतप्रधानांच्या हस्ते पुण्यातील मेट्रो प्रकल्पांचा शुभारंभ

रेल्वे, मेट्रो सेवेमुळे विकासाला मोठा वेग – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक 6: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी, पुणे मेट्रोचे भूमीपूजन करण्यात आले. यावेळी रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी, पुणे मेट्रोला पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधानांनी आज कोलकाता येथून विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले. यावेळी त्यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील या मेट्रो प्रकल्पांची ऑनलाईन प्रणालीद्वारे सुरुवात केली.
या या कार्यक्रमासाठी सह्याद्री अतिथीगृह येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सहभागी झाले होते.

पंतप्रधान लोकार्पण करत असलेल्या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी हा मेट्रो मार्ग सहा किलोमीटरचा असून 5 फेब्रुवारी 2024 रोजी या मेट्रोची ट्रायल रन झाली आहे.

यापूर्वी 6 मार्च 2022 रोजी पीसीएमसी ते फुगेवाडी या सात किलोमीटर आणि वनाज ते गरवारे पाच किलोमीटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले होते फुगेवाडी ते सिविल कोर्ट 6.91 किमी आणि गरवारे ते रुबी क्लिनिक 4.75 किमी अशा मेट्रोच्या टप्प्यांचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते 1 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले होते
आणि आज रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी या सहा किलोमीटर मार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधानांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी या पहिल्या टप्प्यातील मेट्रोचे भूमिपूजन देखील करण्यात आले.
हा मार्ग 4.4 किमीचा असून पूर्णपणे उन्नत मार्ग आहे. यामुळे स्वारगेट ते पीसीएमसी कॉरिडॉर हा निगडीपर्यंत विस्तारित होणार आहे.
गेल्या पावणे दोन वर्षांपासून महाराष्ट्रात पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी जी यांच्या मार्गदर्शनाने मोठ्या प्रमाणावर विकास कामे सुरू आहेत. रेल्वे आणि मेट्रोसाठी सुद्धा राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे ज्याचा फायदा नागरिकांना होत आहे.
आज लोकार्पण करण्यात आलेल्या पुण्यातील मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील आदरणीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले होते, आणि आज त्यांच्याच हस्ते ही मेट्रो सेवा सुरू देखील झाली आहे.

वाढत्या शहरीकरणामुळे स्मार्ट आणि दर्जेदार वाहतुकीची गरज आहे. मेट्रो सेवेमुळे ही गरज पूर्ण होऊन इंधन आणि वेळेत देखील मोठी बचत होणार आहे.

मोदींची गॅरंटी असलेले सर्व प्रकल्प आणि विकास कामे गतीने सुरू असल्यामुळे महाराष्ट्राला मोठा फायदा होत आहे- -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आयुष्य कॉग्रेसला वाहिले, अशा निष्ठावंत आबा बागुलांचे नाना पटोलेंना थेट आवाहन

सभेतून पुणेकरांचा कौल घ्या, मगच पुणे लोकसभेसाठी उमेदवाराचा निर्णय घ्या:

पुणे: 40 वर्षे काँग्रेस काम केले,सहा वेळा निवडून आलो,नगरसेवक म्हणुन प्रभावी काम करून दाखविले असे सांगत आबा बागुल यांनी लोकसभेची उमेदवारी देतांना खरा न्याय करा आणि पक्षाविषयी विश्वास प्रस्थापित करून दाखवा असे जाहीर आव्हान कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आबा बागुल यांनी थेट नेत्यांना दिल्याने लोकसभेची उमेदवारी देतांना नेत्यांसाठी बाका प्रसंग निर्माण होऊ शकणार आहे.

कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा सूत्र अमलात आणा

बागुल यांनी या संदर्भात एक पत्र पक्षाचे प्रदेश अध्यक्ष पटोले यांना दिले आहे. यात असे म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच प्रक्रिया सुरु होणार आहे. आचारसंहिता लागू होण्यास अजून अवधी आहे. पुणे लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षासाठी महत्वाचा आहे. आज जरी तो भाजपच्या ताब्यात असला तरी हा मतदारच पुन्हा काँग्रेसकडे खेचून घेणे सहजशक्य आहे. त्यासाठी पुणेकरांच्या मनात कोण आहे? हे जाणून घेण्यासाठी मी जाहीर सभा घेतो. या सभेला हजारोच्या संखेने पुणेकर नागरिक उपस्थित राहतील. पुणेकर मतदार सुज्ञ आहेत. ते जो कौल देतील, त्यानुसार पुणे लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. तुम्ही फक्त या सभेत मार्गदर्शन करा आणि पुणेकरांचा कौल कुणाला आहे हे जाणून घेऊनच लोकसभेसाठी उमेदवार ठरवा. मी गेली ४० वर्षाहून अधिक काळ काँग्रेस पक्षाचे कार्य करीत आहे. तब्बल ३० वर्षे मी लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय आहे. प्रभागच काय वॉर्ड रचना बदलूनही सलग सहा वेळा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेलो आहे. शहर विकासाचे व्हिजन आणि काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे याची मला सदैव जाण असल्यानेच जनतेनेही भरभरून मतदान केलेले आहे. त्यामुळेच सहा टर्म लोकप्रतिनिधी म्हणून नागरिकांनी स्वीकारले आहे आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ यावर जनमानसातूनच शिक्कामोर्तब झाले आहे. मला समाजकारण -राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. मी खात्रीपूर्वक नमूद करतो की, यंदा पुणे लोकसभा मतदारसंघावर काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकेल. त्यासाठी जनमताचाकौल घ्या, जाहीर सभा घेण्यास मला निर्देश द्या, मी सक्षम व तयारीत आहे. तसे झाल्यास पुणेकरांचा कौलही कळेल आणि निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मितीही होईल. कृपया आपण आता गांभीर्याने विचार करून सकारात्मक निर्णय घ्यावा ही विनंती. आणि त्यानुसारच ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र लोकसभेसाठी यंदा अवलंबावा ही विनंती. जर तेच ते यशस्वी कलाकार’ ( मोठ्या मताधिक्क्याने पराभूत झालेले) पुन्हा लोकसभेसाठी दिल्यास निकालही नेहमीप्रमाणे यशस्वी’च लागेल. हेच कलाकार आपल्यापुढे वेगळे चित्र निर्माण करतात आणि नंतर जबाबदारीही पेलत नाहीत, घेत नाहीत आणि पराभव झाल्यानंतर मौनव्रतात जातात. परिणामी सर्वांचेच श्रम वाया जातात. गेली अनेक वर्षे शहरात याच मंडळीना जनमताचा कौल मिळाला नाही व मतदारांमध्ये परिवर्तन ही करता आले नाही हेच चित्र आहे. त्यामुळे आता गांभीर्याने विचार करून काँग्रेस पक्ष पर्यायाने राष्ट्रीय नेत्या सोनियाजी गांधी, राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुनजी खरगे आणि आपण स्वतः यांचे हात बळकट करण्यासाठी ‘कौल पुणेकर मतदारांचा, उमेदवार महाविकास आघाडीचा’ हे सूत्र यंदा अवलंबून जाहीर सभेतून पुणेकरांकडून मिळणाऱ्या कौल नुसार उमेदवार ठरवावा ही पुनश्च विनंती.

लोकसभेची निवडणूक महायुती एकदिलाने लढणार!

  • चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सर्व घटक पक्षांचा निर्धार

पुणे – लोकसभेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासह महायुती एकदिलाने आणि पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री तथा बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे क्लस्टर प्रमुख चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भांडारी, आ. माधुरीताई मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, समन्वय समितीचे प्रमुख तथा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर,शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय माशेलकर, शहर प्रमुख प्रमोदनाना भागगिरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर, जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर यांच्या सह मित्र पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होईल. त्यामुळे निवडणूक काळात महायुतीमध्ये योग्य समन्वय रहावा. प्रचारामध्ये कोणते मुद्दे असावेत, त्यातून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये स्पष्टता असावी यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्षांची बारामती, शिरुर, आणि पुणे लोकसभा मतदारसंघनिहाय बैठक झाली. या बैठकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने आणि पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार केला.

ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये एनडीएला ४०० पार करुन माननीय मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करणं, यावर सर्वांचच एकमत आहे. आजच्या लोकसभा मतदारसंघ निहाय बैठकीनंतर प्रत्येक पक्षाचे नेते विधानसभा मतदारसंघ आणि बूथ स्तरापर्यंत जाऊन संपर्क करणार आहेत.

पाटील पुढे म्हणाले की, जम्मू काश्मीर मध्ये ३७० कलम हटविण्यात आलं. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात बूथवर मिळणाऱ्या मतांमध्ये ३७० मते अधिक मिळाली पाहिजेत, अशी सूचना पक्ष श्रेष्ठींनी केली आहे. त्यामध्ये महायुतीच्या घटक पक्षांची मतांची संख्या काढली, ती देखील ४०० पार करतील, आणि लोकसभेच्या सर्व ४८ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीला राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी मंत्री तथा शिवसेना नेते विजयबापू शिवतारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार भीमराव तापकीर, यांच्या सह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, लोकजनशक्ती पार्टी, शिवसंग्राम शेतकरी संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांतदादा पाटील हे लवकरच बारामती, पुणे आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचा तालुकानिहाय दौरा करणार असून, याद्वारे महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

पुनित बालन ग्रुप तर्फे पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रूपयांची देणगी सुपूर्त !!

पुणे, ४ मार्चः पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलिस कल्याण निधीला ५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन आणि माणिकचंद ऑक्सिरीचच्या संचालिका जान्हवी धारीवाल-बालन यांच्या हस्ते ५ लाख रूपयांचा धनादेश झोन तीनचे डीसीपी संभाजी कदम यांना देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (कारागृह) श्री.अमिताभ गुप्ता, प्रसिध्द सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, माजी आमदार जगदीश मुळीक, मोहनदादा जोशी आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना पुनित बालन ग्रुपचे संचालक पुनित बालन म्हणाले की, पुणे शहराची कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पुणे पोलिस दलाकडे असते. याबरोबरच पुण्यामध्ये होणारे गणोशोत्सव आणि नवरोत्सव निर्विघनपेण पार पडावेत, यासाठीहीसुद्धा पोलिस दल दक्ष असतात. गणेशोत्वामध्ये सलग चोवीस चोवीस आपले कर्तव्य पार पाडतात आणि त्यामुळेच नागरिकांना या सर्व उत्सवाचा आनंद घेता येत असतो. समाजातील कला आणि क्रीडा क्षेत्रातील विविध नागरिकांना प्रोत्साहन देऊन त्यांना त्यांच्या ध्यैयापर्यंत पोहचण्यासाठी मुख्य आधार देण्याचे काम आमच्या ग्रुप तर्फे करण्यात येते. या हेतूनेच पोलिसांच्या असामान्य कामगिरीला सलाम म्हणून तसेच पोलिसांच्या कुटूंबीयांना मदत मिळावी म्हणून आम्ही निधी सुपूर्त केला आहे.

पुनित बालन ग्रुप तर्फे नुकतेच पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथक आणि मीडिया यांंच्या संघांचा समावेश असलेल्या ‘फ्रेंडशिप करंडक’ क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने पुणे पोलिस आणि पुनित बालन ग्रुप यांच्यामध्ये एक मैत्रिपूर्ण सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात पुणे पोलिस संघाने पुनित बालन ग्रुपवर अखेरच्या षटकामध्ये निसटता विजय मिळवला. पहिल्यांदा फलंदाजी करताना पुनित बालन ग्रुपने १० षटकामध्ये ५ गडी गमावून ९२ धावांचे आव्हान उभे केले. कुणाल भिलारे (३९ धावा), पुनित बालन यांनी नाबाद १५ धावा आणि राहूल साठे याने २३ धावा करून संघाच्या डावाला आकार दिला. पुणे पोलिस संघाने अखेरच्या षटकामध्ये हे लक्ष्य गाठले. पप्पु तोडकर याने ४४ धावा आणि किरण गायकवाड याने नाबाद ३५ धावा करून संघाचा विजय साकार केला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः
पुनित बालन ग्रुपः १० षटकात ५ गडी बाद ९२ धावा (कुणाल भिलारे ३९, पुनित बालन नाबाद १५, राहूल साठे २३, अतुल महनगुडे ३-२९) पराभूत वि. पुणे पोलिसः ९.३ षटकात २ गडी बाद ९६ धावा (पप्पु तोडकर ४४, किरण गायकवाड नाबाद ३५, अक्षय जाधव २-१४); सामनावीरः पप्पु तोडकर.

तुळजाभवानीच्या दर्शनासाठी निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला-कारची उसाच्या ट्रॉलीला धडक ४ ठार

लातूर- देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारची ऊसाच्या ट्रॅक्टरशी जोरदार धडक झाली. या अपघातात ४ तरुणांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जण गंभीर जखमी झाले. लातूर-नांदेड महामार्गावरील महाळंग्रा शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

दरम्यान, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हे चार तरुण निघाले होते. मात्र वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. मृत्युमुखी पडलेले चार चौघे नांदेडमधील रहिवासी आहेत. चौघांच्याही मृत्यूने कुटुंबियासह मित्रपरिवारामध्ये शोककळा पसरली आहे.

चाकूर तालुक्यातील महाळंग्रा शिवारात कार आली तेव्हा कारचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. काही क्षणातरच कारने समोरून जात असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरदार धडक दिली. तर चारही तरुणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. स्थानिकांकडून अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मोनू कोतवाल, शिवराज लंकाढाई, कृष्णा मंडके आणि नर्मन कात्रे अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या अपघातात उसाच्या ट्रॉलीचे देखील मागील बाजूने नुकसान झाले. तर अपघात इतका भीषण होता, की कारचा पूर्णपणे चुराडा झाला.

सभागृहात मताच्या बदल्यात लाच घेणाऱ्या खासदार-आमदारांना कायद्याचे संरक्षण नाही

नवी दिल्ली-सर्वोच्च न्यायालयाच्या 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाने खासदार आणि आमदारांना सभागृहात भाषणे दिल्याबद्दल किंवा मतांसाठी लाच घेतल्याच्या खटल्यापासून मुक्ततेच्या प्रकरणात पूर्वीचा निर्णय रद्द केला आहे. विशेषाधिकारांतर्गत खटल्याला सूट देता येणार नाही, असे घटनापीठाने म्हटले आहे.

CJI म्हणाले की आम्ही पीव्ही नरसिंहाच्या निर्णयाशी सहमत नाही ज्यामध्ये खासदार आणि आमदारांना सभागृहात भाषणे देण्यासाठी किंवा मतांसाठी लाच घेतल्याबद्दल खटल्यापासून सूट देण्यात आली होती. 1998 मध्ये, 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाने 3:2 च्या बहुमताने निर्णय दिला होता की अशा प्रकरणांमध्ये लोकप्रतिनिधींवर खटला चालवता येणार नाही. आज न्यायालयाने हा निर्णय रद्द केला.

ऑक्टोबरमध्ये झालेल्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला सांगितले होते की, लाचखोरी हा खटल्यापासून मुक्ततेचा विषय असू शकत नाही. संसदीय विशेषाधिकार म्हणजे कोणत्याही खासदार किंवा आमदाराला कायद्याच्या वरती ठेवणे असा होत नाही. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने संसदेत अवमानकारक विधाने करणे हा गुन्हा मानण्याचा प्रस्ताव फेटाळला होता.

सर्वोच्च न्यायालयासमोर मांडलेल्या प्रस्तावात असे म्हटले होते की, संसद आणि विधानसभांमधील अवमानकारक विधानांसह प्रत्येक प्रकारच्या कामांना कायद्यातून सूट देऊ नये, जेणेकरून गुन्हेगारी कटाखाली असे करणाऱ्यांवर कारवाई करता येईल.

यावर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, सभागृहात काहीही बोलल्यास खासदार आणि आमदारांवर कायदेशीर कारवाई करता येणार नाही. संसद आणि विधानसभेच्या सदस्यांना सभागृहात बोलण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे.

वास्तविक, सीता सोरेन यांच्यावर 2012 मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदानाच्या बदल्यात लाच घेतल्याचा आरोप आहे. सीता सोरेन यांनी त्यांच्या बचावात असा युक्तिवाद केला की त्यांना संविधानाच्या अनुच्छेद 194(2) नुसार सभागृहात ‘काहीही बोलणे किंवा मत देणे’ अशी प्रतिकारशक्ती आहे.

सीता सोरेन यांची बाजू ज्येष्ठ वकील राजू रामचंद्रन यांनी सर्वोच्च न्यायालयात मांडली. नुकतेच लोकसभेत भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसपा खासदार दानिश अली यांच्या विरोधात केलेल्या अपमानास्पद विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले की, मतदान किंवा भाषणाशी संबंधित कोणत्याही गोष्टीसाठी, मग ती लाचखोरी असो किंवा कट असो, कारवाईपासून मुक्तता पूर्ण आहे.

तथापि, अॅटर्नी जनरल आर वेंकटरामानी यांनी सीता सोरेनची केस इतर प्रकरणांपेक्षा वेगळी असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाचा सभागृहाच्या कामकाजाशी संबंध नाही. त्यामुळे सीता सोरेन यांनी राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी लाच घेतल्याचे प्रकरण कायदेशीर कक्षेत येते.

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असा युक्तिवाद केला की कलम 105(2) आणि 194(2) अंतर्गत लाचखोरीला कधीही सूट दिली जाऊ शकत नाही. जरी गुन्हा संसद किंवा विधानसभेतील भाषण किंवा मतदानाशी संबंधित असला तरी तो सदनाबाहेर केला जातो. दोन दिवसांच्या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता.

दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्र लोकार्पण सोहळा संपन्न

नाशिक : भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा संदेश दिला आहे. गौतम बुद्धांची शिकवण आणि प्रेरक विचार आत्मसात करून समाजात रुजविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी
पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज केले.

येवला येथील मुक्तीभूमीवरील १५ कोटी रुपयांच्या निधीतून साकारलेल्या दिमाखदार बौद्ध भिक्खु विपश्यना केंद्र व विविध विकास कामांचे लोकार्पण भिक्खू वाटसनपॉन्ग मेडिटेशन सेंटरचे संचालक फ्रा ख्रुसुतमतावाचाई मठी आणि बुद्ध इंटरनॅशनल वेलफेअर मिशन तसेच इंटरनॅशनल बुद्धीस्ट मॉक ट्रेनिंग स्कूलचे संस्थापक सचिव भिक्खू बी.आर्यपल व मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते.

 यावेळी समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विलास पाटील, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर, प्रांतअधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषदेच्या माजी
अध्यक्षा मायावती पगारे, भिक्खू सुगत, भिक्खू संघरत्न यांच्यासह धम्म बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले, १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवल्यातील याच ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली. त्यावेळी सुमारे १० हजार लोक येथे धर्मांतर घोषणेवेळी उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकालातील
तीन भूमी महत्वाच्या आहेत. जेथे धर्मांतराची घोषणा केली ती मुक्तीभूमी, जेथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली ती नागपूरची दीक्षाभूमी व जेथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ती चैत्यभूमी आहे. करूणा, सत्य व अहिंसा या तत्वावर आधारित बौद्ध धर्माचा स्वीकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वीकारला. बौद्ध धर्माचा इतिहास पाहता सम्राट अशोकाने या धर्माचा प्रचार केला. आपल्या मुलांनाही बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत पाठविले. बुद्धगया येथील महाबोधीवृक्षाच्या फांदीचे रोपण त्यावेळी सम्राट अशोकाच्या मुलीने श्रीलंकेत केले आहे. त्याच बोधीवृक्षांच्या फांदीचे रोपण नाशिक येथील त्रिरश्मी लेणी येथे करण्यात आले आहे.

मंत्री श्री. भुजबळ पुढे म्हणाले, आजचा दिवस हा खूप महत्वाचा व आनंदाचा आहे. या मुक्तीभूमीवर यापूर्वी पहिल्या टप्प्यात सुमारे १५ कोटी रुपये निधीतून भगवान गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, विश्वभूषण
स्तूप व विपश्यना हॉल इ. निर्माण करण्यात आले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या स्थळाला महाराष्ट्र शासनाच्या वतीने ब वर्ग तीर्थक्षेत्र स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. मुक्तीभूमी टप्पा २ अंतर्गत सुमारे १५ कोटी रुपये निधी खर्च करून विविध विकास कामे करण्यात आली आहे. यामध्ये पाली व संस्कृत अभ्यास केंद्र, सुसज्ज ग्रंथालय, ऑडीओ व्हिज्युअल रूम, आर्ट गॅलरी, अॅम्पीथिएटर, मिटिंग हॉल, भिक्खू  पाठशाला, १२ भिक्खू विपश्यना खोली, कर्मचारी निवासस्थान, डायनिंग हॉल, संरक्षण भिंत, अंतर्गत रस्ते व लॅण्डस्केपिंग या कामांचा समावेश आहे. नागरिकांनी या वास्तूंचे संवर्धन करावे, येथे स्वच्छता राखावी तसेच केव्हाही येथे भेट देवून बौद्ध भिक्खु यांच्याकडून विपश्यना संदर्भात ज्ञान प्राप्त करावे व ध्यान करावे जेणेकरून दैनंदिन जीवनातील
ताणतणाव यापासून मानसिक शांती मिळण्यास मदत होईल, असेही मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित धम्मबांधव व नागरिक यांना संबोधित केले.

यावेळी भिक्खू आर्यपाल म्हणाले की, सम्राट अशोकाने गौतम बुद्धांचे विचार जगभरात पोहचविण्यासाठी, ते रुजविण्यासाठी महत्वपूर्ण काम केले. आज मंत्री छगन भुजबळ हे देखील भगवान बुद्धांचा शांतीचा मार्ग देशभरात पोहोचवित आहत. वाईट वागू नका,
विचार करू नका, वाईट काम करू नका व मन स्वच्छ ठेवा या बुद्धांच्या शिकवणीचा प्रत्येकाने अंगीकार करून प्रचार करावा असे भिक्खू आर्यपाल यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरानी मुक्तीभूमी येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस अभिवादन करून बौद्ध वंदना घेतली. त्यानंतर मुक्तीभूमीच्या परिसराची पाहणी केली. तद्नंतर उभारण्‍यात आलेल्‍या भव्‍यदिव्‍य, दिमाखदार बौद्ध भिक्‍खु विपश्‍यना केंद्राचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्‍यानंतर त्यानी इमारतीच्‍या आतील कार्यालयाची पाहणी केली.

प्रास्ताविक विलास पाटील यांनी तर आभार भिक्खू सुगत थेरो यांनी मानले.

यावेळी लोकशाहीर शितल साठे व सचिन माळी यांनी भगवान गौतम बुध्द व भीम गीतांचे सादरीकरण केले.

०००००

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांचे तीर्थक्षेत्र होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे :. ज्याप्रमाणे अमरनाथ हे भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र आहे त्याचप्रमाणे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर भारतीयांसाठी तीर्थक्षेत्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून ) रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री डॉ. बालाजी किनीकर, किसन कथोरे, कुमार आयलानी, ॲड.मनीषा कायंदे, माजी आमदार रवींद्र फाटक, अयोध्येतील राम जन्मभूमी ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद गिरी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते

वाढत्या शहराची गरज लक्षात घेऊन शहराचा विकास करण्यात येणार असून यासाठी निधी कमी पडणार नाही. राम जन्मभूमी येथे राम मंदिराची निर्मिती करून करोडो भारतीयांचे स्वप्न साकार केल्याबद्दल प्रधानमंत्री श्री.मोदी यांचे अभिनंदन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे : नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये देशात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

            डोंबिवली येथील मॉडर्न मॅटर्निटी होम व कॅन्सर रुग्णालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकासकामाचे दुरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले, त्यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री  शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री रवींद्र चव्हाण, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार रवींद्र फाटक आदी मान्यवर उपस्थित होते

             मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी विकास राज्य शासनामार्फत विकास कामे सुरु आहेत.  नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सहकार्यानेही स्वच्छता अभियान, वृक्षारोपण  तसेच इतर विविध लोकोपयोगी उपक्रम  राबविले जात आहेत.

            ते म्हणाले की,   अंबरनाथमध्ये वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाले असून त्या ठिकाणी अधिष्ठाता देखील नियुक्त करण्यात आले आहेत. कळवा येथील रुग्णालयामधील  कार्डिओलॉजी, न्यूरोलॉजी विभाग कॅशलेस करण्यात आलेला आहे. रेडिओलॉजीच्या माध्यमातून जे उपचार होणार आहेत ते माफक दरामध्ये देण्यात येणार आहेत. त्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केल्याचा आवर्जून उल्लेख करुन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

            महात्मा फुले जन आरोग्य अभियाना अंतर्गत यापूर्वी दीड लाखापर्यंत उपचाराची मर्यादा होती. या मर्यादेत वाढ करून आता पाच लाखापर्यंत उपचार घेता येणार आहेत. राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून माता सुरक्षित तर कुटुंब सुरक्षित या अंतर्गत चार कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आरोग्य योजना देखील राज्यांमध्ये राबविण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे डोंबिवली पश्चिम येथील मासळी बाजार, डोंबिवली पूर्व येथील महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी सभागृह, शास्त्रीनगर सामान्य रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह, नवजात शिशु अतिदक्षता विभाग (NICU ), सुनील नगर येथील अभ्यासिका आदी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला.

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन

पुणे : शाकाहार पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल लिखित ‘सुखी जीवन का आधार : शाकाहार’ या शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन केंद्रीय परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्या हस्ते हुबळी (कर्नाटक) येथे झाले. परराष्ट्र मंत्रालयाकडून दिले जाणारे शाहीभोजन शाकाहारी असावे, असे आवाहन डॉ. कल्याण गंगवाल यांनी डॉ. एस. जयशंकर यांना केले. जयशंकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत पुढील काळात प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
कर्नाटकातील वरुर येथील श्री नवग्रह तीर्थक्षेत्र येथे जैन एजीएम आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी आचार्य श्री गुणधरनंदी महाराज यांच्या सानिध्यात हा प्रकाशन सोहळा पार पडला. प्रसंगी परमपूज्य आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, आमदार एम. आर. पाटील, विश्वेश्वरैय्या तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. विद्याशंकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
डॉ. कल्याण गंगवाल म्हणाले, “पुस्तक प्रकाशनासोबतच कर्नाटक राज्यात शाकाहाराचा प्रसार गतिमान होईल. लहान वयातच शाकाहाराविषयी मुलांना माहिती व्हावी, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. त्यामध्ये अनेक चित्रे, आकृत्या, कार्टून्सच्या माध्यमातून रंजकपणे शाकाहाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.”

बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळा 
पुणे : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ, अक्कलकोट पालखी पादुका दर्शन सोहळ्यात स्वामी भक्त बाळासाहेब रामचंद्र ठोंबरे यांना श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे यंदा ८ वे वर्ष होते. 
पुणे महानगरपालिकेजवळील  कॉंग्रेस भवन येथे ३ दिवसीय उत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होते. उत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्री स्वामी समर्थ सेवा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी  पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल, पुनीत बालन ग्रुपचे पुनीत बालन, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, संगीता ठोंबरे, अण्णा थोरात, विनायक घाटे, विजय काजळे, नामदेवराव मोहिते, राजाभाऊ वरखडे, विलास चव्हाण उपस्थित होते. पालखी सोहळ्याचे यंदा २७  वे वर्ष आहे. 
हर्षद कुलकर्णी यांचा ‘स्वामी  भक्ती गीते’ तसेच श्री साई नवनाथ भजनी मंडळ, गुरुवर्य साईभक्त बाळासाहेब परदेशी ग्रुप भजन आणि साई भक्त गजेंद्र परदेशी व सहकलाकार यांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. मुकुंद बादरायणी यांचा  ‘स्वर समर्थ अभंगवाणी’ तर योगेश तपस्वी आणि सहकारी यांचा ‘स्वामीगीत सुगंध’ कार्यक्रम उत्सवादरम्यान झाला. उत्सवात सर्व दिवस  रक्तदान महायज्ञ हा उपक्रम राबविण्यात आला.

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची वार्षिक सभा उत्साहात 

पुणे :
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची वार्षिक सभा  शनिवार,दि.३ फेब्रुवारी रोजी महासैनिक लॉन (घोरपडी) येथे उत्साहात पार पडली. वीर नारी,माजी सैनिक आणि विविध क्षेत्रात यशस्वी पाल्यांचा सत्कार करण्यात आला. मधुमेह तज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले तसेच  स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप सांबरे यांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी संघटनेद्वारे गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. 
ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे संघटना परिवारासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.दीपक पाटील यांची रिक्त असलेल्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष  बाजीराव देशमुख होते.माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाकडे सुरु असलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांनी सर्वांना माहिती दिली.बाळासाहेब जाधव,उमाकांत भुजबळ,प्रकाश भिलारे,संजय मोहिते,दिलावर शादीवान,भूषण डावखर,विजय पाटील,विजय कोलते,रामचंद्र खाडे,रविंद्र शेवाळे,राजू कुऱ्हाडे,पुणे जिल्हा पदाधिकारी तसेच संघटनेचे सदस्य,कुटुंबीय  उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू म्हेत्रे,सौ.शेलार यांनी केले.आभार प्रदर्शन दीपक पाटील यांनी केले.याप्रसंगी संघटनेच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले. 

प्रियंका दमण-दीवमधून निवडणूक लढवू शकतात:काँग्रेस प्रमुख म्हणाले-हायकमांडने डेटा गोळा करण्यास सांगितले; रायबरेलीतूनही उमेदवारीची चर्चा

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी दमण आणि दीवमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवू शकतात. केंद्रशासित प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष केतन पटेल यांनी रविवारी ही माहिती दिली.

केतन म्हणाले- प्रियंका गांधी येथून संभाव्य उमेदवार असू शकतात, कारण पक्षाच्या उच्च कमांडने त्यांना यासाठी डेटा गोळा करण्यास सांगितले आहे. मी या प्रस्तावाचे स्वागत करतो.

केतन म्हणाले की, प्रियांकाच्या आगमनाने संपूर्ण दक्षिण गुजरात जो नेहमीच काँग्रेसच्या पाठीशी राहिला आहे आणि दीवला लागून असलेल्या सौराष्ट्रला येथे फायदा होईल.

पक्ष जो डेटा गोळा करत आहे, त्यात ग्राउंड रिॲलिटी सारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. या दरम्यान मतदारांची पसंती आणि उमेदवारांची मागील कामगिरी पाहिली जाईल.

ध्या काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची एकही यादी जाहीर केलेली नाही. मात्र, दमण आणि दीव व्यतिरिक्त प्रियंका गांधी उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधूनही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

रायबरेलीच्या विद्यमान खासदार सोनिया गांधी यांनी यावेळी राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस पक्ष सोनियांच्या जागेवरून त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला तिकीट देऊ शकतो.

प्रियंका यांनी अद्याप कोणतीही निवडणूक लढलेली नाही
2024 च्या लोकसभा निवडणुकीत प्रियंका गांधी यांना काँग्रेस पक्षाने तिकीट दिल्यास ही त्यांची पहिली निवडणूक असेल. याआधी प्रियंका यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवली नव्हती.

प्रियंका यांनी 2004 मध्ये राजकारणात प्रवेश केला, जेव्हा त्यांनी तिची आई सोनिया यांच्या प्रचाराची जबाबदारी घेतली. 2019 पर्यंत त्या अमेठी आणि रायबरेलीमध्ये सक्रिय होत्या. 2019 मध्ये त्यांची पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2023 मध्ये काँग्रेसने प्रियंका यांच्याकडून उत्तर प्रदेशची जबाबदारी परत घेतलीदिव -दमन :