पुणे :
शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेची वार्षिक सभा शनिवार,दि.३ फेब्रुवारी रोजी महासैनिक लॉन (घोरपडी) येथे उत्साहात पार पडली. वीर नारी,माजी सैनिक आणि विविध क्षेत्रात यशस्वी पाल्यांचा सत्कार करण्यात आला. मधुमेह तज्ज्ञ डॉ.जगन्नाथ दीक्षित यांनी आरोग्यदायी जीवनशैलीबाबत मार्गदर्शन केले तसेच स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप सांबरे यांनी महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले.याप्रसंगी संघटनेद्वारे गेल्या वर्षभरात केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला.
ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे संघटना परिवारासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.दीपक पाटील यांची रिक्त असलेल्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष बाजीराव देशमुख होते.माजी सैनिकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात शासनाकडे सुरु असलेल्या पाठपुराव्याबाबत त्यांनी सर्वांना माहिती दिली.बाळासाहेब जाधव,उमाकांत भुजबळ,प्रकाश भिलारे,संजय मोहिते,दिलावर शादीवान,भूषण डावखर,विजय पाटील,विजय कोलते,रामचंद्र खाडे,रविंद्र शेवाळे,राजू कुऱ्हाडे,पुणे जिल्हा पदाधिकारी तसेच संघटनेचे सदस्य,कुटुंबीय उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू म्हेत्रे,सौ.शेलार यांनी केले.आभार प्रदर्शन दीपक पाटील यांनी केले.याप्रसंगी संघटनेच्या दिनदर्शिकेचे वाटप करण्यात आले.