सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे विशेष प्रयत्न
मुंबई, दि. ६ – पालघर जिल्ह्यातील मनोर ते वाडा (राज्य मार्ग ३४ ) व वाडा ते भिवंडी (राज्य मार्ग ३५) या एकूण ६४.३२ किमी लांबी रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामध्ये सिमेंट काँक्रिटीकरण , नागरी वसाहती दरम्यान पक्की गटर व सांडपाणी निचरा व्यवस्थाच्या कामास विशेष बाब म्हणून या सर्व कामांसाठी रुपये १०४२.६० कोटी किंमतीच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नामुळे गेले काही वर्षे रखडलेल्या या महामार्गाचे काम अखेर मार्गी लागली आहे.
ठाणे व पालघर जिल्ह्यातील रस्त्यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता सरसकट पूर्ण करण्याचा धोरणात्मक निर्णय मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतला आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे ठाणे व पालघर जिल्ह्यातील समस्त ग्रामस्थ वाहतूकदार व अवजड वाहने यांना मोठ्या प्रमाणात दिलासा प्राप्त झालेला आहे.
खाजगीकरणांतर्गत ठाणे जिल्हयातील मनोर ते वाडा व वाडा ते भिवंडी हया एकूण लांबी ६४.३२ किमी रस्त्याचे व देखभाल दुरुस्ती करणे. या कामास सुप्रीम मनोर वाडा भिवंडी इन्फ्रास्ट्रक्चर प्रा लिमिटेड कंपनीला २०१० मध्ये रोजी काम देण्यात आले होते. त्यानंतर रस्त्याची कामे पूर्ण करून २०१३ पासून पथकर सुरू करण्यात आलेला होता .
उद्योजकाकडुन रस्त्याची आवश्यक अशी देखभाल व दुरुस्ती व रस्त्याचे सुधारणेचे काम पुर्ण झालेली नव्हती जिल्हास्तरीय बैठकांमध्ये याबाबत लोक प्रतिनिधींकडून गंभीर तक्रारी झाल्या होत्या. रस्ता मोठया प्रमाणात खराब होऊन वाहतुकीस असुरक्षित होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मार्फत रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी वारंवार सुचना देऊन सुध्दा, उद्योजकाकडून आवश्यक ती कार्यवाही वेळच्यावेळी होत नव्हती त्यामुळे करारनाम्याच्या अटी शर्तीनुसार २०१९ मध्येउद्योजकाशी झोलेला करारनामा संपुष्टात आणून पथकर वसुली बंद करण्यात आलेली आहे.
परंतु सदर रस्त्यालगत झालेले औद्योगीकरण व नागरी वसाहत यामुळे तसेच मूळ उद्योजकाने देखभाल दुरुस्ती न केल्यामुळे झालेली रस्त्याची दुरावस्था फक्त डांबरीकरणाने किंवा दुरुस्ती करून टिकत नसल्याने याबाबत शासन स्तरावर मंत्री चव्हाण यांनी पुढाकार घेऊन सदरच्या कामास मंजुरी दिली आहे.