महाराष्ट्रातील भाजपचे नेते जागावाटपावर चर्चा करण्यासाठी दिल्लीत गेले आहेत. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अतिशय महत्त्वाची बैठक होणार आहे. दरम्यान, दिल्लीत गेल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सध्या ज्या काही माध्यमांमध्ये चर्चा चालू आहेत त्या चूकीच्या आहेत. आमच्या मित्रपक्षांना आम्ही सन्मानजनक जागा देणार आहोत, असे विधान त्यांनी केले.
- भाजपने पहिल्या यादीमध्ये ज्या जागा जाहीर केल्या आहेत तिथे भाजप स्वतंत्र आहे. इतर ठिकाणी भाजप अलायन्समध्ये असल्याने त्यावर चर्चा सुरु आहेत. त्यानंतर जागावाटप जाहीर केलं जाईल.
- प्रत्येक राज्यासोबत केंद्रीय नेतृत्वाकडून चर्चा केली जात आहे. आज महाराष्ट्रातील आम्ही नेते चर्चेसाठी आलेलो असून युतीमध्ये असलेल्या राज्यांची यादी लवकरच देणार आहोत.
- मित्र पक्षांना एक डिजिट जागा मिळतील, असं सांगणं म्हणजे पतंगबाजी आहे. अशा प्रकारे बतावण्या करणं योग्य नाही. आमच्या दोन्ही साथीदारांना योग्य तो सन्मान देऊन जागा दिल्या जातील.