मुंबई, दि. ६ : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त कार्यालयातील विभागीय कृषी सहसंचालक (सर्व) यांच्या आस्थापनेवरील कृषी सेवक पदांसाठी भरतीप्रक्रिया आय.बी.पी.एस या संस्थेमार्फत १६ व १९ जानेवारी रोजी राबविण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अद्यापही न लागल्यामुळे उमेदवारांकडून सातत्याने विचारणा होत आहे. भरती प्रक्रिया अंतिम टप्यात असून यथाशिघ्र निकाल लावण्यासाठी आय.बी.पी.एस या संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहे, अशी माहिती कृषी आयुक्तालयाचे प्रशासकीय अधिकारी अखिल शेंडे यांनी दिली आहे.