की खासदार होऊन पीएम बी व्हायचंय? ठराविक लोकांचीच भरती करायचीय काय?
दिल्लीत गणितं..पुण्यात फलकं
फडणवीस साहेब ही पतंग बाजी नव्हे
पुणे: पुण्यातील भाजपा मध्ये महापालिकेत सलग 5 वर्षे पदाधिकारी पद भोगल्यावर आता पुन्हा लोकसभेची उमेदवारी मागणार्या माजी महापौर यांना पक्षांतर्गत प्रचंडच विरोध होताना दिसत असून आज महापालिकेच्या बाहेर यासंदर्भात लागलेला एक फ्लेक्स पालिकेने काढून आपल्या ताब्यात घेतला आहे.
आता तुला नक्कीच पाडणार असं वक्तव्य एकेरी वक्तव्य असलेल्या या फलकावर, स्टँडींग दिली, महापौर पद दिलं, सरचिटणीसपद दिलं… खासदारकी पण देणार? तर तुला नक्की पाडणार..
असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय. आणि खाली कष्टाळू भाजपा कार्यकर्ते असे म्हटले आहे. हाच फलक आता महापालिका सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात असताना काढलेला हा फोटो पहा..