Home Blog Page 1101

भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पहरेदार’ या जहाजाने ब्रुनेईमध्ये मुआरा येथे घेतला थांबा

नवी दिल्ली-

भारतीय तटरक्षक दलाच्या ‘समुद्र पहरेदार’ या प्रदूषण नियंत्रण जहाजाने ब्रुनेईमध्ये मुआरा येथे 9 एप्रिल 2024 ला थांबा घेतला. आसिआन देशांत सागरी तैनातीचा भाग म्हणून हा थांबा घेतला गेला. भारतीय तटरक्षक दलाच्या विशेष जहाजाने आसिआन देशाला भेट देण्याचा हा कार्यक्रम म्हणजे, सागरी प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2022 मध्ये घोषित केलेल्या भारत-आसिआन उपक्रमाचा भाग आहे. कंबोडियामध्ये आसियान देशांच्या ‘संरक्षण मंत्री व इतर’ बैठकीत ही घोषणा झाली होती.

सदर तीन दिवसांच्या थांब्यात समुद्र पहरेदार या नौकेवरील कर्मचारीवृंद व्यावसायिक देवघेव करतील. सागरी प्रदूषण प्रतिसाद, सागरी शोध व बचाव, आणि सागरी कायद्याची अंमलबजावणी यावर याचा भर असेल. एकमेकांच्या डेकवर प्रशिक्षण, विषयतज्ज्ञांकडून ज्ञानाची देवाणघेवाण आणि ब्रुनेई सागरी संस्थांबरोबर क्रीडास्पर्धा आदी कार्यक्रम यावेळी घेतले जातील.

भारत आणि ब्रुनेईच्या तटरक्षक दलांच्या दरम्यान संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने ही भेट महत्त्वाची ठरेल, शिवाय आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया या संकल्पनांचे समर्थन करणारी जहाजबांधणी क्षेत्रातील भारताची ताकद दाखवून देण्यासाठीही ही भेट उपयुक्त ठरेल. तसेच, समुद्र पहरेदार वर स्वार झालेले राष्ट्रीय छात्र सेनेचे 25 छात्र तेथील स्थानिक तरुणांच्या सहयोगाने किनारा स्वच्छता कार्यक्रमात भाग घेतील. सरकारच्या ‘पुनीत सागर अभियानाचा’ हा भाग असेल.

परकीय देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखणाऱ्या देशांबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यास आणि द्विपक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यास भारतीय तटरक्षक दल वचनबद्ध आहे.

ही सागरी तैनात म्हणजे एकप्रकारे, त्या वचनबद्धतेचाच दाखला आहे. मुआरापूर्वी या जहाजाने व्हिएतनाम आणि फिलिपाईन्सला भेट दिली होती. आसियान क्षेत्रात धोरणात्मक सागरी संबंध सुरळीत राखण्यासाठी भारताचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेच हे द्योतक आहे.

सागरी प्रदूषणावर सर्वांनी मिळून उपाय करण्यासाठी भारताची कटिबद्धता, सागरी सहकार्य वाढवून सागरी सुरक्षेत वाढ करण्याचे भारताचे प्रयत्न, हे ‘सागर(SAGAR) – सर्व प्रदेशांत सुरक्षा आणि वृद्धी’ तसेच ‘पूर्वेकडे कृती (act east)’ आणि हिंद-प्रशांत दृष्टिकोन या धोरणांशी सुसंगत आहे. भारतीय तटरक्षक दलाचे समुद्र पहरेदार जहाज आसिआन क्षेत्रात तैनात होते, हे भारताच्या याच प्रयत्नांचे प्रतिबिंब म्हटले पाहिजे.

भरतनाट्यमने विस्मरणीय केली ती जादूई संध्या

पुणे-तक्रार करणारी गोपिका, लोणी चोरणारा अवखळ कृष्ण आणि गोपिकेहून अधिक विश्वास आपल्या लाडक्या मुलावर ठेवणारी प्रेमळ आई यशोदा यांचे सुंदर चित्र नृत्याद्वारे सादर होत होते  अलारिपू आणि शिवस्तुतीमध्ये तिघींचा उत्कट समन्वय ,श्रीमती रोजा कन्नन आणि त्यांच्या शिष्या सहाना सेल्वगणेश ,सुचेता भिडे चापेकर आणि त्यांच्या कन्या व शिष्या अरुंधती पटवर्धन तसेच नात सागरिका पटवर्धन यांच्या नृत्याने खिळवून ठेवलेली ती संध्या …अविस्मरणीय जणू जादुई संध्या ठरली .

अमृतांजली फेस्टिवल ऑफ क्लासिकल डान्सची येथे सांगता झाली. निपुण आणि प्रख्यात कलावंतांच्या तीन मंत्रमुग्ध करणाऱ्या भरतनाट्यम सादरीकरणांची मेजवानी पुणेकरांना प्राप्त झाली. महोत्सवाच्या निमंत्रक, समन्वयक आणि क्युरेटर डॉ. शशीकला रवि दरवर्षी विमाननगरमधील अत्याधुनिक अमृतांजली डान्स स्टुडिओमध्ये अमृतांजली नृत्य महोत्सवाचे आयोजन करतात. डॉ. रवि स्वत: निपुण भरतनाट्यम कलावंत आहेत, त्यांनी दिग्गज गुरूंच्या हाताखाली प्रशिक्षण घेतले आहे. त्या नृत्यदिग्दर्शनही करतात. भरतनाट्यम तसेच भरताच्या अन्य शास्त्रीय नृत्यप्रकारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्या काम करतात. दरवर्षी अमृतांजली फेस्टिवल ऑफ क्लासिकल डान्समध्ये कला सादर करण्यासाठी तसेच कार्यशाळा घेण्यासाठी त्या प्रख्यात कलावंत व गुरूंना आमंत्रित करतात. याशिवाय, सर्व शास्त्रीय नृत्यप्रकारांतील नवोदित कलावंतांना व्यासपीठ देण्यासाठी डॉ. रवि नोव्हेंबरमध्ये अमृतांजली नृत्योत्सवाचे आयोजन करतात.

या वर्षी दोन दिवस त्यांनी चेन्नईतील कलाइमामानी रोजा कन्नन यांना आमंत्रित करून भरतनाट्यम कार्यशाळेचे आयोजन केले होते. पुण्यातील नृत्य कलावंत या कार्यशाळेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. पद्मभूषण दिवंगत कलानिधी नारायण यांनी नृत्यदिग्दर्शित केलेली दोन अभिनय पद्मे  श्रीमती रोजा कन्नन यांनी उत्साही विद्यार्थ्यांना शिकवली.डॉ. शशिकला रवि यांनी प्रमुख पाहुण्या गुरू शमा भाटे, अन्य प्रमुख पाहुणे आणि प्रेक्षक यांचे स्वागत केले. प्रेक्षागृह खचाखच भरलेले होते आणि सादरीकरणे पूर्ण होईपर्यंत तीन तास ते तसेच भरलेले राहिले.

डॉ. रवि यांनी ओमकारकारिणीचा शोध सर्वांपुढे सादर करून सादरीकरणांची सुरुवात केली. ओमकारकारिणी ही विश्वाची दैवी माता सर्वव्यापी स्त्री ऊर्जेचा स्रोत समजली जाते. डॉ. रवि यांनी ज्या कौशल्याने नृत्य सादर केले, ते बघून प्रेक्षक अचंबित झाले. निर्माती, जतनकर्ती व संहारक असे मातेचे अनेक वैविध्यपूर्ण गुण उत्तम नृत्यदिग्दर्शनाद्वारे तसेच डॉ. रवि यांच्या अप्रतिम सादरीकरणाद्वारे व्यक्त केले गेले. सूक्ष्म तपशिलांनी युक्त असा अभिनय आणि जटील पदन्यास ही त्यांच्या सादरीकरणाची वैशिष्ट्ये होती.

त्यानंतर श्रीमती रोजा कन्नन आणि त्यांच्या शिष्या सहाना सेल्वगणेश यांनी अप्रतिम नृत्य सादर केले. त्यांच्या सादरीकरणाचे नाव मॅजिक ऑफ मरगम असे होते. गुरू रोजा कन्नन यांनी पदवर्णन मोहमाना आणि पद्म सखी प्राणातील उत्कट अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

अखेरचे साजरीकरण ‘परंपरा’तर्फे झाले. गुरू सुचेता भिडे चापेकर आणि त्यांच्या कन्या व शिष्या अरुंधती पटवर्धन तसेच नात सागरिका पटवर्धन यांनी नृत्य सादर केले. त्यांनी एकत्रितपणे काही खिळवून ठेवणारी सादरीकरणे दिली. तक्रार करणारी गोपिका, लोणी चोरणारा अवखळ कृष्ण आणि गोपिकेहून अधिक विश्वास आपल्या लाडक्या मुलावर ठेवणारी प्रेमळ आई यशोदा यांचे सुंदर चित्र त्यांनी नृत्याद्वारे उभे केले.  अलारिपू आणि शिवस्तुतीमध्ये या तिघींचा समन्वय उत्कृष्ट होता.

महोत्सवाची सांगता भैरवी रागातील भजनी ठेक्यातील ‘हे प्रभो’ या भजनाने झाली. गुरू सुचेता चापेकर यांनीच हे सादरीकरण केले. त्यानंतर आश्वासक, शांत व सुखद वातावरणात पडदा पडला.

ही संध्याकाळ खरोखर जादूई होती. पुण्याच्या प्रेक्षकांना अप्रतिम भरतनाट्यम सादरीकरणांद्वारे खिळवून ठेवण्याचे सर्व श्रेय डॉ. शशिकला रवि यांना जाते. 

सह्याद्रि हॉस्पिटल्समध्ये पुण्यातील महिला इंजिनीयरला झालेल्या गार्टनर्स डक्ट सिस्ट या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार 

पुणे, 10 एप्रिल, 2024: पुण्यातील सह्याद्रि हॉस्पिटलमध्ये २७ वर्षीय इंजिनीयर प्रियांका (नाव बदलण्यात आले आहे) यांना झालेल्या गार्टनर्स डक्ट सिस्ट या दुर्मिळ आजारावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या तज्ञ डॉक्टरांच्या टीममधील डॉ मिनी साळुंखे आणि डॉ गौरी जगदाळे यांनी प्रियांका यांच्यावर इन्टॅक्ट सिस्टचे सर्जिकल एक्सिजन (मार्सपियलायजेशन) करून वैद्यकीय उपचारांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे.

गार्टनर डक्ट सिस्ट म्हणजे योनिमार्गामध्ये तयार होणारी एक प्रकारची गाठ. वयस्क महिलांपैकी २५% जणींमध्ये गार्टनर नलिका असतात पण फक्त १% महिलांमध्ये त्याचे रूपांतर गाठीमध्ये (गार्टनर्स डक्ट सिस्ट) होते, सामान्यत: याचा आकार २ सेमीपेक्षा लहान असून याची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र लक्षणे जरी दिसून येत नसली तरी सिस्टचा आकार वाढू शकतो. आणि जर सिस्ट मोठे असेल तर सर्जरी करावी लागू शकते. पेल्विक तपासणीद्वारे याचे निदान केले जाते. त्यामुळेच प्रियांका यांची केस अपवादात्मक ठरली. डॉ साळुंखे आणि डॉ जगदाळे यांची वैद्यकीय कौशल्ये, समन्वय आणि सह्याद्रि हॉस्पिटल्समधील प्रगत वैद्यकीय सुविधा यामुळे हे उपचार यशस्वी होऊ शकले.

सह्याद्रि हॉस्पिटल्स, हडपसर येथे करण्यात आलेल्या या प्रक्रियेमध्ये रुग्णाच्या जननेंद्रियाच्या बाह्य मांसल भागास एक छोटा कट देण्यात आला. यानंतर मार्सुपियालायझेशन (Marsupialization) या शस्त्रक्रिया तंत्राचा वापर केला गेला. ज्याद्वारे गळूमध्ये स्लीट बनवणे, त्याच्या कडा शिवणे आणि त्यातील द्रवाचा निचरा होऊ शकेल अशा पद्धतीने ती जागा उघडी ठेवणे याचा समावेश होता. अत्यंत नाजुक जागी असलेल्या या गाठीचा आकार ५X५ सेमी म्हणजे सर्वसामान्य केसेसमध्ये आढळणाऱ्या सिस्टपेक्षा बराच मोठा होता. त्यामुळेच ही केस दुर्मिळ व आव्हानात्मक होती. प्रक्रियेनंतर प्रियांका यांच्या तब्येतीत अतिशय वेगाने सुधारणा होत असल्याचे दिसून आले, सर्जरीनंतर अवघ्या सहा तासांत त्या पुन्हा चालू शकल्या.

मॉमस्टोरी बाय सह्याद्रि हॉस्पिटल्सच्या संचालिका आणि ऑब्स्टट्रिक्स विभागाच्या प्रमुख डॉ मिनी साळुंखे यांनी सांगितले, गार्टनर्स डक्ट सिस्ट खूपच दुर्मिळ आहे. प्रियांकाच्या केसमध्ये सिस्टचा मोठा आकार आणि ते असलेली जागा यामुळे आमच्यासमोर खूप मोठे आव्हान होते. सर्जिकल एक्सिजन यशस्वी झाले आणि रुग्णाच्या हालचालींवर फारसा परिणाम होऊ न देता सिस्ट पूर्णपणे काढून टाकण्यात आलेत्यांची तब्येत वेगाने सुधारली याचा आम्हाला खूप आनंद आहे.

अतुलनीय वैद्यकीय देखभाल प्रदान करण्यासाठी सह्याद्रि हॉस्पिटल्स वचनबद्ध आहे.  प्रगत प्रक्रिया व उपचारांमध्ये हे रुग्णालय सातत्याने आघाडीवर असून आपल्या रुग्णांच्या कल्याणासाठी समर्पित आहे.

मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर; आतापर्यंत १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण

मुबंई, दि. १० : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्यापासून भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर प्राप्त तक्रारींचे तातडीने निवारण करण्यात येत आहे. महाराष्ट्रातील मतदारांकडून आतापर्यंत १४ हजार ७५३ इतक्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यांपैकी १४ हजार ३६८ तक्रारींचे निवारण करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

देशात मतदारांच्या तक्रारींचे निवारण करण्यामध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. नागालँड पहिल्या आणि गुजरात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र नागालँडमध्ये आतापर्यंत फक्त १८ तर गुजरातमध्ये ७१२४ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत,

महाराष्ट्रातील तक्रारींमध्ये पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे २ हजार ८१८, मुंबई उपनगरातून २ हजार ३३१ आणि ठाण्यातून २ हजार १८३ तक्रारी आलेल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातून सर्वांत कमी म्हणजे ३४ तक्रारी आलेल्या आहेत.

सर्वाधिक तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्यांमध्ये ४ हजार ५५६ तक्रारींचा समावेश आहे. मतदार ओळखपत्रावरील दुरुस्त्या करण्यास विलंब झाल्याबद्दल १ हजार ८४८ तक्रारी आल्या आहेत. ई- मतदार ओळखपत्राविषयी १०४७ तक्रारी आहेत, तर नवे ओळखपत्र मिळवण्याधा अर्ज नाकारल्याबद्दल ५२१ तक्रारी दाखल झालेल्या आहेत. मतदार यादीत नाव न सापडल्याबद्दल ५०० तक्रारी आलेल्या आहेत.

तक्रारींमध्ये मतदार ओळखपत्र, मतदार यादी, मतदान चिट्ठी (स्लिप), निवडणूक आयोगाची विविध अॅप्स, राजकीय पक्ष, मतदान दिन आणि इतर या विषयांवरील तक्रारींचा समावेश आहे. मतदारांच्या तक्रारींचे निवारण करताना त्यांना समाधानकारक उत्तरे दिली जातात. मतदार ओळखपत्र प्राप्त न झालेल्या मतदारांना मतदार नोंदणीपासून ओळखपत्र मिळेपर्यंतचा कालावधी साधारण ४५ दिवसांचा असतो. मात्र ई-ओळखपत्र दहा-बारा दिवसांत मिळू शकते, त्यासाठी त्यांनी मतदार यादीत मोबाइल क्रमांक नोंदवावा, असे सांगितले जाते, कोणाला मतदार यादीत नाव सापडत नसल्यास त्यांना नाव शोधण्याची प्रक्रिया सांगितली जाते. तसेच कोणाचे नाव वगळले गेले असल्यास त्याचे कारण आणि प्रक्रिया सांगितली जाते. प्रश्नकर्त्यांचे उत्तराने समाधान न झाल्यास त्याला पुन्हा प्रश्न विचारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

गोदरेज इंटेरिओचे वाघोली येथे 3200 चौरस फुटांचे नवीन आउटलेट लॉन्च

पुणे, 10 एप्रिल 2024: गोदरेज ग्रुपची प्रमुख कंपनी गोदरेज आणि बॉयस या कंपनीचा गोदरेज इंटेरिओ भारतातील आघाडीचा फर्निचर आणि इंटिरियर सोल्यूशन्स ब्रँड आहे. हा ब्रँड आधुनिक भारतीय घरासाठी मूल्य आणि सौंदर्यशास्त्र प्रदान करून पुण्यातील ग्राहकांसाठी अधिक वर्धित अनुभव देण्यासाठी सज्ज आहे. गोदरेज इंटेरिओचा सध्या 15% बाजार हिस्सा आहे आणि 2024-25 या आर्थिक वर्षात वेस्टर्न मार्केटमध्ये 60 नवीन स्टोअर्सचे उद्घाटन करण्याची त्यांची धोरणात्मक योजना आहे.

पुण्यात ग्राहकांची मागणी वाढल्याने, गोदरेज इंटेरिओ त्यांची सर्वचॅनेल उपस्थिती मजबूत करण्यासाठी  ग्राहकांना अॅक्सेस आणि अखंड खरेदी अनुभव सुनिश्चित करण्यासाठी कटिबद्ध आहे. या ब्रँडच्या संपूर्ण महाराष्ट्रात 15 शोरूम्स, 70 चॅनल पार्टनर्स आणि 110 रिटेल स्टोअर्स आहेत आणि त्यांची उपस्थिती 25 शोरूम्स, 100 चॅनल पार्टनर्स आणि राज्यभरात 200 हून अधिक रिटेल स्टोअर्सच्या विस्तृत नेटवर्कपर्यंत विस्तारण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

याबद्दल बोलताना गोदरेज इंटेरिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष (B2C) देव सरकार म्हणाले कीगोदरेज इंटेरिओ मनात घर केलेला ब्रँड आहे आणि देशभरात त्याचे मोठ्या प्रमाणात ग्राहक आहेतपुण्याच्या घरगुती फर्निचर मार्केटमध्ये 18% पेक्षा जास्त वार्षिक वाढ होत असतानाविविध फर्निचर श्रेणींच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहेहोम स्टोरेजबेडरूम सेटलिव्हिंग रूम फर्निचरमॉड्यूलर वॉर्डरोब आणि स्वतंत्र निवासस्थानांसाठी स्वयंपाकघर यांची मागणी प्रचंड आहेआम्ही या ट्रेंडचा लाभ घेण्यासाठी आणि आमची बाजारातील उपस्थिती वाढवण्यासाठी धोरणात्मकदृष्ट्या तयार आहोत. FY27 पर्यंत पश्चिम भारतातून अंदाजे INR 400 कोटी कमाईचे लक्ष्य ठेवून पुढील तीन वर्षांत 20% चक्रवाढ वार्षिक वाढ दर (CAGR) साध्य करणे हे आमचे ध्येय आहेशिवायपुण्याचे भरभराट होत असलेले रिअल इस्टेट क्षेत्रघरखरेदीची मागणी आणि व्यवसायाला पोषक वातावरण यामुळे अतिरिक्त संधी उपलब्ध आहेतमोठ्या आकाराच्यामध्यम आकाराच्या आणि परवडणाऱ्या घरांसाठी वाढती पसंती पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटचे गतिशील स्वरूप अधोरेखित करतेज्यामुळे आमच्यासारख्या संघटित फर्निचर ब्रँडना फायदा होतो.

अत्याधुनिक सुविधा केंद्रात स्थितपुण्याजवळील आमचे शिरवळ उत्पादन युनिटच्या माध्यमातून आम्ही देशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधीसाठी योगदान देत आहोत.

मजबूत ब्रँड ओळखीमुळेआम्हाला खात्री आहे की हा ब्रँड ग्राहकांचा अधिक विस्तार करेल आणि वेगाने विस्तारणाऱ्या गोदरेज इंटेरिओ कुटुंबात अधिक संरक्षक आणेल.”

गोदरेज इंटेरिओने नुकताच केलेला ‘होमस्केप्स’ अभ्यास ग्राहकांच्या व्यक्तिमत्त्वाची अनोखी अभिव्यक्ती आणि मूल्ये त्यांच्या घराच्या आणि घराच्या सजावटीच्या निवडींमध्ये प्रकट करतो. अभ्यासानुसार, निम्म्याहून अधिक भारतीय ग्राहक (58%) त्यांच्या पहिल्या स्वतंत्रपणे खरेदी केलेल्या फर्निचरशी जास्त भावनिकरित्या जोडलेले असतात. याव्यतिरिक्त, 74% प्रतिसादकर्त्यांचा असा विश्वास आहे की त्यांच्या घरांसाठी निवडलेले फर्निचर आणि सजावट केवळ वैयक्तिक वाढच दर्शवत नाही तर व्यावसायिक आणि आर्थिक प्रगती देखील दर्शवते. देशभरातील 2822 भारतीयांसह केलेले हे सर्वेक्षण लोकांचे त्यांच्या राहण्याच्या जागेशी असलेल्या भावनिक नात्यांची वीण दर्शविते.

गोदरेज इंटिरिओने त्यांचे नवीन आउटलेट द होम मेकर्स, वाघोली, पुणे येथे सुरू केले आहे. 3200 चौरस फूट पसरलेले हे स्टोअर गोदरेज इंटेरिओच्या पुणे क्षेत्रामध्ये आणि भारतातील पाश्चात्य बाजारपेठांमध्ये किरकोळ उपस्थितीला चालना देईल. चौगुले कॉम्प्लेक्समधील कर्मा एंटरप्रायझेस येथे या गोदरेज इंटेरिओ स्टोअरचे उद्घाटन हा स्टायलिश घरापासून विस्तृत श्रेणी ऑफर करणारा एक महत्त्वाचा क्षण आहे.फर्निचर ते आरामदायक गाद्या, हे स्टोअर तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा उंची करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. नवीन स्टोअर लॉन्च करताना ब्रँड होम फर्निचरवर 35% पर्यंत सूट देत आहे.

मुनगुंटीवार यांच्यावर कारवाई करा: पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी महिला कार्यकर्त्यांना फोटो घेण्यास केली मनाई

पुणे- बहीण भावाच्या नात्याबद्दल बदनामीकारक , संस्कृतीला हानिकारक वक्तव्य करणाऱ्या सुधीर मुनगुंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून स्वीकारताना पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना फोटो काढून देण्यास मनाई केल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांना आचार संहितेचे कारण दिले आहे.
दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सह महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर ,भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनाही या कार्यकर्त्यांनी निवेदने पाठविली आहेत . पोलीस आयुक्तांना निवेदन देताना महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी.
सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव सीमा महाडिक. सुवर्ण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष. छाया जाधव माजी अध्यक्ष पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी सोनिया ओवाळ उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पुणे. ह्या उपस्थित होत्या.
चंद्रपूर येथे भाजपची सभा होती त्या मंचावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्यावर घाणेरडे गलिच्छ आणि आक्षेपार्ह असे विधान केले आहे. विरोधकांवर टीका ही झालीच पाहिजे परंतु त्या मध्ये महिलांचा अपमान कदापि सहन होणार नाही खास करून पवित्र बहीण भावाच्या नात्याचा अपमान तर अजिबात सहन होणार नाही.त्या नेत्यांच्या विधानातून त्यांच्या विकृत मानसिकतेची आणि असंस्कृतिक संस्कारांची कल्पना येऊ शकते. आम्ही सावित्रीच्या लेकी आपणास अशी मागणी करतो की आपण पोलीस ,महिला आयोग अंतर्गत ताबडतोब ह्या नेत्यावर कारवाई करावी. या नेत्याच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन त्यांची उमेदवारी रद्द करावी. असे संगीता तिवारी यांनी म्हटले आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वेंच्या ‘ऊन सावली’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

मुंबई : नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ऊन सावली’ या चित्रपटाला प्रेक्षकांचं महाराष्ट्रभर भरभरून प्रेम मिळालं. कांद्या पोह्याच्या कार्यक्रमातून पार पडलेल्या लग्नात प्रेमाचा गंध कसा दरवळत जातो; सांगणाऱ्या या चित्रपटाचा १२ एप्रिल २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.

प्रणय आणि अन्वी त्यांच्या पालकांच्या आग्रहास्तव लग्नासाठी एकमेकांना भेटायला तयार होतात. प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. असं असतानाही त्यांचं लग्न होतं खरं, मात्र लग्नानंतर काय गोंधळ सुरू होतो ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.

भूषण प्रधान आणि शिवानी सुर्वे यांच्यासह तिचा खऱ्या आयुष्यातील पती अजिंक्य ननावरे हे चित्रपटाचे प्रमुख कलाकार आहेत. याचबरोबर राज शरणागत, अंकित भोईर, विकास हांडे, श्वेता कामत आणि प्रिया तुळजापूरकर यांच्या चित्रपटात धमाकेदार भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन दिवाकर नाईक यांनी केले आहे.

“एक आशावादी आणि एक निरर्थक विचार सरणीचे दोन पात्र या चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहेत. निरर्थक विचारातून एक आशेचं किरण तेवत ठेवलं तर आयुष्य सुंदर होतं. प्रेमाचा हा विलक्षण विचार मांडणारा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आम्हाला आशा आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री.सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.
नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी :- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

पीव्हीपी आर्किटेक्चर काॅलेजचे एक्झिट प्रदर्शन संपन्न

विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टचर
पुणे :  विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टचरच्या विद्यार्थ्यांचे एक्झिट वास्तु प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.  एका वास्तूचा तिच्या कल्पनेपासून ते अंतिम बांधकाम पूर्ण होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पातून सादर केला. 

बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हे तीन दिवसीय प्रदर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यांकन करण्याकरिता भारतातील १६ नामवंत वास्तुरचनाकार परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अहमदाबाद  येथून पी. व्ही. के रामेश्वर व सूर्या काकाणी; दिल्ली येथून  संजय कानविंदे,तनुजा कानविंदे, आय.एम चिस्ती; बंगळुरू येथून आनंद कृष्णमूर्ती व विजय नार्णपट्टी; आणि मुंबई येथून विकास दिलावरी परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर पुण्यातून विक्रम हुंडेकर, मनिष बँकर, अंजली कुमठेकर, द्वापायन चक्रवर्ती,  जयंत धारप, बेक जॉन,  रवी कदम, व तुषार कोठवडे उपस्थित होते. एकूण ७१ विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले. 
 तिसऱ्या दिवशी प्रदर्शनास अनेक प्रख्यात वास्तुविशारद  विकास भंडारी,  कल्पक भंडारी,  लक्ष्मण थिटे, गिरीश दोषी, माधव हुंडेकर, प्रशांत  देशमुख  इत्यादी यांनी भेट दिली.

 महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय छाजेड, सरचिटणीस, जितेंद्र पितळीया, मार्गदर्शक विकास भंडारी प्राचार्य प्रसन्न देसाई, विजया श्रीनिवासन व  प्राध्यापक शेखर गरुड,  यांनी मार्गदर्शन केले.

‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन

  • पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य

पुणे : परदेशात शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’चे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 13 एप्रिल 2024 रोजी दि पोच हॉल, बोट क्लब, पुणे येथे सकाळी 11.00 ते संध्याकाळी 5.00 यावेळेत ‘ग्लोबल एड्युकेशन फेअर 2024’ भरवण्यात येणार आहे. येथे पालक व विद्यार्थ्यांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे, अशी माहिती ‘स्टडी स्मार्ट’ चे मॅनेजिंग डायरेक्टर चेतन जैन यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

पुणे श्रमिक पत्रकार भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेत पुढे बोलताना चेतन जैन म्हणाले, 12 वी नंतर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना परदेशात जाण्याची इच्छा असते. पण त्यासाठी परदेशातील कोणत्या विद्यापीठात कोणत्या संधी उपलब्ध आहेत? त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया काय आणि कशी असते? परदेशात जायचं म्हटलं की तेथील राहण्याची सोय कशी होणार ? यासाठी लागणारा पैसा कसा उपलब्ध होईल? असे अनेक प्रश्न पडतात. या पार्श्वभूमीवर ‘स्टडी स्मार्ट’च्या वतीने आयोजित ‘ग्लोबल एड्युकेशन फेअर 2024’ मध्ये एकाच छताखाली या सगळ्या शंकांचे निरसन होणार आहे. यामध्ये इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथील जवळपास 40 हून अधिक टॉप विद्यापीठाच्या प्रतिनिधींशी चर्चा करता येणार आहे. तसेच येथील अभ्यासक्रम व करीयरच्या संधी जाणून घेता येणार आहेत.

या शिवाय परदेशात शिक्षणासाठी कोणकोणत्या शिष्यवृत्ती आहेत यांची माहिती देखील मिळणार आहे. तसेच या सर्वांसाठी आवश्यक असणारे अर्थसाहाय्य कशा प्रकारे उपलब्ध होईल? याविषयी विनामूल्य मार्गदर्शन देखील या ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर 2024’ मध्ये विद्यार्थी व पालकांना मिळणार असल्याचे जैन यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर साधणार युवकांशी संवाद

‘जर्नि ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’ या विषयावर शुक्रवारी व्याख्यान

पुणे-

आश्वासक युवा पिढीला संधीचे नवे जागतिक द्वार उघडुन देणारा विकसित भारताचा संकल्प मांडण्यासाठी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर ‘जर्नि ऑफ ग्लोबल राइझ ऑफ इंडिया’ या विषयावर पुण्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. बालगंधर्व रंगमंदिर येथे शुक्रवारी (ता. 12 एप्रिल) सायंकाळी 5.00 वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेश पांडे आणि युवा सुराज्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष पुनीत जोशी यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

देशाचे रॉकस्टार फॉरेन मिनिस्टर अशी ओळख असलेले एस जयशंकर यांनी अवघ्या पाच वर्षांत भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा साफ बदलवली. कोणत्याही कुरापती खपवून न घेणारे आणि त्याचवेळी जगाच्या कल्याणाचा विचार करणारे जबाबदार राष्ट्र अशी भारताची प्रतिमा निर्माण करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे. यापूर्वीच त्यांचा आंतरराष्ट्रीय प्रशासकीय अनुभव, त्यांची कार्यशैली यामुळे ते युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत.

पत्र परिषदेत कार्यक्रमाची माहिती सांगताना पांडे म्हणाले “विकासाची भूक असणारे, झपाट्याने प्रगती करणारे, स्वतःच्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वस्व पणाला लावणारे राष्ट्र म्हणून भारत जगाच्या पटलावर पुढे आला. यासाठी मोलाची भूमिका बजावणारे, युवकांमध्ये लोकप्रिय रॉकस्टार फॉरेन मिनिस्टर पुण्यात येणार आहेत, हे पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाचे आहे. भारताचे परराष्ट्र धोरण पुण्यावर थेट परिणाम करते. कारण, पुणे उद्योग आणि शिक्षण क्षेत्रात थेट आंतरराष्ट्रीय संस्थांशी जोडलेले आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन, शेतीमाल प्रक्रिया, औषधनिर्माण ही उद्योगांची पाच क्षेत्रे पुण्यातून जगाशी व्यवहार करतात. भारतातून दरवर्षी सुमारे दहा लाख विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. त्यापैकी महाराष्ट्राचा वाटा १२.५ टक्के आहे. त्यामध्ये पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांबद्दल पुणे अत्यंत जागरूक महानगर आहे. म्हणून भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पुणेकरांशी संवाद साधणे महत्वाचे आहे.”

जोशी म्हणाले, “राजनैतिक भाषेचा सफाईदारपणा, निस्सीम देशभक्ती आणि देशासमोरील प्रश्नांची नेमकी जाण एस. जयशंकर यांना आहे. जग भारताकडे कसे पाहाते याबद्दल आजच्या तरुण पिढीला सतत उत्सुकता असते. जगात भारताची मान उंचावत आहे याचा तरुण वर्गाला अभिमान आहे. जयशंकर यांचे एकएक विधान तरुण वर्ग उत्साहाने पाहातो, ऐकतो आणि अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवतो. असे कर्तृत्ववान परराष्ट्रमंत्री पुण्यातील तरूणाईशी खास संवाद साधणार आहेत. पुणेकरांनी या व्याख्यानाला मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करतो.”

मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय !

  • मोनिका मोहोळ यांचा पहिल्या दिवसापासूनच सहभाग
  • ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

पुणे : भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया सर्वात अगोदर सुरू केली. पक्षाच्या दुसऱ्याच यादीत दि. १३ मार्चला पुणे लोकसभा मतदार संघातून पक्षाने मुरलीधर मोहोळ याचे नाव जाहीर केले. नावाची घोषणा झाल्यानंतर मोहोळ यांनी ग्रामदेवतांच्या दर्शनाने आपल्या प्रचाराला सुरूवात केली. या देवदर्शनापासूनच मोहोळ यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका मोनिका मोहोळ यांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण सक्रिय होत असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी पक्षातील महिला कार्यकर्त्या आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या साथीने भेटीगाठी सुरू केल्या. त्यामुळे सुरूवातीपासूनच मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराच्या एका बाजूची धुरा होम मिनिस्टरनी सांभाळले असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-रिपब्लीकन पक्ष (आठवले गट) व मित्र पक्षांच्या महायुतीचे पुण्यातील उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोनिका मोहोळ यांनी शहरातील सहाही विधानसभा मतदारसंघातील मान्यवर, आजीमाजी नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरूवात केली. गेल्या पंधरा दिवसात त्यांनी मतदारसंघात अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीगाठी दरम्यान शक्य झाले तिथे त्या स्थानिक कार्यकर्त्यांच्याही घऱी जाऊन त्यांना भेटत आहेत. निवडणूक प्रचार याबद्दल कार्यकर्त्यांची मत त्यांनी जाणून घेतली. सध्याचा वाढता उन्हाळा बघून त्या कार्यकर्त्यांना उन्हापासून बचाव करत प्रचार आणि पक्षाचे काम करा. आपल्याला १३ मेपर्यंत ही लढाई लढायची असल्याने आपण आजारपणामुळे प्रचारापासून दुर रहाणार नाही याची काळजी घ्या, काही मदत लागली तर सांगा असे आवर्जून सांगत होत्या.

या आपल्या पहिल्या प्रचार फेरीबद्दल मोनिका मोहोळ यांनी सांगितले की, ‘मी महापालिकेत नगरसेविका म्हणून काम केले आहे. यात महापालिकेत अनेक सहकारी नगरसेवकांशी नव्याने ओळख झाल्या, मैत्रीही झाली. या पाच वर्षात मला समाजकारण आणि लोकांची कामे करण्याचे स्वातंत्र्य देत मुरलीधरआण्णांनी मला एकप्रकारे प्रशिक्षणच दिलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात पुढे कधीतरी सहभागी व्हावेच लागणार होते, मग सुरूवातीपासूनच का आपण यात सहभागी होऊ नये ! म्हणून या अनुभवाच्या जोरावरच मी सुरूवातीपासूनच प्रचारात सक्रिय होण्याचे ठरवले आणि त्याप्रमाणे स्वतंत्रपणे भेटीगाठी घेतल्या.

‘मला जवळपास पाच निवडणुकींचा अनुभव असून तो अनुभव आज महत्त्वाचा ठरत आहे. भेटीगाठींमधून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनसामान्यांच्या विश्वासाची साक्ष पदोपदी मिळत आहे. मी जवळपास सहाही विधानसभा मतदारसंघात जाऊन आले आहे. यापुढेही पक्षाच्या वतीने जसे नियोजन केले असेल तसे प्रचारात आपण सहभागी होणार असल्याचेही मोनिका यांनी स्पष्ट केले.

पुणे शहरात लोकसभेसाठी १३ मे यादिवशी मतदान होणार असून अद्याप निवडणुकीची अधीसूचना जाहीर झालेली नाही. त्यात उन्हाचा कडाका वाढत असताना मोहोळ यांच्या भेटीगाठी वाढल्या असून महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून प्रचाराच्या नियोजनाची लगबग सुरू आहे. गेले काही दिवस रोज शहरातील मान्यवरांपासून सर्वसामान्यांपर्यंत अनेकांच्या भेटीगाठी घेण्याचे काम मुरलीधर मोहोळ व त्यांच्या होम मिनिस्टर या स्वतंत्रपणे करत आहेत. मधेच संस्था किंवा समाजांच्या मेळाव्याला उपस्थित रहात असून समाजबांधवांशी संवाद साधत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख मा. राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला शिवतीर्थावरुन दिलेला बिनशर्त पाठिंबा, हा त्यांच्या देशाच्या विकासाबद्दल असलेला सच्चेपणा अधोरेखित करतो. हिंदू नववर्षाच्या शुभदिनी केलेल्या या घोषणेमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांना निश्तितच बळ मिळाले आहे. पुणे लोकसभा निडणुकीतही मनसैनिकांना सोबत घेऊन आम्ही एकदिलाने या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मोठ्या मताधिक्याने जिंकू, हा विश्वास वाटतो.

  • मुरलीधर मोहोळ, उमेदवार, महायुती, पुणे लोकसभा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारचा अपघात:ट्रकने पाठीमागून दिली धडक, काँग्रेसने व्यक्त केला घातपाताचा संशय

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ काल रात्री अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही.

भंडारा शहरालगतच्या भीलवाडा गावाजवळ ही घटना घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास प्रचार आटपून सुकळी या गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने त्याच्या गाडीला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले असून नाना पटोले थोडक्यात बचावले आहेत.

अपघातावरुन काँग्रेसनं भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, नाना पटोलेंच्या गाडीला झालेला अपघात ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का? अशी शंकाही अतुल लोंढेंनी व्यक्त केली आहे.

अतुल लोंढेंचे ट्विट काय?

अतुल लोंढे म्हणाले की,विरोधी पक्षाच्या नेत्यांना संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्याच्या प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न एका ट्रकने केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून त्यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका आहे. मायबाप जनतेच्या आशिर्वादाने नाना पटोले साहेबांना कोणतीही इजा झाली नसून ते सुखरूप आहेत.

दिशा पटानी ते जेसिका चेस्टाइन या 5 अभिनेत्री ज्यांनी सिनेमात महिला ऍक्शन भूमिकांना न्याय दिला 

 हाय-ऑक्टेन कारचा पाठलाग करण्यापासून ते लढाईपर्यंत या पाच महिला ॲक्शन स्टार्सने वेळोवेळी सिद्ध केले आहे की ते ॲक्शन सिनेमाच्या जगात स्वतःचे स्थान कसं स्थापन केलं आहे.
 एंजेलिना जोली: ग्रेसफुल पॉवरहाउस ‘टॉम्ब रेडर’, ‘मिस्टर अँड मिसेस स्मिथ’ आणि ‘सॉल्ट’ सारख्या चित्रपटांच्या ॲक्शन सीक्वेन्समध्ये अँजेलिना जोलीचा अभिनय लालित्य हे बघण्याजोग आहे. 

 जेसिका अल्बा: ब्युटी विथ अ पंच ‘सिन सिटी’ मधील खडतर आणि लवचिक नॅन्सी कॅलाहान आणि ‘फँटॅस्टिक फोर’ मधील सुसान स्टॉर्मच्या भूमिकेत जेसिका अल्बा ॲक्शन स्टार म्हणून तिच्या अष्टपैलुत्वावर प्रकाश टाकतात. तीव्र लढाईची दृश्ये आणि असुरक्षिततेच्या क्षणांमध्ये अखंडपणे संक्रमण करण्याच्या तिच्या क्षमतेने तिला एक कलाकार म्हणून उत्कृष्ट बनवले आणि ॲक्शनर्सच्या जगात एक अग्रगण्य महिला म्हणून तिचा दर्जा मजबूत केला.
 दिशा पटानी : द ॲक्शन क्वीन दिशा पटानी ‘मलंग’ आणि तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ” योद्धा ” सारख्या चित्रपटांमधील तिच्या प्रभावी ॲक्शन सीक्वेन्सने बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घालत आहे. ज्याने ॲक्शन सिनेमाच्या जगात एक उगवता स्टार म्हणून तिचा दर्जा मजबूत केला आहे. आता, तिच्या आगामी चित्रपटांमधून ती टेबलवर काय आणते हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. अभिनेत्री ‘कंगुवा’, ‘कल्की 2898AD’ आणि ‘वेलकम टू द जंगल’ च्या रिलीजची वाट पाहत आहे.  
स्कार्लेट जोहानसन: द मार्वल सुपर हिरोईन स्कार्लेट जोहान्सनने मार्वल युनिव्हर्समधील ब्लॅक विधवा म्हणून काही सर्वात संस्मरणीय ॲक्शन सीक्वेन्स दिले आहेत.तीव्र लढाईपासून ते उत्साहवर्धक पाठलाग दृश्यांपर्यंत, जोहानसनच्या नताशा रोमानोफच्या भूमिकेने तिला शैलीतील उच्चभ्रू लोकांमध्ये स्थान मिळवून दिले आहे. 

 जेसिका चेस्टेन: शक्ती आणि अचूकता ‘झिरो डार्क थर्टी’ आणि ‘द हंट्समन: विंटर्स वॉर’ सारख्या ॲक्शन-पॅक्ड चित्रपटांमधील जेसिका चॅस्टेनच्या भूमिका शक्ती आणि अचूकतेने स्क्रीनवर कमांड करण्याची तिची क्षमता प्रदर्शित करतात. चेस्टेन तिच्या ॲक्शन सीक्वेन्समध्ये तीव्रता आणि दृढनिश्चय आणते ज्यामुळे प्रेक्षकांवर कायमचा प्रभाव पडतो. या पाच महिला ॲक्शन स्टार्सनी केवळ स्टिरिओटाईपच मोडीत काढल्या नाहीत तर सिनेमाच्या दुनियेत ॲक्शनचा नवा चेहराही बनल्या आहेत.

गुढीपाडव्यानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून जनतेला शुभेच्छा

पुणे दि.९: विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुढी पाडवा तसेच मराठी नूतन वर्षानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. आज सकाळी त्यांच्या पुणे येथील सिल्व्हर रॉक्स या निवासस्थानी विधिवत गुढी उभारण्यात आली. यावेळी त्यांच्या भगिनी आणि स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.

गुढीपाडवा हिंदू नववर्षाचा दिवस हा, ब्रम्हध्वज म्हणजे गुढी उभारून त्याची विधिवत पूजा करून वंदन करण्यात आलेले आहे. अयोध्यामध्ये प्रभू श्रीराम आल्यावर जसं रामराज्य सुरू झालं, तशा प्रकारचं या देशावरती लोकांचं न्याय करणारं राज्य असू दे, देशांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार अशा प्रकारच महायुतीच सरकार यावं अशा प्रकारची प्रार्थना गुढीकडे केलेली आहे.

यासोबतच, महाराष्ट्रातील, देशातील सर्व जनतेला सौख्य, आरोग्य, यश प्राप्त व्हावं. लोकांमधील परस्पर स्नेह, बंधुभाव व एकोपा वृद्धिंगत होवो या प्रार्थनेसह सर्वांना गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देते, असे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

संसदेत भाषणं करून विकास होत नाही:अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल; म्हणाले, पवार आडनाव असलेल्या उमेदवारालाच निवडून द्या

बारामती-पूर्वी बारामतीत मत मागत असताना एक लेव्हल होती, पण आता ती लेव्हल सोडली जात आहे. भावनिक केलं जात आहे. नुसतं संसदेत भाषण देऊन विकासकामे होत नाही, त्यासाठी निधी आणावा लागतो, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तर तुम्ही साहेबांना (शरद पवार) निवडून दिले, त्यांच्या मुलीला निवडून दिले आता सुनेत्रा पवारांना निवडून द्या, पवार आडनावाच्या उमेदवारालाच विजयी करा, अशी साद देखील अजित पवार यांनी बारामतीकरांना घातली.

उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, काही लोक संसदेत चांगल बोलतात म्हणजे विकास होत नाही. मी देखील भाषणात पटाईत आहे. माझा देखील पट्टी लागली तर मी भाषणही करतो अन् निधीही आणतो, कामही करतो तर एखादे काम वाजवून देखील पूर्ण करून घेतो, मतदान मागताना आता काही लोक तुम्हाला भाननिक करत आहेत, पण बारामतीच्या विकासासाठी तुम्हाला योग्य निर्णय घ्यायचा आहे, असे म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंसह शरद पवारांना टोला लगावला.

अजित पवार पुढे म्हणाले की, मी काम करत असताना माझ्यावर काही कार्यकर्ते नाराज आहे. सगळेच खूश आहेत असे मी म्हणत नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा त्यात मी मार्ग काढेन. माझ्याबरोबर काम करणारा चूकला म्हणून त्याचा दंड मला किंवा उमेदवाराला देऊ नका, अशीही साद अजित पवारांनी घातली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, मला बारामतीकरांनी सात सात वेळा मला निवडून दिल्याने मला बारकावे मला माहित झाले. त्यासाठी जरी रोज तुम्हाला भेट नसलो तरी तिथे बसून मी कामे पूर्ण करतो. विशेष म्हणजे केंद्राच्या विविध योजना देखील असतात त्या आपल्याला या मतदारसंघात आणून येथील विकासमार्गांना गती द्यायची आहे.

11 तारखेला सासवडला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थितीत सभा होणार आहे. जेजुरीच्या नाझरे धरणात सुद्धा पाणी आणणार आहे. हे माझ्या अनेक दिवसांपासून डोक्यात आहे. बारामती लोकसभा मतदारसंघात फॉर्म भरल्यानंतर शेवटची सभा व्हायची. आता का फिरावं लागतंय? विकासाचा ओघ चालू ठेवायचा असेल तर आपला खासदार निवडून द्या. भावनिक होऊ नका, कुठलीही गोष्ट करायची ती चांगली करायची हा माझा स्वभाव आहे, असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सर्वांना मदत करतात. आपल्याला देखील गडकरी यांनी मदत केली. त्यांचे खूप खूप धन्यवाद…नमो रोजगार मेळाव्यासंदर्भात काहींनी टीका केली. फक्त 10 हजार नोकऱ्या दिल्या गेल्या म्हणून. परंतु आपण 1 हजार तरी नोकऱ्या दिल्या का?, असा अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना सवाल विचारला.

लोकं म्हणतील आमदारकी असताना खासदारकी कशाला? बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खासदार हवा आहे. उमेदवारीचा अर्ज भरला आता एवढ केलंय. निवडून आल्यावर किती कामे करतो बघत राहाल. काही काही लोकांना फोन येत आहेत. मला फोन करण्याइतपत वेळ नाही. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यभर फिरायचं आहे. आचारसंहिता असताना देखील निवेदनाचा गठ्ठा आलाय. लोकांना काम करतो म्हणून निवेदन देतात, असं अजित पवार म्हणाले.