पुणे- बहीण भावाच्या नात्याबद्दल बदनामीकारक , संस्कृतीला हानिकारक वक्तव्य करणाऱ्या सुधीर मुनगुंटीवार यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांकडून स्वीकारताना पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी त्यांना फोटो काढून देण्यास मनाई केल्याचा प्रकार घडला आहे. पोलीस आयुक्तांनी त्यांना आचार संहितेचे कारण दिले आहे.
दरम्यान पुण्याच्या पोलीस आयुक्तांच्या सह महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर ,भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनाही या कार्यकर्त्यांनी निवेदने पाठविली आहेत . पोलीस आयुक्तांना निवेदन देताना महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगीता तिवारी.
सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश सचिव सीमा महाडिक. सुवर्ण माने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सामाजिक न्याय विभाग महिला अध्यक्ष. छाया जाधव माजी अध्यक्ष पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी सोनिया ओवाळ उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग पुणे. ह्या उपस्थित होत्या.
चंद्रपूर येथे भाजपची सभा होती त्या मंचावर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बहिण भावाच्या पवित्र नात्यावर घाणेरडे गलिच्छ आणि आक्षेपार्ह असे विधान केले आहे. विरोधकांवर टीका ही झालीच पाहिजे परंतु त्या मध्ये महिलांचा अपमान कदापि सहन होणार नाही खास करून पवित्र बहीण भावाच्या नात्याचा अपमान तर अजिबात सहन होणार नाही.त्या नेत्यांच्या विधानातून त्यांच्या विकृत मानसिकतेची आणि असंस्कृतिक संस्कारांची कल्पना येऊ शकते. आम्ही सावित्रीच्या लेकी आपणास अशी मागणी करतो की आपण पोलीस ,महिला आयोग अंतर्गत ताबडतोब ह्या नेत्यावर कारवाई करावी. या नेत्याच्या विरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार देऊन त्यांची उमेदवारी रद्द करावी. असे संगीता तिवारी यांनी म्हटले आहे.