पुणे- चंद्रपूरच्या सभेत पंतप्रधानांच्या समक्ष बहीण भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करून भारतीय संस्कृतीवरच हल्ला करणाऱ्या भाजप उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करावा अशी मागणी येथे काँग्रेसच्या महिला नेत्या संगीता तिवारी यांनी केली आहे. त्या साठी उद्या आपण पोलीस आयुक्तांना भेटून याबाबत लेखी तक्रार नोंदविणार आहोत , आणि जर पोलिसांनी दखल घेतली नाही तर न्यायालयात तक्रार दाखल करू ,जन आंदोलन उभारू असेही तिवारी यांनी म्हटले आहे.
‘सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करा’ , काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार: अतुल लोंढे
पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत सुधीर मुनगंटीवारांचे चिथावणीखोर व भडकाऊ भाषण.
मुनगंटीवारांवर कारवाई करण्यासाठी काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार.
मुंबई, दि. ९ एप्रिल
राज्याचे वन मंत्री व भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान मोदींसाठी आयोजित सभेत सर्व मर्यादा पार केल्या. मुनगंटीवार यांची भाषा चिथवणीखोर व दोन समाजात शत्रुत्व निर्माण करणारी आहे. मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन केले असून सुधीर मुनगंटीवार यांची उमेदवारी रद्द करावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणुक आयोगाकडे केली आहे.
राज्य निवडणुक अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत अतुल लोंढे म्हणतात की, सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना उद्देशून प्रक्षोभक भाषा आणि अपमानजनक टिप्पणी केली. समाजात द्वेष आणि मतभेद निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. मुनगंटीवार यांचे भाषण केवळ आक्षेपार्हच नसून समाजात विषाचे बीज पेरणारे आहे. मुनगंटीवार यांनी भाषणात महिलांबद्दलही अपमानजनक विधाने करुन महिलांची बदनामी केली आहे.
मुनगंटीवार यांनी चुकीची माहिती पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला हा प्रकार लोकशाही प्रक्रियेला खीळ घालणारा व मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांची कृती केवळ आदर्श आचारसंहिता आणि निवडणूक नियमांचे उल्लंघन करणारी नसून लोकशाहीच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून त्यांची उमेदवारी रद्द करावी, त्यांच्यावर आणि भाजपवर निवडणूका लढविण्यास बंदी घालावी, अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.
जी काही भाषा सुधीर मुनगंटीवार यांनी वापरली आहे. ती भाषा समस्त भारताच्या संस्कार आणि संस्कृतीचा अपमान करणारी आहे. भाऊ – बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे, हे नेहमी आपले वेगळेपण सांगणाऱ्या भाजपला शोभते का? त्यांच्या तोंडून निघालेले शब्द हेच जर भाजपचे संस्कार असतील तर या देशाचे काही… pic.twitter.com/ZNIu5FlOsJ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 8, 2024
‘‘न्याय कार्ड’’ घरोघरी पोच करणार
पुणे : पुणे शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडून शेतकरी न्याय, महिला न्याय, युवा न्याय, भागीदारी न्याय आणि श्रमिक न्यायाची गुढी आज महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे उभारण्यात आली.
यावेळी महाविकास आघाडी व मित्रपक्षांचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर, पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे निवडणुकीचे सन्मवयक अरविंद शिंदे, काँग्रेस नेते अभय छाजेड, अजित दरेकर, अशुतोष शिंदे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी रवींद्र धंगेकर म्हणाले की, ‘‘मी सध्या सर्वांना भेटतोय सर्वांशी चर्चा करतोय. येणारा काळ इंडिया आघाडीचा आणि काँग्रेसचा असणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रीत येऊन काम करणे आणि आपण केलेले काम तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे.
शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढवायचा असून कशाप्रकारे प्रचार करायचा त्याची व्युहरचना कशी असावी, जाहिरनाम्यात या पाच न्याय गोष्टींचा समावेश असावा, यासारख्या मुद्दयांवर बैठक होणार आहे. तसेच न्याय कार्ड प्रत्येकाच्या घरी पोच केले जाणार असून त्यावेळी न्यायचे मुद्दे समजून सांगितले जाणार आहेत.’’
पुण्यात राष्ट्रसेवादलाने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला असून, तसे पत्र त्यांनी दिले आहे. त्यांच्याकडूनही पथनाट्य माध्यमातून प्रचार करण्यात येणार आहे.
यावेळी ॲड. अभय छाजेड यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.
यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गुढी उभारण्याचा मान हा ऊर्जा देणारा
पुणे : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सांस्कृतिक गुढी उभारण्याचा मान आमच्या सारख्या कलाकारांना मिळतो, हे आमचे यश आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखा गेली, अनेक वर्षे कलाकारांना मान देऊन खर्या अर्थाने कलाकारांना त्यांच्या क्षेत्रात ऊर्जा देण्याचे काम करीत आहे, अशी भावना सुप्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी व अभिनेते संकर्षण कर्हाडे यांनी यावेळी व्यक्त केली.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखातर्फे आयोजित गुढीपाडव्याचे औचित्य साधून कलावंताच्या सांस्कृतिक गुढीचे आयोजन यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे मंगळवारी करण्यात आले होते.स्पृहा जोशी व संकर्षण कर्हाडे यांच्या हस्ते गुढी उभारुन पुजा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखाचे व ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन, प्रमुख कार्यवाह सत्यजित धांडेकर, उपाध्यक्ष समीर हंपी, कोषाध्यक्ष दीपक गुप्ते, निर्माते चंद्रशेखर गोखले, रोहित शुक्ला, दिशा थोरात, गिरिश गोडबोले यांच्यासह कोथरुड नाट्य परिषदेचे पदाधिकारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखाचे व ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांची नुकतीच एकसष्ठी पूर्ण झाली. त्यानिमित्त त्यांचा 61 गुलाबांचा बुके देऊन यावेळी सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजेश्वरी पवार यांनी ’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ हे गीत सादर करून केले. दिशा हटकर यांनी गणेश वंदना व श्रध्दा गायकवाड यांनी ‘आजी सोनियाचा दिवस’ हे गीत सादर केले.
अभिनेते संकर्षण कर्हाडे म्हणाले, नाट्य परिषद कोथरुड शाखा थिएटरमध्ये गुढी उभारुन कलाकारांना ऊर्जा देत असते. अनेक कलाकार माणसे जोडण्याचे काम या शाखेकडून होते. अभिनेत्री स्पृहा जोशी म्हणाल्या, नाट्य परिषद आता 100 वे वर्षे साजरे करीत आहे. कोथरुड शाखा विविध उपक्रम राबून कलाकरांना बळ देते. आज आमच्या हातून गुढी पुजन करण्यात आले, हे आमचे भाग्यच आहे.
महाराष्ट्रात थियटरमध्ये गुढी उभारणचे काम फक्त कोथरुड मध्येच होते. शाखेचे वतीने वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. नाट्यगृह हेच आमचे घर मानून आम्ही दरवर्षी सांस्कृतिक गुढी उभारण्यात येते. यंदाचे हे 15 वे वर्ष आहे. अनेक कलाकारांना हा मान देण्यात आला असल्याचे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोथरुड शाखाचे व ‘संवाद’ पुणेचे अध्यक्ष सुनील महाजन यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर हंपी यांनी केले. सत्यजीत धांडेकर यांनी आभार मानले.
काँग्रेस नेते मोहन जोशी यांची ;लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुखपदी नेमणूक!
पुणे-
पुणे लोकसभा निवडणुकीत महविकास आघाडी व इंडिया आघाडी मित्रपक्षांचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणूक प्रचार प्रमुख पदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तशा आशयाचे पत्र उमेदवार आमदार रविंद्र धंगेकर यांनी मोहन जोशींना दिले. मोहन जोशी यांच्यावर अ. भा. काँग्रेस महासमितीने कर्नाटक व तेलंगाणा राज्यातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या निरीक्षक पदाची जबाबदारी सोपवली होती. ही जबाबदारी त्यांनी समर्थपणे पेलून या दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान दिले. तसेच पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघातील पोट निवडणुकीतही कॉंग्रेस उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या निवडणुकीच्या प्रचाराची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. ‘काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडी व इंडिया आघाडी मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते या सर्वांना सोबत घेऊन आम्ही ही निवडणूक लढवू आणि जिंकू’ असा विश्वास निवडणूक प्रचार प्रमुख मोहन जोशी यांनी व्यक्त केला. ते म्हणले ‘ या निवडणुकीत आमचा उमेदवार रविंद्र धंगेकर हे कार्यक्षम व लोकप्रिय उमेदवार आहेत. पुण्याच्या प्रश्नांची त्यांना चांगली जाण आहे. अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने आमचा प्रचार होईल. तसेच प्रचाराची पातळी चांगली राहील ,यासाठी देखील आम्ही दक्ष राहू असे ते म्हणाले.
राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत 2 हजार 641 मतदान केंद्रे वाढली-लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे
मुंबई दि. 9: येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2 हजार 641 नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात 98 हजार 114 मतदान केंद्रे असणार आहेत.
2004 साली झालेल्या लोकसभा निवडणुकांसाठी एकूण 64 हजार 508 मतदार केंद्रे होती. तर 2009 मध्ये एकूण 83 हजार 986 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2014 मध्ये एकूण 91 हजार 329 मतदार केंद्रे स्थापन करण्यात आली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये 95 हजार 473 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती. सध्या 98 हजार 114 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार असून मतदारांची नोंदणी सुरु असल्याने या मतदार केंद्रामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
सर्वांत जास्त मतदान केंद्र पुण्यात तर सर्वांत कमी मतदान केंद्र सिंधुदुर्गात
सर्वांत जास्त मतदान केंद्रे यावेळी पुण्यात आहेत. याची संख्या 8 हजार 382 आहे. यानंतर मुंबई उपनगर येथे 7 हजार 380 मतदान केंद्रे असणार आहेत. ठाण्यात 6 हजार 592, नाशिकमध्ये 4 हजार 800 आणि नागपूरमध्ये 4 हजार 510 मतदान केंद्रे असतील. सर्वांत कमी मतदान केंद्रे सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. सिंधुदुर्गमध्ये 918 आणि गडचिरोलीमध्ये 950 मतदान केंद्रे असणार आहेत.
3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात
3000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 7 जिल्हयात आहेत. अहमदनगरमध्ये 3 हजार 734,सोलापूरमध्ये 3 हजार 617, जळगावमध्ये 3 हजार 582, कोल्हापूरमध्ये 3 हजार 368, औरंगाबादमध्ये 3 हजार 085, नांदेडमध्ये 3 हजार 047 आणि सातारामध्ये 3 हजार 025 मतदान केंद्र असतील.
10 जिल्हयांत 2000 हून अधिक मतदान केंद्रे
2000 पेक्षा जास्त मतदान केंद्रे 10 जिल्हयात आहेत. रायगडमध्ये 2 हजार 719, अमरावतीमध्ये 2 हजार 672, यवतमाळमध्ये 2 हजार 532, मुंबई शहरमध्ये 2 हजार 517, सांगलीमध्ये 2 हजार 448, बीडमध्ये 2 हजार 355, बुलढाण्यामध्ये 2 हजार 266, पालघरमध्ये 2 हजार 263, लातूरमध्ये 2 हजार 102 आणि चंद्रपूरमध्ये 2 हजार 044 मतदान केंद्र असतील.
2000 पेक्षा कमी मतदान केंद्रे असलेले जिल्हे पुढीलप्रमाणे – नंदुरबार 1 हजार 412, धुळे 1 हजार 704, अकोला 1 हजार 719, वाशिम 1 हजार 76, वर्धा 1 हजार 308, भंडारा 1 हजार 156, गोंदिया 1 हजार 288, हिंगोली 1 हजार 17, परभणी 1 हजार 587, जालना 1 हजार 719, उस्मानाबाद 1 हजार 503, रत्नागिरी 1 हजार 717 मतदान केंद्रे असतील.
मतदान केंद्र स्थापन करण्याचे निकष, मतदान केंद्राची रचना, मतदान केंद्र ठरविताना किमान आणि कमाल मतदार ठरविणे, मतदान केंद्रांच्या यादीची प्रसिध्दी,संवेदनशील व अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती, मतदान केंद्रावरील सुविधा याबाबतचा निर्णय भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येतो. मतदान केंद्रावर पोचण्यास मतदारास त्रास होऊ नये याची काळजी आयोगामार्फत घेण्यात येते. मतदार केंद्रांची ‘संवेदनशीलता’ बघून त्याठिकाणी आवश्यक सुरक्षा पुरविण्यात येते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणे बंधनकारक आहे. त्यात वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, व्हील चेअर वरील दिव्यांगांसाठी योग्य रुंदीचा दरवाजा आणि फर्निचर या किमान सुविधा यांचा समावेश आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे.
वरंध घाट 30 मे पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद
जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना
रायगड जिमाका दि. 8 — रायगड जिल्हा हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ वरील मौजे वरंध ते रायगड जिल्हा हद्दीत प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रस्त्याच्या दुपदरीकरणाचे काम, संरक्षण भिंत बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे दि. 8 एप्रिल पासून ते 30 मे 2024 पर्यंत वरंध घाटातील रस्ता सर्व प्रकारच्या अवजड व लहान मोठ्या वाहनांसाठी महामार्ग वाहतूकीसाठी बंद करण्याची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग ९६५ डीडी किमी ८८/१०० (राजेवाडी) ते किमी ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या रस्त्याचे दुपदरीकरणाचे काम संरक्षण भिंती बांधण्याची व आवश्यक सुरक्षा उपाय योजना करण्यासाठीची कामे प्रगतीत आहे. वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमध्ये संरक्षक भिंतीचे काम प्रगतीत असून बहूतांश काम पूर्ण झालेले आहे,. परंतू साखळी क्रमांक ८८/१०० (मौजे वरंघ) ते ९६/७०० (रायगड जिल्हा हद्द) या लांबीमध्ये काम सुरु करावयाचे आहे. सदरच्या लांबीमध्ये खोल दरी व उंच डोंगर असून रस्त्याची रुंदी काम करावयास अपुरी आहे. सदरच्या लांबीमध्ये चालू वाहतूकीमध्ये काम करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे. वाहतूक चालू ठेवल्यास ते शक्य होणार नाही सदर कालावधीकरीता वरंध गाव ते रायगड जिल्हा हद्दीमधील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण आणि पोलीस अधीक्षक रायगड यांनी केलेल्या विनंतीनुसार जिल्हाधिकारी यांची खात्री झाली आहे.
वरंध घाटातील वाहतूक सर्व प्रकारच्या वाहतूकीकरीता बंद करणेबाबत तसेच सदरवेळी पर्यायी मार्ग वापराबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
नागरिकांनी पुण्याकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-माणगांव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर” असा मार्ग वापरण्याची शिफारस करण्यात आली आहे.
KKR चा माजी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे, अनिकेत पोरवाल कोल्हापूर टस्कर्सच्या ताफ्यात, महाराष्ट्र प्रीमिअर लीग २०२४ साठी बांधला मजबूत संघ
पुनित बालन ग्रुपच्या मालकीच्या संघाने त्यांच्या शेवटच्या आवृत्तीच्या संघाचा गाभा कायम ठेवला आहे आणि लिलावादरम्यान काही जागा मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित केले
पुणे : महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या मागील पर्वातील उप विजेते कोल्हापूर टस्कर्स संघाने अनुभवी अष्टपैलू खेळाडू श्रीकांत मुंढे आणि आक्रमक फलंदाज-यष्टिरक्षक अनिकेत पोरवाल यांना दुसऱ्या पर्वासाठी आपल्या ताफ्यात घेऊन संघाची ताकद वाढवली आहे.
पुनित बालन ग्रुपच्या मालकीच्या संघाने पुण्यात झालेल्या लिलावात २० सदस्यीय संघात नऊ खेळाडूंचा समावेश करण्यासाठी एकूण १०.९० लाख रुपये खर्च केले आणि त्यांची लिलावाची रणनीती यशस्वीपणे पार पाडताना गोलंदाजीमध्ये काही वैविध्यही आणले.
भारताचा माजी फलंदाज केदार जाधवच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर टस्कर्सने गेल्या आवृत्तीत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, परंतु त्यांनी उपविजेतेपद पटकावले होते. या वर्षी जेतेपद पटकावण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून लिलावामधून संघात मूल्य वाढवणाऱ्या काही स्टार खेळाडूंची निवड करण्याचा संघ व्यवस्थापनाचा निर्धार होता.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये पार पडलेल्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दबावाखाली ९६ धावांची खेळी करून भारताला फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या सचिन धस याच्यासह महाराष्ट्र प्रीमिअर लीगच्या मागील आवृत्तीतील सर्वाधिक धावा करणाऱ्या अंकित बावणे यांना संघात कायम ठेवण्यात त्यांनी यश मिळवले.

“एकंदरीत एक मजबूत संघ निवडण्याचा आम्हाला आनंद होत आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला संगम असल्याने, लाइन-अप विलक्षण दिसते. प्रत्येक खेळाडू संघात त्यांची स्वतःची अद्वितीय कौशल्ये आणि सामर्थ्य आणतो. मला विश्वास आहे की हा संघ आगामी हंगामात आम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाईल आणि कोल्हापूर टस्कर्सच्या चाहत्यांचे व समर्थकांचे मनोरंजन करेल,” असा विश्वास पुनिल बालन ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन यांनी व्यक्त केला.
लिलावात कोल्हापूर टस्कर्सने ४० हजार रुपयांची मूळ किंमत असलेल्या बिग हिटिंग बॅट्समन पोरवालसाठी ४.५० लाखांची यशस्वी बोली लावली. अनुभवी अष्टपैलू मुंढे ( मूळ किंमत ६०,०००) याला ३ लाख रुपयांत आपल्या ताफ्यात घेतले. ३५ वर्षीय मुंडे हा इंडियन प्रीमिअर लीगमधील दोन संघांचा सदस्य होता. त्याने २०११ मध्ये पुणे वॉरियर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१९ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने त्याला आपल्या ताफ्यात घेतले.
१९ वर्षांखालील स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोरवालने दोन अर्धशतके झळकावली आणि १८० पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने फलंदाजी करून या वर्षी मार्चमध्ये कारभारी प्रीमियर लीग २०२४ मध्ये त्याच्या संघाला विजय मिळवून दिला.
संघाने अष्टपैलू यश खलाडकरला २० हजार रुपयांच्या मूळ किमतीच्या तुलनेत २.७ लाख रुपयांना खरेदी केले. कोल्हापूर टस्कर्सने लिलावात विकत घेतलेल्या इतर खेळाडूंमध्ये हर्ष संघवी ( २० हजार ), हर्षल मिश्रा ( ४० हजार ), योगेश डोंगरे ( ३० हजार), हृषिकेश दौंड ( २० हजार ) आणि सुमित मरकली ( २० हजार ) यांचा समावेश आहे.
कोल्हापूर टस्कर्सचा संघ – केदार जाधव, अंकित बावणे, सचिन धस, हर्ष संघवी, कीर्तिराज वाडेकर, अनिकेत पोरवाल, हृषीकेश दौंड (१९ वर्षांखालील), योगेश डोंगरे, तरनजीत सिंग, आत्मा पोरे, अक्षय दरेकर, श्रेयश चव्हाण, यश खळदकर, निहाल तुसामद, मनोज यादव, डॉ. उमर शहा, हर्षल मिश्रा ( १९ वर्षांखालील ), सुमित मरकली, सिद्धार्थ म्हात्रे, श्रीकांत मुंढे.
देशात पहिल्यांदाच सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे
मूळ संकल्पना पुण्याची; पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे- जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे
पुणे, दि. ८: लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी कमी मतदान असलेल्या शहरांमध्ये सहकारी गृहनिर्माण संस्थांत मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली असून असा उपक्रम देशात प्रथमच राबविण्यात येत आहे. या उपक्रमाची मूळ संकल्पना पुणे जिल्ह्याची असून पुणे शहरातील ३५ गृहनिर्माण संस्थांमध्ये मतदान केंद्रे स्थापन करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले.
जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदार संघांच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघाची अधिसूचना १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध होणार आहे तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १९ एप्रिल २०२४ अशी आहे. बारामती मतदार संघात नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची अंतिम मुदत २२ एप्रिल आहे. पुणे, शिरुर आणि मावळ मतदार संघांची अधिसूचना प्रसिद्धी १८ एप्रिल रोजी, नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत २५ एप्रिल तर उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत २९ एप्रिल २०२४ अशी आहे.
आजपर्यंत पुणे जिल्ह्यात ४३ लाख २८ हजार ९५४ पुरूष, ३९ लाख ६३ हजार २६९ स्त्री तर ७२८ तृतीयपंथी अशा एकूण ८२ लाख ९२ हजार ९५१ मतदारांची नोंद झाली आहे. नवीन मतदार नोंदणीसाठी अर्ज क्र. ६, आणि स्थलांतरणासाठी अर्ज क्र. ८ सादर करण्याची अद्यापही संधी असून बारामती मतदार संघात ९ एप्रिलपर्यंत तर अन्य तीन मतदार संघात १५ एप्रिलपर्यंत आलेल्या अर्जांवर निवडणूक प्रशासनाकडून कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारसंख्या त्यावेळी निश्चित होईल.
सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. ५ किंवा ५ पेक्षा जास्त मतदान केंद्रे असलेल्या इमारतीमध्ये वाहनतळाची व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, पाळणाघर, स्त्रीयांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृह आदी ठळक सुविधांसह अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी शहरी भागात प्रत्येक वॉर्ड कार्यालयात मदत केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदार संघात बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट वितरणाचे कामकाज कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील मतदान यंत्र वितरण केंद्रातून राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत वितरण सुरू झाले आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बालेवाडी, पुणे आणि बारामती लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामात तर शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (कोरेगाव) औद्यागिक वसाहतीतील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात होणार आहे. सर्व मतमोजणी केंद्राची प्रशासन, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्नीशमन यंत्रणा आदी विभागांनी सुरक्षतेच्यादृष्टिने संयुक्त पाहणी केली आहे.
प्रत्येक विधानसभा मतदार संघात नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना मतदान प्रक्रिया, ईव्हीएम हाताळणीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. निवडणूकीच्या कामकाजासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध असून लोकसभा निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व नियोजन करण्यात आले आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
इंधनाअभावी राहुल यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नाही..रात्रीचा मुक्काच तिथेच
शहडोल-काँग्रेसचे स्टार प्रचारक आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी शहडोल येथील सभेनंतर तिथेच अडकले. इंधनाअभावी त्यांचे हेलिकॉप्टर उडू शकले नसल्याचे सांगण्यात येत आहे. आता ते आज रात्री शहडोलमध्ये मुक्काम करतील. ते आता एका खासगी हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. तर उद्या सकाळी ते येथून निघतील.प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जितू पटवारी म्हणाले की, हेलिकॉप्टरसाठी इंधन भोपाळहून मागवण्यात आले होते, मात्र खराब हवामानामुळे इंधन वेळेवर पोहोचू शकले नाही.
याआधी सोमवारी राहुल गांधी यांनी मांडला आणि शहडोल लोकसभा मतदारसंघात निवडणूक रॅली घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील आश्वासनांचा पुनरुच्चार केला. तसेच अनेक मुद्द्यांवरून मोदी सरकारवर निशाणाही साधला.
सरकार आल्यास देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू
शहडोल येथील बाणगंगा फेअर ग्राऊंडवर आयोजित सभेत राहुल गांधी म्हणाले – आमचे सरकार स्थापन झाले, तर आम्ही देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू. तसेच शेतकऱ्यांना कायदेशीर किमान आधारभूत किंमत दिली जाईल. महालक्ष्मी योजनेंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबातील एका महिलेला वार्षिक एक लाख रुपये देण्याचेही त्यांनी सांगितले.
राहुल गांधी म्हणाले की मोदीजींनी 22-25 लोकांचे 16 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. मनरेगा चालवण्यासाठी 65 हजार कोटी रुपये लागतात. मोदीजींनी मनरेगाचे 24 वर्षांचे कर्ज माफ केले. पण ते शेतकरी, गरीब, मजुरांचे कर्ज माफ करत नाहीत.
भारतात युतीचे सरकार आल्यास अग्निवीर योजना संपुष्टात आणू, असेही राहुल गांधी म्हणाले. कारण लष्करालाही ते नको आहे.
मतदानासाठी खासगी कार्यालयांनी सुट्टी न दिल्यास कारवाई
मुंबई, दि. 8 : मतदानाकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यातील उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ करिता मुंबई उपनगर जिल्ह्यात समाविष्ट लोकसभा मतदारसंघात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे.
मुंबई उपनगर जिल्हा कार्यक्षेत्रात मतदार असलेले मात्र ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही, त्या सर्व चाकरमान्यांना मतदान करता यावे यासाठी भरपगारी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी मतदारांना दोन तासांची सवलत द्यावी, मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.
नरेंद्र मोदींच्या वैचारिक पूर्वजांचेच ‘मुस्लिम लीग’ वर जुने प्रेम व सत्तेसाठी राजकीय आघाडी: नाना पटोले
खर्गे यांच्या टीकेनंतर पटोले यांनीही केली टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून १० वर्षात फक्त ‘अदानी’ परिवाराचाच विकास.
काँग्रेसवर मलई खाण्याचा आरोप करणारे नरेंद्र मोदी इलेक्टोरल बाँडच्या खंडणीवर गप्प का?
मविआ सरकारवर कमिशनखोरीचे पंतप्रधान मोदींचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’.
पीएम केअर फंडाचा हिशोब न देणारे पंतप्रधान दुस-यावर कमिशनखोरीचा आरोप करतात
मुंबई, दि. ८ एप्रिल
काँग्रेस पक्षाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा संकल्प हाती घेऊन ‘न्यायपत्र’ हा जाहीरनामा प्रसिद्ध केल्यापासून भाजपा व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची झोप उडालेली दिसत आहे.काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लिगची छाप असल्याचा पंतप्रधान मोदींचा आरोप हास्यास्पद असून इतिहासाचा अभ्यास नाही हे स्पष्ट दिसते. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात संपूर्ण देश रस्त्यावर उतरला होता तेव्हा जनसंघाचे संस्थापक श्यामा प्रसाद मुखर्जी बंगाल, सिंध आणि वायव्य सरहद्द प्रांतात मुस्लिम लीगच्या सहकार्याने सरकार चालवत होते आणि चळवळ दडपण्याच्या सूचना देत होते. मुस्लीम लीगशी असलेल्या या जुन्या संबंधाचीच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा पुन्हा आठवण होत असावी, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चंद्रपूरच्या सभेतून काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपांचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस पक्ष व इंडिया आघाडीवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचे सरकाराने केलेल्या भ्रष्टाचारापासून पळ काढू शकत नाही. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच मानाचे पान देणाऱ्या मोदींना भ्रष्टाचारावर बोलण्याचा काय अधिकार? कार्पोरेट कंपन्यांना ब्लॅकमेल करुन तसेच ठेकेदारांना मोठी कंत्राटे देण्याच्या बदल्यात इलेक्टोरल बाँडच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुली केली, त्यावर नरेंद्र मोदी का बोलत नाहीत? काँग्रेसने एकाच परिवाराचा विकास केला हा आरोपही तद्दन फालतु असून नरेंद्र मोदी यांनीच मागील १० वर्षात केवळ अदानी परिवाराचाच विकास केला आहे हे सर्व जनतेला माहित आहे.
दलित, वंचित, आदिवासी व मागासवर्गीय कुटुंबासाठी सरकारने मोठे काम केल्याची वल्गणा पंतप्रधान मोदींनी केली परंतु देशातील ८० कोटी लोकांना मोफत रेशन देतो ह्यात कसला अभिमान व कसला विकास? ही तर अधोगती आहे. मोदी सरकारने ८० कोटी जनतेची ५ किलो धान्य देऊन १० वर्ष केवळ लुट आणि लुटच केली आहे. गरिबांना उज्ज्वला योजना देऊन त्यांचे रेशनवरील रॉकेल बंद केले व गॅस सिलिंडरही महाग केला. मुंबईतील मेट्रोसह विविध मोठ्या प्रकल्पांची पायाभरणीच काँग्रेस सरकारने केली याची माहितीही पंतप्रधानांना नाही. समृद्धी महामार्ग व जलयुक्त शिवार योजनांचा गवगवा करताना या दोन्ही प्रकल्पात भ्रष्टाचार बोकाळला होता यातून कोणी मलई खाल्ली हे महाराष्ट्राच्या जनतेला माहित आहे.
काँग्रेस सरकारने दहशतवाद पोसला असा आरोप करताना पंतप्रधान मोदी भाजपा सरकारच्या काळातील दहशतवाद सोयीस्करपणे विसरले. जैश-ए-मोहम्मद अतिरेकी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अज़हर, अहमद ज़रगर आणि शेख अहमद उमर सईद या तीन दहशतवाद्यांना तत्कालीन वाजपेयी सरकारने सोडून दिले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या तीन अतिरेक्यांना कंधारला सोडण्यासाठी खुद्द वाजपेयी सरकारचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह गेले होते. भाजपा सरकारच्या काळातच संसदेवर अतिरेकी झाला होता, पठानकोट एयरबेसवरील हल्लाही भाजपा सरकारच्या काळात झाला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी पुलवामामध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहिद झाले, त्याचा आजपर्यंत तपासही मोदी सरकार करु शकले नाहीत असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या तोंडाने दहशतवादीवर बोलतात? असा प्रहार नाना पटोले यांनी केला.
कॉंग्रेससोबत असलेली शिवसेना नकली -नरेंद्र मोदी
सांगा देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसला काही सवाल विचारत जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, देशाचं विभाजन कुणी केलं? काश्मीरचा प्रश्न कुणी प्रलंबित ठेवला? आतंकवाद कुणामुळे निर्माण झाला? बाबासाहेबांना भारतरत्न पुरस्कारापासून वंचित कोण ठेवलं?. आमचं सरकार सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नक्षलवाद कमजोर पडला आहे. गडचिरोली आता पोलादाचं शहर म्हणून ओळखला जातं. कडू कारलं साखरात घोळा किंवा तुपात तळा, ते कडूच राहणार, अशी कॉंग्रेसची अवस्था आहे. ते कधीच सुधरू शकत नाही.
छत्रपति शिवाजी महाराज के सपनों का भारत बनाने के लिए हम दिन-रात मेहनत कर रहे हैं। चंद्रपुर समेत पूरे महाराष्ट्र में भाजपा-एनडीए के कर्मठ उम्मीदवारों को विजयी बनाने के लिए मेरे परिवारजनों में अभूतपूर्व उत्साह है। https://t.co/Kq1ZeDVlSj
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2024
चंद्रपूर -बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी करत आहेत. तर नकली शिवसेनेवाले हे हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या डीएकमेवाल्यांना महाराष्ट्रात आणून रॅली करतात, कॉंग्रेससोबत नकली शिवसेना आहे,मला आनंद आहे की एकनाथ शिंदेंची शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे घेऊन जात आहे.” असे म्हणत नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. तर कॉंग्रेससह इंडिया आघाडीतील पक्षांनी केवळ परिवारांचा विकास केला. त्यांना देशाचं काही देणं-घेणं नाही. कॉंग्रेस म्हणजे कडू कारल्यासारखे आहे. ते कधीच सुधरू शकत नाही, असा निशाणा मोदींनी लगावला.लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये दाखल झाले होते. भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोलीचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला त्यांना संबोधित केलं. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, चंद्रपूरमधून मला खूप प्रेम मिळालं आहे. विशेष बाब म्हणजे, अयोध्येतल्या भव्य राम मंदिर निर्माणासाठी चंद्रपुरातूनच लाकूड पाठवण्यात आलेलं होतं. एवढंच नाही तर नव्या भारताची ओळख असलेल्या नवीन संसदेच्या इमारतीसाठीही चंद्रपूरचं लाकूड वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळे चंद्रपूरची ख्याती संपूर्ण देशात पोहोचलेली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, लोकसभा 2024 ची निवडणूक ही स्थिरता विरुद्ध अस्थिरता याच्यामधली आहे. एकीकडे भाजपप्रणित एनडीए आहे. या एनडीएचं ध्येय हे देशासाठी मोठे निर्णय घेण्याचं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस आणि इंडिया आघाडी आहे, त्यांचा मंत्र आहे की, जिथे सत्ता मिळेल तिथे खूप मलाई खावी. इंडिया आघाडी नेहमी देशाला अस्थितरतेकडे नेलं आहे. एका स्थिर सरकारची आवश्यकता किती आहे हे महाराष्ट्राशिवाय कोण सांगू शकेल, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेच्या सुरूवातीलाच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, इंडिया आघाडीवाले राज्यात वेगवेगळ्या क्लृपत्या लढवून सत्तेत आले तेव्हा त्यांनी फक्त स्वत:चा विकास केला. स्वत:च्या कुटुंबाचा विकास केला. कुणाचा किती वाटा असेल, कुणाला कोणतं कंत्राट मिळेल, मलाईदार पोस्ट कुणाच्या खात्यात आणि किती येणार या हिशोबातच यांनी पूर्ण महाराष्ट्राचं भविष्य गुरफटून टाकलं होतं. महाराष्ट्राच्या विकासाशी संबंधित प्रोजेक्ट पाहिल्यावर हे म्हणायचे की, कमिशन आणा नाहीतर काम बंद करा. या लोकांनी जलयुक्त शिवार योजना बंद केली. बळीराजा जलसिंजवनी योजना बंद केली. विदर्भ आणि मराठवाड्यात सिंचनासाठी योजना होती ती योजनाही त्यांनी ठप्प केली होती, असे म्हणत मोदींनी जोरदार हल्लाबोल केला.
आता तुम्ही गप्प बसायचे नाही, मग आम्हाला न्याय कधी मिळणार?आबा बागुल यांच्या समर्थनार्थ बैठकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांचा ‘टाहो ‘
पुणे-सलग सहा वेळा निवडून येत असतानाही पक्षातील अंतर्गत राजकारणात डावलले जात असेल तर कधीपर्यंत सहन करायचे. दरवेळी तुम्ही गप्प का बसायचे? मग कार्यकर्त्यांची दखल कोण घेणार, त्यांना कधी न्याय मिळणार अशी प्रश्नांची सरबत्ती करताना तुमची प्रगती नाहीतर शहराचीही नाही आणि कार्यकर्त्यांचीही नाही. शासकीय नोकऱ्यांमध्ये पदोन्नती, इन्क्रिमेंट असते.ती राजकारणात का नाही अशा भावना एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी मांडल्या.
माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या समर्थनार्थ सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिर येथे एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. त्यावेळी या भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल, संरक्षण विभागातून निवृत्त झालेले घनःश्याम सावंत,अनिल जाधव तसेच रमेश भंडारी, नंदकुमार बानगुडे,द.स.पोळेकर,गुलाब नेटके आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी घनःश्याम सावंत म्हणाले, शासकीय नोकऱ्यांमध्ये दर दहा वर्षांनी पदोन्नती नाहीतर इन्क्रिमेंट तरी असते. पण राजकारणात चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तीला तेही मिळत नाही. हेच आबा बागुल यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डावलल्यामुळे अधोरेखित झाले आहे. मग असे असेल तर किती काळ आपण गप्प बसायचे.त्यामुळे तुम्ही गप्प बसले तरी आता आम्ही गप्प बसणार नाही. किती काळ अन्याय सहन करायचा याकडे त्यांनी लक्ष वेधले.
संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी अनिल जाधव म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे नक्की निकष काय ? काय पाहून उमेदवारी दिली जाते हाच मोठा प्रश्न आहे. जर निवडून येण्याची क्षमता असेल तर आबा बागुल यांच्यात ती क्षमता मोठी आहे आणि ते सहजरित्या विजय संपादन करू शकतात यात कुणाचेही दुमत नाही ;पण काँग्रेसमध्ये नुकत्याच आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली जाते मग काँग्रेस पक्षाच्या एक व्यक्ती,एक पद या धोरणाला काय अर्थ? असा सवालही त्यांनी केला. एकीकडे राहुल गांधी देशभर न्याय यात्रा काढून फिरत असताना अशाप्रकारे काँग्रेसच्या एक व्यक्ती,एक पद या धोरणाला राज्यात हरताळ फासणाऱ्यांचा राहुल गांधी यांना कायम भ्रमंती करायला भाग पडायचा हेतू आहे का ? हा संशयही बळावत आहे. राहुल गांधी यांच्या देश भ्रमंती प्रमाणे अन्य पक्षातून ‘भ्रमंती’ करणारे राज्यातील काँग्रेस नेतृत्वांना दिसत असेल तर आबा बागुल यांच्या सारखा एकनिष्ठ कधी दिसणार ? याकडे त्यांनी लक्ष वेधले.
आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व कायम पाळणारे आबा बागुल यांनी दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले . गुन्हेगारी , व्यसनापासून मुलांना दूर ठेवण्यासाठी हरवलेले संस्कार मालिका सुरु केली.नगरसेवक पदाच्या माध्यमातून प्रभागच काय संपूर्ण शहराच्या विकासाला दिशा दिली. मग तुमचीच प्रगती होणार नसेल तर आमची कधी होणार अशा व्यथा यावेळी कार्यकर्त्यांनी मांडताना आबा बागुल यांच्यात खासदार व्हायची क्षमता आहे आणि तरच शहराची प्रगती होईल. त्यामुळे तुम्ही आता गप्प बसायचे नाही आणि आम्ही गप्प बसणार नाही लोकसभेसाठी नाही परंतु आता येणाऱ्या विधानसभेत आपण आमदार म्हणून जाण्यासाठी अशी आडकाठी आम्ही कदापि सहन करणार नाही. अशी भूमिकाही मांडली.
यावेळी माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले, जेंव्हा त्यांना कळेल तेंव्हा ;पण आपण आपले काम सुरूच ठेवायचे.हीच आपली भूमिका आहे. आपला ‘हात’ कणखरच ठेवायचा मात्र त्या हातात कधीच ‘कमळ’ येणार नाही. न्याय कधी ना कधी तरी मिळेल. राजकारणच म्हणजेच सर्व काही नाही. समाजकारण हेच महत्वाचे आहे. त्यामुळे निराश होऊ नका. उलट मन प्रफुल्लित ठेवा. उशीर झाला तरी आपण थेट सर्व काही मिळवू असा आशावाद आबा बागुल यांनी व्यक्त करताना पुढच्या बैठकीत रूपरेषा ठरवू असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी शहरातील विविध भागांतील महिला व पुरुष एकनिष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक अमित बागुल यांनी केले.
२२ वर्षीय मैत्रिणीचे अपहरण, खंडणी घेऊनही केला खून
पुणे: मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यात घडली आहे. मैत्रीचा गैरफायदा घेत पैशांसाठी टोकाला जात मैत्रिणीचा खून केल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. लातूर येथून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका २२ वर्षीय तरुणीचे तिच्याच मित्रांनी खंडणीसाठी अपहरण केले. मात्र, त्यानंतर पैसे मिळाले तरी तरूणी घरी आपले नाव सांगेल या भीतीने या मित्रांनी तिचा खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी सुपा परिसरातील एका शेतात मृतदेह पुरून टाकला. खून केल्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मोबाईलवरून तिच्या कुटुंबीयाकडे ९ लाखांची खंडणी देखील मागितली. पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा उलगडा केला असून याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असल्याची माहिती परिमंडळ ४ चे पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली.भाग्यश्री सूर्यकांत सुडे (२२, रा. विमानतळ, मुळ रा. हरंगुळ बुद्रुक, ता. लातूर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी शिवम फुलावळे, सागर जाधव आणि सुरेश इंदोरे या तिघांना अटक केली आहे. मयत तरुणीचे वडील सूर्यकांत ज्ञानोबा सुडे (४९) यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात ३० मार्च रोजी अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळची लातूरची असलेली भाग्यश्री ही वाघोली परिसरातील एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. ३० मार्चच्या रात्री नऊच्या सुमारास ती विमानतळ परिसरातील फिनिक्स मॉल येथून बेपत्ता झाली होती. दरम्यान, मुलीसोबत संपर्क होत नसल्याने तिच्या आई-वडिलांनी पुणे गाठून पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याच कालावधीत तिच्या आई-वडिलांच्या मोबाईलवर खंडणीसाठी मेसेजही आला. नऊ लाख रुपये द्या अन्यथा मुलीला मारून टाकू अशी धमकी त्यामध्ये देण्यात आली होती.
