विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टचर
पुणे : विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या पद्मभूषण डॉ. वसंतदादा पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्टचरच्या विद्यार्थ्यांचे एक्झिट वास्तु प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. एका वास्तूचा तिच्या कल्पनेपासून ते अंतिम बांधकाम पूर्ण होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पातून सादर केला.
बिबवेवाडी येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हे तीन दिवसीय प्रदर्शन झाले. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे मूल्यांकन करण्याकरिता भारतातील १६ नामवंत वास्तुरचनाकार परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अहमदाबाद येथून पी. व्ही. के रामेश्वर व सूर्या काकाणी; दिल्ली येथून संजय कानविंदे,तनुजा कानविंदे, आय.एम चिस्ती; बंगळुरू येथून आनंद कृष्णमूर्ती व विजय नार्णपट्टी; आणि मुंबई येथून विकास दिलावरी परीक्षक म्हणून उपस्थित होते. त्याचबरोबर पुण्यातून विक्रम हुंडेकर, मनिष बँकर, अंजली कुमठेकर, द्वापायन चक्रवर्ती, जयंत धारप, बेक जॉन, रवी कदम, व तुषार कोठवडे उपस्थित होते. एकूण ७१ विद्यार्थ्यांनी प्रकल्पांचे सादरीकरण केले.
तिसऱ्या दिवशी प्रदर्शनास अनेक प्रख्यात वास्तुविशारद विकास भंडारी, कल्पक भंडारी, लक्ष्मण थिटे, गिरीश दोषी, माधव हुंडेकर, प्रशांत देशमुख इत्यादी यांनी भेट दिली.
महाविद्यालयाचे अध्यक्ष अभय छाजेड, सरचिटणीस, जितेंद्र पितळीया, मार्गदर्शक विकास भंडारी प्राचार्य प्रसन्न देसाई, विजया श्रीनिवासन व प्राध्यापक शेखर गरुड, यांनी मार्गदर्शन केले.