Home Blog Page 1100

पिंपरी चिंचवड विद्यापीठात ‘अनंतम २०२४’ सांस्कृतिक महोत्सव साजरा

पिंपरी, पुणे (दि. ११ एप्रिल २०२४) पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठात (पीसीयु) ‘अनंतम २०२४’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित असलेल्या
‘नाच गं घुमा’ या चित्रपटातील कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील कलाकार स्वप्नील जोशी, सुकन्या कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत, मायरा वैकुल, अलाहाबाद येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंफॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे संचालक डॉ. मुकुल सुताने आदी उपस्थित होते.

‘अनंतम -२०२४’ मध्ये कुलदीप सिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी चित्तथरारक ‘बाईक शो’ प्रस्तुत केला तसेच प्रसिद्ध बॅंड ‘एमएच ४३’ यांच्या संगीताच्या तालावर तरुणाई थिरकली, तर फॅशन शोला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अंजू बाला यांनी केले.

आठ वर्षीय चिमुकल्याने पूर्ण केले रमजानचे ३० उपवास

पिंपरी, पुणे: मुस्लीम धर्मात रमजान महिना हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात दररोज उपवास केला जातो. या निर्जल उपवासांना फार महत्व आहे. पिंपरी-चिंचवड मधील आदि जमीर मुल्ला या आठ वर्षांच्या चिमुकल्याने यावर्षी संपूर्ण महिनाभर उपवास पूर्ण केले. एवढ्या लहान वयात त्याने केलेल्या उपवासांबाबत त्याचे कौतुक केले जात आहे.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते, वडगाव मावळ येथील
पिंपरी-चिंचवड विद्यापीठाचे मार्केटिंग हेड जमीर मुल्ला यांचा मुलगा तर सामाजिक कार्यकर्ते दस्तगीर मुल्ला यांचा नातू आदी मुल्ला याने यावर्षी प्रथमच रमजानचे उपवास केले. पहिल्याच वर्षी त्याने सर्व ३० उपवास पूर्ण केले. कोवळे वय आणि कडक उन्हाळा अशा परिस्थितीत त्याने हे उपवास पूर्ण केल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
इस्लामिक कॅलेंडर नुसार नववा महिना रमजानचा असतो. या महिन्याला मुस्लीम समाजात सर्वात पवित्र महिना मानला जातो. रमजानच्या महिन्यात सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत निर्जल उपवास केला जातो. सूर्यास्त झाल्यानंतर रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास सोडणे सुन्नत मानले जाते. इस्लामिक मान्यतेनुसार, खजूर हे पैगंबर हजरत मोहम्मद यांचे आवडते फळ होते. ते देखील खजूर खाऊनच रोजा सोडायचे. त्यामुळे मुस्लिम धर्माचे लोकही उपवास सोडण्यासाठी आधी खजूर खातात आणि त्यानंतर इतर पदार्थांचे सेवन करतात.

आदिने देखील दररोज दिवसाचे १४ तासांहून अधिक काळ उपवास केला. शाळेची दिनचर्या सांभाळून त्याने कुठेही न ढळता हे उपवास पूर्ण केले आहेत. त्याने केलेले व्रत समाजातील इतर मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे त्याचे शहरभर कौतुक होत आहे.

गरीब पंतप्रधान झाला अन २०लाखांचा सूट, ३ लाखांचा चष्मा, १.५ लाखांचा पेन आणि ८ हजार कोटींचे विमान प्रत्येक गरिबाला मिळाले ..सांगा हो कि नाही ?

केंद्रात १० वर्ष सत्ता असताना नरेंद्र मोदींना एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण का झाली नाही ? : नाना पटोले.

मोदीजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपवण्याची भाषा काँग्रेस नाही तर भाजपा व आरएसएसवालेच करतात.

देशात मोदी सरकारच्या काळातच दलित, मागासवर्गीय, आदिवासी लोकांवर अनन्वीत अत्याचार.

लोकसभा निवडणुकीत भाजपा व एनडीएचा पराभव करुन जनताच १० वर्षाच्या पपाची शिक्षा देईल.

मुंबई
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणुका आल्या की दलित, आदिवासी, ओबीसी, गरिब लोकांची आठवण येते. १० वर्षात या समाजासाठी मोदी सरकारने काहीही केलेले नाही. १० वर्षात या समाज घटकांवर अनन्वित अत्याचार केले गेले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण मोदी सरकारमुळेच गेले आहे. आदिवासींच्या जमिनी हिरावून घेऊन उद्योगपतींच्या घशात घातल्या, गरिबांना अधिक गरिब बनवले आणि लोकसभेच्या निवडणुका सुरु झाल्या की एससी, एसटी, आदिवासी समाजाची आठवण झाली का ? असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामटेक येथील प्रचार सभेत काँग्रेस व इंडिया आघाडीवर केलेल्या आरोपाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, १० वर्षात एससी, एसटी, आदिवासी समाजाचा विकास केला हा मोदींचा दावा खोटा आहे. उलट मोदी सरकारने मागासवर्गीय समाजासाठी असलेल्या कल्याणकारी योजनांच्या बजेटमध्ये कपात केली. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही. आदिवासी समाजाच्या महिलेला राष्ट्रपती केल्याचे सांगताना महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घटनापासून वंचित ठेवले, अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या सोहळ्यापासून वंचित ठेवून देशाच्या राष्ट्रपती, महिला व आदिवासी समाजाचा अपमान केला असताना कोणत्या तोंडाने नरेंद्र मोदी आदिवासींचा सन्मान केला असे सांगतात. गरिब समाजाला विकासाचा लाभ पोहचला असता तर ८० कोटी जनतेला ५ किलो मोफत रोशन द्यावे लागले नसते. ५ किलो मोफत धान्य देऊन १० वर्ष एससी, एसटी, आदिवासी व गरिब लोकांची मोदी सरकारने महागाई करुन प्रचंड लुट केली, या समाजाला जगणे कठीण करुन ठेवले आहे.
नरेंद्र मोदींनी आज पुन्हा एकदा आपण गरिब समाजातून आल्यानेच विरोधक आपल्याला शिव्या देतात असे सांगून सहानुभुती मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु २० लाख रुपयांचा सूट, ३ लाखांचा चष्मा, १.५ लाखांचा पेन आणि ८ हजार कोटींचे विमान वापरणारे नरेंद्र मोदी गरिब कसे? हा प्रश्न देशातील गरिब जनतेला पडला आहे, अशी गरिबी या समाजाला का लाभली नाही? ह्याचे उत्तर मोदींनी दिले पाहिजे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राजकारण काँग्रेसने संपवले हा नरेंद्र मोदी यांचा आरोपही खोटा व दिशाभूल करणारा आहे. भाजपाची मातृसंस्था आरएसएसला संविधान, देशाचा तिरंगा झेंडा पहिल्यापासूनच मान्य नाही. संविधान बदलण्याची भाषा संघ परिवार व भाजपाचे नेतेच सातत्याने करत असतात. लोकसभा निवडणुका सुरु होताच अनंतकुमार हेगडे या भाजपा नेत्याने ४०० पार चे बहुमत आले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागारानेही संविधान बदलले पाहिजे असे स्पष्ट केले आहे, असे असताना संविधानावरुन काँग्रेसवरच आरोप करणे हे पंतप्रधान मोदी व भाजपाला शोभत नाही, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

मागील १० वर्षातील मोदी सरकारचा कारभार हा शेतकरी, कामगार, महिला, तरुणवर्ग यांना उद्ध्वस्थ करणारा ठरला आहे. देशात ४० वर्षातील सर्वात मोठी बेरोजगारी आहे, मोदी सरकारने नोकर भरती केली नाही तरुणांच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही आणि १० वर्ष हा तर ट्रेलर आहे असे म्हणतात, पण हा ट्रेलरच जनतेला देशोधडीला लावणारा असेल तर जनता पुन्हा भाजपा व एनडीएला मते कशाला देईल. १० वर्षातील मोदी सरकारच्या पापाची शिक्षा जनता या लोकसभा निवडणुकीत देऊन त्यांना घरी बसवेल, असा विश्वासही नाना पटोले यांनी व्यक्त केला.

मतदानासाठी 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरण्यात येणार

मुंबई : राज्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून 19, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे, ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. जे मतदार छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत, अशा मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या पुराव्यांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), केंद्र अथवा राज्य शासन, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागातर्फे छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक, पॅन कार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र, निवृत्तीवेतनाची दस्तावेज, संसद, विधानसभा, विधानपरिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र, आधार कार्ड, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तिकरण मंत्रालयाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींना वितरित केलेले विशेष ओळखपत्र, कामगार मंत्रालयाद्वारा वितरित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड हे 12 पुरावे मतदानासाठी ग्राह्य धरली जाणार आहेत. प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक असणार आहे.

एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात बदल केला असेल, पण त्याला अद्याप नवे ओळखपत्र मिळाले नसेल तर आधीचे ओळखपत्र ग्राह्य धरले जाईल. मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहे. तसेच सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदान दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदान केंद्र, यादी भाग क्रमांक, मतदानाची तारीख, वेळ आदी माहितीच्या चिठ्ठ्यांचे निवडणूक कार्यालयाकडून वितरण केले जाईल. मतदारांनी मतदान केंद्रावर जाताना माहिती- चिठ्ठी आणि छायाचित्र ओळखपत्रासोबत घेऊन यावे, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

जिल्ह्यात दोन विविध घटनांमध्ये ६५ लाख रुपयांची रोकड आणि वाहन जप्त

पुणे- जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून भरारी पथकाद्वारे आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. पोलीस पथक आणि भरारी पथकांद्वारे दोन विविध घटनांमध्ये सुमारे ६५ लाखांची रोकड आणि एक वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.

आचारसंहिता काळात ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जवळ बाळगता येत नाही. भरारी पथकांतर्फे विविध ठिकाणी जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. भोसरी एमआयडीसी पोलिसांनी भोसरी एममआयडीसी पोलीस स्टेशन जवळील सी सर्कल जवळ ८ एप्रिल रोजी मध्यरात्री फॅन्सी नंबर प्लेट असलेली आणि संशयास्पदरितीने फिरणारी काळ्या रंगाची फॉरच्यूनर गाडी आढळून आली. पोलीसांनी अधिक तपास करून गाडीतून १३ लाख ९० हजाराच्या ५०० रुपयांच्या नोटा आणि ३० लाख रुपये किंमतीचे वाहनही पंचासमक्ष पंचनामा करुन जप्त केले आहे.

तर दुसऱ्या एका घटनेत १० एप्रिल रोजी दुपारी शिरुर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शिरुर नगर परिषद क्षेत्रातील कमान पूलाजवळ एका खाजगी वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नेली जात असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत माहिती मिळताच भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी प्राप्तिकर विभागाला याबाबत माहिती दिली. सदर रक्कम कोषागारात ठेवण्यात आली असून प्राप्तिकर विभागाच्या चौकशीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांची सध्याची दयनीय अवस्था पाहता, पुन्हा महात्मा फुलेंनी सांगितलेला शेतकऱ्यांचा असूड उगारण्याची वेळ – खासदार डॉ. अमोल कोल्हे

पुणे : आजचा शेतकरी हा केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पिचलेला आहे. महात्मा फुले यांनी 1883 मध्ये शेतकऱ्याच्या अवस्थेचे एवढे प्रभावी व वास्तवदर्शी चित्रण महात्मा फुल्यांनी केले आहे त्याला तोड नाही. वर्तमानात यात किंचीतही बदल झालेला नाही. त्यामुळे या चुकीच्या शेती विषयक धोरणांच्या विरोधात हाच असूड उगारण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं.

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त डॉ. कोल्हे यांनी फुले वाड्यात अभिवादन केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे मोहन जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी डॉ. अमोल कोल्हे यांनी महात्मा फुले लिखित ‘शेतकऱ्यांचा असूड’ या पुस्तकातील काही भागांचे वाचन केले. डॉ. कोल्हे म्हणाले की, फुल्यांनी शेतकऱ्यांची स्थिती स्वतंत्र भारतात अजून हलाकीची झालेली आहे. महात्मा फुले यांनी १८८३ मध्ये ‘शेतकऱ्याचा असूड’ हा  ग्रंथ लिहिला. शेतकऱ्याच्या विदारक परिस्थितीचे चित्रण यात करून त्याच्या विकासाचा मार्गही सांगितला आहे.

सध्या कांदा उत्पादक शेतकरी असो की सोयाबीन, दूध उत्पादक शेतकरी असो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. अल्पभूधारक शेतकरी हा नागवला जात आहे. त्याविरोधात आवाज उठवण, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच महात्मा फुले यांना अभिवादन असले.

शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदारांना संसदेतून निलंबित करणे हि दडपशाही नाही काय ?

पुणे-कांद्याला हमीभाव द्या, ही मागणी केल्याने मला आणि खासदार अमोल कोल्हेंना संसदेतून एक दिवसासाठी निलंबित कऱण्यात आलं होतं. ही सरकारची दडपशाही आहे. यंदाच्या निवडणूकीत आम्ही दहपशाहीच्या विरोधात लढणार आहोत, असं बारामती लोकसभेच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या आहेत. महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी माहाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकरांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

दरम्यान खासदार सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, संसदेत मी आणि अमोल कोल्हे यांनी कांद्याचा प्रश्न कायम उपस्थित केला. मात्र या च प्रश्नावरुन आम्हाला संसदेतून एका दिवसासाठी निलंबित करण्यात आले होते. आम्ही कोणत्याही प्रकारचे वाईट कृत्य केले नव्हते तर शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. होते. शिवाय कांद्याला हमीभाव द्या, एवढी साधी मागणी सरकारकडे केली असताना त्यांनी आम्हाला निलंबित केले होते, असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे

सुप्रिया सुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे पक्षाचे नाही, तर देशाचे पंतप्रधान आहेत. एक नागरिक म्हणून त्यांना एक विनंती आहे. ते उपस्थित असलेल्या व्यासपीठावरून त्यांच्या पक्षाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिशय गलिच्छ भाषण केले, त्याबद्दल योग्य कारवाई करावी, ही अपेक्षा आहे, असे सुळेंनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी काहीतरी अ‍ॅक्शन घ्यावी, राजकारण होत राहील पण हा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. सगळ्याच पक्षाच्या आणि सगळ्यांनी महाराष्ट्राची संस्कृती जपली पाहिजे. गलिच्छ वाक्य बोलणे झाले हे थांबले पाहिजे. त्याचा मी निषेध करते. माझी अपेक्षा आहे पंतप्रधान यांचा मानसन्मान त्यांच्या पक्षाच्या लोकांनी ठेवला पाहिजे.

अमोल कोल्हेंनी लगावला टोला

अमोल कोल्हे म्हणाले की, महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करत असतानाच शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकाचं वाचन करण्याचं कारण आहे की, आज सर्वसामान्य शेतकऱ्यांवर वाईट परिस्थिती उद्भवली आहे. कांदा निर्यातबंदी, सोयाबीन, संत्रा उत्पादक, कापूस उत्पादक आणि दूध उत्पादक असेल या सर्व शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. सरकार शेतकऱ्याचे ऐकून घेत नाही आहे, त्यांना कोणी वाली नाही आहे. कृषिप्रधान म्हणवणाऱ्या जाणाऱ्या देशाला मध्यप्रदेशच्या निवडणुका झाल्यापासून कृषीमंत्री नसावा, याच्याइतक दुसरे दुर्दैव नाही.

मला जेवढं बोलायचं तेवढच मी बोलेन,तेवढंच सांगेन…मला मूर्ख समजलात काय ? दादांचे पत्रकारांवर तोफा डागणे सुरूच

पुणे- आज महात्मा फुले जयंती आणि रमजान ईद निमित्त महात्मा फुले स्मारकावर अभिवादन करायला आलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि आपल्या असंख्य सहकार्यांच्याबरोबर सकाळी येथे अभिवादन झाल्यावर नाश्ता केला पण पत्रकारांशी त्यानंतर संवाद साधताना मात्र त्यांनी मिसळीचा झणझणित पणा आपल्या जिभेवर तसाच ठेवत यावेळीही पत्रकारांवर तोफा डागण्याची संधी दवडली नाही

अजित पवार यावेळी म्हणाले ,’आज अकरा तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती तसंच ईद हे दोन्ही एकाच दिवशी आलेले….१४ तारखेला घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्याच्यानंतर राम नवमी आहे.त्याच्यानंतर हनुमान जयंती अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी या एप्रिल महिन्यामध्ये आलेल्या आहेत

मी सुरुवातीलाच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला आणि सर्व आमच्या बंधू-भगिनींना जयंतीच्या शुभेच्छा देतो.महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मारक आहे.इथं त्यांना मी अभिवादन करण्याच्या करता महात्मा फुले वाड्यामध्ये आलेलो होतो. एकनाथराव शिंदे,देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यामध्ये भुजबळ साहेबांचा पण योगदान आहे आणि सगळ्यांनी मिळून अतिशय चांगला अशा पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मारक करायचं ठरवलेलं आहे.

ऑलरेडी स्मारक झालेले परंतु जागा फार कमी पडतील म्हणून आजूबाजूची मोठ्या प्रमाणावर जागा घेऊन ज्या लोकांची जागा घेतली जाणारे त्यांना व्यवस्थितपणे मोबदला देऊन त्यांचा समाधान होईल. अशा प्रकारचं त्यांचा पुनर्वसन करण्याचा आमचा आहे.

भिडे वाड्यामध्ये देखील जिथं पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेले होते ती पण जागा आता सगळी ताब्यात आलेली आहे.ती कॉर्पोरेशनच्या ताब्यामध्ये आता पण दिलेली आहे.त्याचे पाच सहा प्लॅन देखील तयार झालेले त्याच्यामध्ये साधारण लोकांना जो मान्य होईल अशा प्रकारचा प्लॅन पास केला जाईल.आणि नंतर त्याचं काम सुरू केलं जाईल या दोन्ही कामातदार कुठल्याही प्रकारची निधीची अडचण भासणार नाही याची ग्वाही देतो.

विजयराव शिवतरे साहेबांनी स्वतः शिंदे देवेंद्रजी मी आणि विजयराव बसलो होतो. त्याच वेळेस त्यांचे काही महत्त्वाचे त्या भागातले विषय आहेत व पिण्याचा पाण्याचा,शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे काही भागातल्या एमआयडीसीच्या संदर्भातला बारामती लोकसभा मतदारसंघातला आहे.असे काही त्यांचे विषय आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भामध्ये त्यांनी चर्चा केली ते म्हणाले की महायुतीच्या बरोबर आहे परंतु हे विषय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मार्गी लावले पाहिजेत ते काही पुरंदर विधानसभा मतदारसंघ आणि काही बारामती लोकसभा मतदारसंघ भोर मधला काही भाग आहेत इतर भागातले बारामती भागातले अशा वेगवेगळ्या भागातले त्यांचे विषय आहेत त्या विषयाला कुठेतरी मदत व्हावी त्याविषयीची सोडवू नको व्हावी या दृष्टिकोनातून आमची चर्चा झाली त्याच वेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की मी एक दिवस सभा आयोजित करतो त्या सभेला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शब्द दिला की तुम्ही ज्या दिवशी सभा आयोजित कराल त्यावेळेस येऊ त्या पद्धतीने त्यांनी आज सभा तिथल्या ग्राउंड वर सभा आयोजित केलेली आहे.

शिवतारेंना कोणाकोणाचे फोन गेले होते ? या प्रश्नावर ते म्हणाले तुम्ही मला मी मूर्ख समजू नका?आंबेडकरांनी जे संविधान दिलेलंय त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे आणि तेवढच मी बोलेन.मला सांगायचं ते सांगितलं आहे.

सातारा आणि नाशिक सगळं होईल आपण काळजी करू नका.आज कारण ते पुढच्या टप्प्यात त्याचे फॉर्म भरायला अजून काही सुरुवात झाली नाही.नाशिक किंवा कोकण यांच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहे म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला पाचवा टप्पा हा शेवटचा आहेआणि देशातला संवाद सातवा सातवा टप्पा शेवटचा आहे तर त्याला अजून विलंब आहे.आज आम्ही मी तर मुख्यमंत्र्यांच्या बरोबरच परत जाणार आहे त्यावेळेस आम्ही जागा वाटप त्याच्याबद्दलची चर्चा करू देवेंद्रजी पण असतील उद्या पण मी मुंबईमध्ये आहे आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बसू आणि योग्य तो मार्ग काढून

पहिल्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका आहेत त्या विदर्भातल्या आहेत विशेषता भंडारा गोंदिया रामटेक नागपूर चंद्रपूर गडचिरोली त्या भागातल्या आणि त्याच्यावर त्यांची एक चंद्रपूरला सभा झाली दुसरी माझ्या माहितीप्रमाणे विदर्भात सभा आहे आणि त्यांनी काय भूमिका मांडली हे आपण सगळ्यांनी ऐकले आहे.

त्यांनी घरवापसी केली आहे.भाजप वाढवलं त्यात त्याच्यामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांचे नाव आपल्याला घेता येईल त्याच्यामध्ये एकनाथराव खडसे साहेबांचं नाव घेता येईल प्रमोद महाजन साहेबांचं नाव घेता येईल नितीन गडकरी साहेबांचा नाव घेता येईल हे सगळेजण आम्ही त्या काळामध्ये होते परंतु खऱ्या अर्थाने उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्व दूरपर्यंत भारतीय जनता पक्ष पोहोचवण्याचं काम खडसे यांनी केलं.हे मी तरी बघत आलो आहे. मी राजकारणात आल्यापासून तिथे खडसे साहेबांच प्रभुत्व होतं आणि त्यांनीच खऱ्या अर्थाने ही संघटना भारतीय जनता पक्षाला एक सर्वसमावेशक म्हणजे अशा पद्धतीचा शेअर सर्व चेहरा देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला वजन समाजाचे मागासवर्गीय समाजातील सगळ्या समाजाला तिथं सोशल इंजिनिअरिंग ज्याला आपण म्हणतो ते तिथे करण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्या योगदान मोठं होतं परंतु मोदी काही कारणानिमित्त ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते ते आता घरवापसी केली आहे

परवा गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशभरातलं काम त्यांनी पाहिलं आहे त्यांना आवडतं म्हणून त्यांनी बिनिश्वर्त पाठिंबा आम्हाला दिलेला आहे याचा नक्कीच फायदा महायुतीला होईल राज ठाकरेंचे नेतृत्व वेगळे आहे

पुण्यातील कमांड रुग्णालय हे पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन श्रवण प्रत्यारोपण यशस्वीरित्या करणारे देशातील पहिले सरकारी रुग्णालय ठरले


नवी दिल्‍ली:

पुण्याच्या कमांड रुग्णालयाच्या (सदर्न कमांड) कान, नाक आणि घसा (ENT) विभागाने जन्मजात बाह्य आणि कानाच्या आतील विसंगतींनी ग्रस्त आणि मोठ्या प्रमाणावर श्रवणशक्ती कमी झालेल्या 7 वर्षाच्या मुलामध्ये तसेच एकाच कानाने बहिरेपण असलेल्या (SSD) एका प्रौढ व्यक्तीवर यशस्वी पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन श्रवण प्रत्यारोपण केले आणि अशाप्रकारचे प्रत्यारोपण करणारे हे रुग्णालय देशभरातील पहिले सरकारी रुग्णालय बनले आहे.

कमांड रुग्णालयाचा (सदर्न कमांड) ENT विभाग हे AFMS चे नियुक्त न्यूरोटोलॉजी केंद्र आहे. हा विभाग अनेक वर्षांपासून अवलंबित्व असलेल्या ग्राहकांना श्रवणयंत्र बसवत आहे. ऍक्टिव्ह पिझोइलेक्ट्रिक बोन कंडक्शन हियरिंग इम्प्लांट सिस्टीम हे श्रवणदोष असलेल्या रूग्णांसाठी [कंडक्टिव्ह लॉस (ऑरल एट्रेसिया), दोन्ही कानाने किंवा एका कानाने बहिरेपणा] प्रत्यारोपण करण्यायोग्य वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे. उपकरणांची किंमत नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे, ज्यामुळे त्याचा वापर मर्यादित स्वरूपात होतो.
कंडक्टिव्ह (ध्वनिलहरी कर्णपटलापर्यंत न पोहोचणे) /दोन्ही कानाने किंवा एका कानाने बहिरेपणा असलेले असे रुग्णांचे प्रकार आहेत, ज्यांना प्रत्यारोपण किंवा श्रवणयंत्र किंवा कानातील शस्त्रक्रियेने फायदा होत नाही. संबंधित अपंगत्व कमी करण्यासाठी, मुलांमध्ये चांगल्या शैक्षणिक परिणामासाठी आणि प्रौढांमधील सामाजिक जीवनासाठी श्रवणवृद्धी प्रदान करणे अत्यावश्यक आहे. रुग्णांच्या अशा गटांमध्ये त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी बोन कंडक्शन रोपण हा निश्चित श्रवण उपाय आहे आणि सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवांनी हे त्वरित अंमलात आणले.

सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेचे महासंचालक जनरल दलजीत सिंग आणि डीजीएमएस (लष्कर) लेफ्टनंट जनरल अरिंदम चटर्जी यांनी कमांड रुग्णालयाचे (एससी) अभिनंदन केले आहे आणि संस्थेला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
कर्नल (डॉ) राहुल कुरकुरे, न्यूरोटोलॉजिस्ट आणि इम्प्लांट सर्जन कर्नल (डॉ) नितू सिंग, वरिष्ठ सल्लागार आणि एचओडी (ईएनटी) यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्याच्या कमांड रुग्णालयात (SC)या रूग्णांवर यशस्वी रोपण करण्यात आले. पुण्याचे कमांड रुग्णालय (SC), हे AFMS च्या प्रमुख संस्थांपैकी एक आहे, सध्या मेजर जनरल बी नांबियार यांच्या नेतृत्वाखाली आहे. संपूर्ण AFMS मधील सर्वोत्कृष्ट रुग्णालय म्हणून रुग्णालयाला नुकतेच सर्वात प्रतिष्ठित “रक्षा मंत्री” चषकाने सन्मानित करण्यात आले.


सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे- सुप्रिया सुळे

पुणे-मंत्र्यांनी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावर कारवाई झालीच पाहिजे,असे सांगत चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.बारामती लोकसभा मतदार संघातून अपक्ष लढण्याची तयारी करणारे विजय शिवतारे अचानक शांत झाले आहेत. या दरम्यान त्यांनी आपल्याला शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरीष्ठ नेते फोन करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. तो नेता कोण होता? हे मलाही समजून घ्यायचे असल्याचे बारामती लोकसभा मतदार संघातील शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी म्हटलेआहे.

नरेंद्र मोदी हे एका पक्षाचे नव्हे तर या देशाचे पंतप्रधान आहेत. मात्र, त्यांच्या पक्षाच्या एका उमेदवाराने व्यासपीठावरुन गलिच्छ भाषा वापरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर गलिच्छ वाक्य बोलले गेले, हे थांबले पाहिजे. मी स्वतः याचा जाहीर निषेध करत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. मोदीजी जरी एका पक्षाचे असले तरी देखील पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांच्या पदावरील माणसांचा सन्मान ठेवायला हवा होता. अशा मंत्र्यांनी केलेल्या गलिच्छ वक्तव्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्यापासून मी दुष्काळी परिस्थिती बाबत विविध प्रकारच्या मागण्या करत आहेत. राज्यातील मजूर अडचणीत आहेत, अंगणवाडी सेविका अडचणीत आहेत. इतर घटकांसह सर्वजण अनेक अडचणीत सापडले आहे. उजनी धरण्यात एक थेंब पाणी नाही. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ 35 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन अडीच महिने तरी पाणी पुरेल का? अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे. असे असताना ट्रिपल इंजिनचे सरकार अतिशय असंवेदनशील दिसत आहे. राज्य सरकार केवळ पक्ष फोडाफोडीचे काम करत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत पुणे शहरातील विविध पक्षांच्या महिलांचा शिवसेनेत प्रवेश

मनसेच्या पाठिंब्याबद्दल मानले आभार

पुणे दि.१०: पुण्यातील कोथरूड, वडगाव, खडकवासला विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षांतील महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, शिवसेना कामगार सेना अध्यक्ष सुधीर कुरुमकर, शिवसेना महिला आघाडीच्या सुदर्शना त्रिगुणाईत, श्रद्धा शिंदे, श्रुती नाझीरकर, विद्या शिंदे, निलेश गिरमे, लक्ष्मण आरडे आदी मान्यवरांच्या बरोबरच शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्या म्हणाल्या की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर जनतेचा विश्वास वाढत आहे. आतापर्यंत आमचा प्रवास तीन चाकीत सुरू होता मात्र मनसेने आम्हाला पाठबळ दिल्याने आता तो चार चाकी झाला आहे. यामुळे निवडणुकीत ताकद आणखीन वाढली आहे. मनसे सोबत आल्याने त्यांचे स्वागत आहे. तसेच लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात वातावरणातील धुरळा खाली बसून चित्र स्पष्ट होत आहे. लोकांचा उत्साह वाढत असून ही निवडणूक विकास विरुद्ध विद्वेषाचं राजकारण अशी आहे. शिवसेनेने सर्वसमावेशक भूमिका घेतली असून नागरिकांचा पाठिंबा मिळत आहे. सबका साथ सबका विश्वास हे धोरण आमचे असून जाहीरनाम्यात त्याचा प्रत्यय दिसून येईल असे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

उद्या दि. ११ एप्रिल रोजी महायुतीचा पुण्यातील पहिला मेळावा बालगंधर्व रंगमंदिर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित होणार आहे. त्यानंतर सासवड येथे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सभा घेणार आहेत अशी माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली.

नाना पटोले यांच्या गाडीवरील हल्ल्याची सखोल चौकशी करा: अतुल लोंढे

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काँग्रेस नेत्यांची सुरक्षा वाढवा.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला व निवडणुक आयोगाला पत्र.

मुंबई, दि. १० एप्रिल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौ-यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका असून या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसेच निवडणुक आयोगाला पाठवलेल्या पत्रात अतुल लोंढे म्हणतात की, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे 9 एप्रिल रोजी लोकसभा निवडणूकीचा भंडारा जिल्ह्यातील प्रचार संपवून साकोली गावाकडे गाडीने जात असताना त्यांच्या गाडीला ट्रकने चिरडण्याचा प्रयत्न केला. नाना पटोले हे काँग्रेस पक्षाचे महत्वाचे नेते आहेत त्यामुळे या प्रकरणाकडे त्वरित लक्ष देऊन सदर घटनेची सर्वंकष चौकशी करावी. लोकसभेच्या निवडणूक प्रचारासाठी नाना पटोले यांना राज्यभर दौरे करावे लागणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील घटना पाहता भविष्यात पुन्हा असा प्रकार घडू नये याची खबरदारी घेत नाना पटोले यांच्यासह काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, असे अतुल लोंढे यांनी म्हटले आहे.

पीएनबी हाउसिंग फायनान्सिंगतर्फे लक्षणीय टप्पा पार-भारतातील वितरण शाखांची संख्या ३०० वर

ग्राहकांच्या वैविध्यपूर्ण गरजा पूर्ण करण्यासाठी १५० पेक्षा जास्त शहरांत विस्तार

 पुणे10 एप्रिल 2024 – पीएनबी हाउसिंग फायनान्स या भारतातील आघाडीच्या गृह कर्ज कंपनीने आज त्यांचे वितरण नेटवर्क भारतात ३०० शाखांपर्यंत विस्तारल्याची घोषणा केली. हा धोरणात्मक विकास ग्राहकांना गृह कर्जाचे विविध पर्याय सहजपणे उपलब्ध करून देण्याच्या कंपनीच्या प्रवासातील लक्षणीय टप्पा आहे. देशभरातील १५० पेक्षा जास्त शहरांमध्ये पसरलेल्या शाखांसह पीएनबी हाउसिंग फायनान्सला आता लाखो लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करणे तसेच राष्ट्र उभारणीसाठी मोलाचे योगदान देणे शक्य होईल.

पीएनबी हाउसिंग फायनान्स आर्थिक वर्ष २४ च्या केवळ चार महिन्यांत १०० शाखा समाविष्ट करत शाखांची एकूण संख्या ३०० वर नेली. कंपनीतर्फे गृह कर्ज पुरवणाऱ्या ९० शाखांच्या माध्यमातून खास तयार केलेल्या वित्त सुविधा पुरवल्या जातात. त्याचप्रमाणे १६० शाखांचे दमदार नेटवर्क वाजवी घरांचा रोशनी हा विभाग हाताळण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने इमर्जिंग मार्केट्स या नव्या विभागातही प्रवेश केला असून त्याद्वारे निवडक ठिकाणच्या १५० शाखांच्या माध्यमातून उच्च उत्पन्नधारक ग्राहकांना सेवा दिली जाणार आहे.

पीएनबी हाउसिंग फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गिरीश कौसगी म्हणाले, ग्राहकांची घर खरेदी करण्याची महत्त्वाकांक्षा समजून घेणारी कंपनी या नात्याने आम्ही आमचे बहुआयामी अस्तित्व मजबूत करण्याचे आणि ग्राहकांना गृह वित्त सुविधा पुरवण्यासाठी वितरण नेटवर्क वाढवण्याचे धोरणात्मक पाऊल उचलले. ३०० शाखांच्या विस्तृत नेटवर्कमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांना सेवा देणे व कंपनीचा नफा वाढवणे आम्हाला शक्य होणार आहे. या प्रवासात पुढे जाण्यासाठी आणि विकासाचा पुढचा टप्पा गाठण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

पीएनबी हाउसिंग फायनान्सतर्फे विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध करून दिली जातात. त्यामध्ये वैयक्तिक गृह कर्ज, मालमत्तेवर रिटेल कर्ज, रिटेल नॉन- रेसिडेन्शियल प्रीमायसेस कर्ज आणि पगारदार तसेच स्वयंरोजगार मिळवणाऱ्या व्यक्तींना निश्चित ठेव सुविधा पुरवणे यांचा समावेश आहे. कंपनीच्या शाखांमध्ये दमदार तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा बसवण्यात आल्या असून त्याला कार्यक्षम कामकाज आणि दमदार प्रशासकीय फ्रेमवर्कची जोड देऊन ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळेल याची काळजी घेण्यात आली आहे.

भाजपने किरण खेर यांचे तिकीट कापले

भाजपकडून आतापर्यंत 425 हून अधिक उमेदवारांची घोषणा

चंदीगडमधून किरण खेर यांचे तिकीट कापून संजय टंडन यांना उमेदवारी दिली आहे.याशिवाय रिटा बहुगुणा जोशी यांचे तिकीट रद्द करून अलाहाबाद मतदारसंघातून नीरज त्रिपाठी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भाजपने लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी जाहीर केली. या यादीत 9 नावांचा समावेश आहे. भाजपच्या यादीत यूपीतील 7 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.

चंदीगडमधून दोन वेळा खासदार राहिलेल्या किरण खेर यांचे तिकीट रद्द करण्यात आले आहे. किरण खेर यांनी 2014 आणि 2019 मध्ये दोनदा लोकसभा निवडणूक जिंकली होती.

भाजपच्या या यादीत ज्या 9 जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत त्यापैकी 2019 मध्ये भाजपने 7 जागा जिंकल्या होत्या. मात्र यापैकी मछलीनगर आणि कौशांबी या दोनच जागांवर विद्यमान खासदारांना तिकीट देण्यात आले आहे, तर 4 जागांवर खासदारांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत. 2019 मध्ये भाजपच्या तिकिटावर आसनसोलमधून निवडणूक जिंकलेले बाबुल सुप्रियो यांनी आधीच राजीनामा देऊन टीएमसीमध्ये प्रवेश केला होता.

यूपीच्या मैनपुरी मतदारसंघातून जयवीर सिंह ठाकूर, कौशांबीमधून विनोद सोनकर, फुलपूरमधून प्रवीण पटेल, अलाहाबादमधून नीरज त्रिपाठी, बलियामधून नीरज शेखर, मछलीनगरमधून बीपी सरोज आणि गाझीपूरमधून पारस नाथ राय यांना तिकीट देण्यात आले आहे. रिटा बहुगुणा जोशी या अलाहाबादच्या खासदार होत्या. अलाहाबादचे उमेदवार नीरज त्रिपाठी हे माजी राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांचे पुत्र आहेत.

याशिवाय पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघातून एसएस अहलुवालिया यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपने याआधी भोजपुरी स्टार पवन सिंह यांना या जागेवरून उमेदवारी दिली होती. मात्र नंतर त्यांनी तिकीट परत केले. या जागेवरून टीएमसीने अभिनेत्री शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आतापर्यंत 425 हून अधिक उमेदवारांची घोषणा केली आहे. 80 जागा असलेल्या यूपीमध्ये भाजप 74 जागांवर निवडणूक लढवत आहे. 6 जागांपैकी मित्रपक्ष आरएलडी 2 जागांवर, अनुप्रिया पटेल यांचा स्वपक्ष 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर निषाद पक्ष आणि राजभर यांच्या पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली आहे. भाजपने आतापर्यंत 74 पैकी 69 जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने सर्वप्रथम 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती.

चंडीगढ़

1- संजय टंडन- चंडीगढ़

उत्तर प्रदेश

1- जयवीर सिंह ठाकुर- मैनपुरी

2- विनोद सोनकर- कौशाम्बी

3- प्रवीण पटेल- फूलपुर

4- नीरज त्रिपाठी- इलाहाबाद

5- नीरज शेखर- बलिया

6- बी.पी. सरोज- मछलीशहर

7- पारस नाथ राय- गाजीपुर

पश्चिम बंगाल

1- एस.एस. अहलुवालिया- आसनसोल

 प्रेरणा अरोरा यांनी क्रूच्या यशाबद्दल तिची ‘रोल मॉडेल’ एकता कपूरच केलं अभिनंदन 

 प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या प्रेरणा अरोरा यांनी सहकारी निर्मात्या एकता कपूरचे कौतुक केलं आहे. करीना कपूर, क्रिती सॅनन आणि तब्बू स्टारर क्रू सोबत आणखी एक ब्लॉकबस्टर यशाबद्दल तिचे अभिनंदन केले. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा आकडा ओलांडला असताना, अरोरा यांनी तिच्या कामगिरीबद्दल तिच्या “रोल मॉडेल” कपूरचे कौतुक केले आणि मोठ्या चित्रपटाच्या यशामागे महिला निर्मात्याचे महत्त्व अधोरेखित केले. 
 महिला निर्मात्यांना बॉलिवूडमध्ये भरभराट होण्यासाठी आवश्यक लवचिकता आणि दृढनिश्चय अधोरेखित केला. तिने “पॅडमॅन,” “टॉयलेट,” आणि “रुस्तम” सारख्या चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशाचा दाखला म्हणून महिला निर्मात्यांची बॉक्स ऑफिसवर हिट देण्याची आणि इंडस्ट्रीची ओळख मिळवून देण्याची क्षमता आहे.  एकता कपूरचा आनंद साजरा करताना प्रेरणा म्हणाली, “महिला आर्थिक बाबतीत मागे असू शकतात आणि अभिनय आणि दिग्दर्शनाव्यतिरिक्त उत्तम निर्मात्या बनू शकतात. स्त्रिया घालू शकतील अशा अनेक टोप्या! आणखी एक विजय आणि 100 कोटींचा पराक्रम पार केल्याबद्दल EKTA चे अभिनंदन. हा खूप मोठा विजय आहे कारण निर्मात्याच्या मागे एक महिला आहे, भुवया न उंचावता 100 कोटी चित्रपटांसह पुरुष निर्मात्यांना चित्रित करणे सोपे आहे. तिच्या वैयक्तिक अनुभवातून शिकून, अरोरा पुढे म्हणाली, “जेव्हा मी महत्त्वाच्या विषयांवर चित्रपटांना पाठिंबा देण्यास सुरुवात केली, तेव्हा इंडस्ट्रीला महिला निर्मात्यांबद्दल शंका होत्या आणि त्याचा आकड्यांवर कसा परिणाम होऊ शकतो, पण मी कथेवर विश्वास ठेवला आणि तरीही पुढे गेलो. जेव्हा माझे पॅडमॅन, टॉयलेट, रुस्तम या चित्रपटांनी बीओवर चांगली कामगिरी केली, तेव्हा लोकांचा माझ्यावर विश्वास बसू लागला.” अरोराची विस्तृत फिल्मोग्राफी सामाजिकरित्या प्रशंसनीय तसेच व्यावसायिक बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाली आहे. “महिलांना बसण्यासाठी खुर्ची निवडावी लागत नाही, परंतु स्वतःची खुर्ची मिळवा आणि जागा तयार करा! अशा आणखी महिला चित्रपट निर्माते/निर्माते/सिनेमॅटोग्राफीसाठी शुभेच्छा. त्यामुळे पुढे जा! हे पाऊल उचला,” प्रेरणाने संकेत दिले. खुल्या पत्रात आहे. सोशल मीडियावर फेऱ्या मारत आहेत आणि एकतालाही पोहोचले ज्याने प्रेरणाला गोड आणि उत्साहवर्धक हावभावाबद्दल धन्यवाद देण्यासाठी तिची कथा सांगितली. कामाच्या आघाडीवर, एकता कपूर सध्या क्रूच्या यशावर स्वार आहे कारण ती बॉक्स ऑफिसवर सतत कमाई करत आहे तर प्रेरणा अरोरा ‘हीरो हिरोईन’ या तेलगू चित्रपटासाठी तयारी करत आहे, ज्यामध्ये दिव्या खोसला आणि एक रोमांचक कलाकार कलाकार आहेत. निधि अग्रवाल, अरबाज खान, शिविन नारंग, तुषार कपूर, विनय पाठक आणि सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘डंक: वन्स बिटन ट्वीस शाई’ हा हिंदी चित्रपट आहे. विशेष म्हणजे, हे निधी अग्रवाल आणि तुषार कपूर यांच्या ओटीटी पदार्पणाला देखील चिन्हांकित करते.