पुणे- कॉंग्रेसचे अनुभवी , अभ्यासू आणि आक्रमक नगरसेवक अशी ख्याती असलेले बहुजन समाजातील नेते अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे . त्यामुळे बागवे यांचे नगरसेवक पद उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत अबाधित राहणार आहे.
लघुवाद न्याय दंडाधिकारी, पुणे यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश दि. २९ जून २०२१ रोजी दिला होता. या आदेशाच्या विरोधात नगरसेवक अविनाश बागवे यांनी मुंबई उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केले होते. मुंबई उच्च न्यायालयाचे विधीतज्ञ ॲड. गिरीश गोडबोले यांनी नगरसेवक अविनाश बागवे यांच्यातर्फे युक्तिवाद केला. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांनी दि. १४ जुलै २०२१ रोजी लघुवाद न्याय दंडाधिकाऱी, पुणे यांनी दिलेल्या आदेशाला दि. २३ ऑगस्ट २०२१ पर्यंत स्थगिती दिली आहे.