Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

महिलांमधील कर्व्हीकल कॅन्सर जनजागृतीसाठी उपक्रम

Date:

पुणे: फेडरेशन ऑफ ओब्सेट्रिक्स अँड गायनाकलॉजिस्ट सोसायटी ऑफ इंडिया(फॉगसी सीएनएन) आणि पुणे ओबीजीवायएन सोसायटी यांच्या वतीने येत्या १८ जून रोजी तीन टिक्के जिंदगी के या वैशिष्ठयपूर्ण  वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. डेक्कन जिमखाना येथील कॅफे गुडलक चौक ते बालगंधर्व चौकापर्यंत पार पडणाऱ्या या वॉकेथॉनचा शेवट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्यापाशी होणार आहे. 
 
तीन टिक्के जिंदगी के  वॉकेथॉन या उपक्रमामागची संकल्पना म्हणजे महिलांमध्ये आणि विशेषतः तरुण मुलींमध्ये वाढणारा गर्भशयाचा कर्करोगाबाबत जागृती निर्माण करणे हा आहे.  कर्व्हीकल कॅन्सर हा महिलांना त्रस्त करण्याऱ्या प्रमुख तीन कर्करोगांपैकी एक असून त्याबाबतीत समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधक औषधाच्या केवळ ३ डोसमध्ये हा कर्करोग होण्याची शक्यता लक्षणीयरित्या कमी करणे असे आमच्या समोरील लक्ष आहे, असे फॉगसीच्या उपाध्यक्ष डॉ सुनीता तांदुळवाडकर यांनी सांगितले. 
 
फॉगसी सीएनएन यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या गर्भधारणा आणि प्रसूती शास्त्र तज्ज्ञांच्या चर्चसत्रात कर्व्हीकल कॅन्सर व त्याचा प्रतिरोध हा विषय प्रामुख्याने चर्चिला गेला. या क्षेत्रातील हे सर्वोच्च दर्जाचे चर्चसत्र होते.  तीन टिक्के जिंदगी के  वॉकेथॉनच्या संयोजन समितीत डॉ. सुनीता तांदुळवाडकर, डॉ निशिकांत क्षोत्री(अध्यक्ष, पुणे ओबीजीवायएन सोसायटी), फॉगसी सीएनएनचे महासचिव  डॉ पराग बिनीवाले, आणि डॉ विना तोडकर यांचा समावेश आहे. सर्व वयोगटातील पुणेकर महिला व पुरुष, विशेषतः मुलींच्या पालकांनी या वॉकेथॉनमध्ये सहभाग घ्यावा आणि कर्व्हीकल कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी काय करता या संदेशाचा समाजात प्रसार करावा असे आवाहन त्यांनी केले आहे. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

योग सराव व योग प्रदर्शनीचे पुणे मेट्रोच्या स्थानकात आयोजन

पुणे, 21 जून 2025 अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय संचार...

सरकार आपला एकही शब्द फिरवणार नाही:शेतकऱ्यांना योग्यवेळी कर्जमाफी मिळेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आळंदीत कत्तलखाना होणार नाही पुणे:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा...

पंढरपूर वारी दरम्यान दोन्ही मार्गांवर केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देत करणार मार्गक्रमण

केंद्रीय संचार ब्युरोचे माहिती-चित्र रथ केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ...

एअर इंडिया: पीडित कुटुंबांना दीर्घकालीन साहाय्य पुरवण्यासाठी ‘एआय१७१ ट्रस्ट

विमान आणि पायलट दोन्ही उत्कृष्टच होते..आम्ही तपास अहवालाच्या प्रतीक्षेत...