Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पूर्वी कर्जमाफीचा फायदा घेवून धनाढ्यांनी तिजोऱ्या भरल्यात .. देवेंद्र फडणवीस

Date:

पुणे- राज्य सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही पुर्णता वेगळी असून यातून एकही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही, मात्र पूर्वी  कर्जमाफीचा फायदा घेवून धनाढ्यांनी तिजोऱ्या भरल्यात याबाबत दक्षता घेवूनच याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांची राज्यस्तरीय महसूल परिषद मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात यशदा येथे पार पडली. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि राज्यातील सर्व जिल्हाधिकारी उपस्थित होते.

यावेळी  ते बोलत होते. यावेळी त्यांनी आघाडी सरकारच्या कर्जमाफीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप देखील केला. शेतकरी संपानंतर राज्य सरकारच्यावतीने कर्जमाफीचा निर्णय घेतला. याविषयी मुख्यमंत्री म्हणाले की, सराकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला कर्जमाफीचा निर्णय हा पूर्णता वेगळा आहे. या कर्जमाफीतून धनाढ्य लोकांना वगळले जाणार आहे. याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे केली जाणार असून एकही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेतली जाईल.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकार शेतकऱ्यांना पुढील पिकासाठी १० हजार रुपयांची तातडीची मदत देणार आहे. या मदतीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अटी आणि शर्तीचे पालन करणे आवश्यक आहे. ही मदत देत असताना राजकीय नेते, अधिकारी आणि श्रीमंत शेतकऱ्यांना वगळले जाणार आहे. यावेळी त्यांनी विरोधी पक्षावरही निशाणा साधला. आघाडी सरकारच्या काळात कर्जमाफीमध्ये मोठे घोटाळे झाला असून आघाडी सरकारच्या कर्जमाफीवेळी अनेक धनाढ्यांनी फक्त आपली घरे भरण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी केला. या सर्वबाबी लक्षात घेता कर्जमाफी फक्त गरजू शेतकऱ्यांसाठी असेल आणि निकषांचे पालन करूनच देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....