क्रिकेट चाहत्यांच्या अति उत्साहाने लागली आग

Date:

पुणे-चिंचवड येथील विजयनगर झोपडपट्टी येथील लग्न मंडपाच्या समानाला काल (रविवारी) रात्री साडे अकराच्या सुमारास आग लागली. ही आग विझवण्यासाठी 7 तास लागले. 

 याबाबत अधिक माहिती अशी की, सुरेश रमणलाल चोरडिया यांचे चिंचवड येथील विजयनगर येथे लग्न मंडापाच्या सामानाचे गोडावून आहे. रविवारी रात्री साडे अकराच्या सुमारास या सामानाला अचनक आग लागली. यामध्ये गोडावून मधील सामान जळून खाक झाले. दरम्यान, आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशामक दलाच्या  एकूण 6 गाड्या तर बजाज ची 1 तसेच टाटा मोटर्स ची 1 आशा एकूण 8 गाड्यांनी आग धाव घेते आगीवर नियंत्रण मिळविले. सध्या घटनास्थळी आग धुमसत असल्याने एक अग्निशामक दलाची गाडी असल्याचेही अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.टीम इंडियाने रविवारी दक्षिण आफ्रिकेच्या संघावर मात करत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्यानंतर साहजिकच देशभरात भारतीय संघाच्या या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.भारतीय संघाच्या विजयानंतर शहरात फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. येथील अहिंसा चौकातही क्रिकेट चाहत्यांकडून भारताच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरू होते. मात्र, या उत्साहाला या दुर्घटनेमुळे गालबोट लागले. अहिंसा चौकाच्या परिसरात मंडपाच्या साहित्याचे गोदाम आहे. फटाके वाजवत असताना एका फटाक्याची ठिणगी या गोदामातील साहित्यावर पडली. या ठिकाणी मोठ्याप्रमाणावर लाकडाचे साहित्य असल्याने आगीने लगेच पेट घेतला. थोड्याचवेळात आगीने भीषण स्वरूप धारण केले. यामध्ये गोदामातील मंडपाचे सर्व साहित्य जळून खाक झाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...