पुणे- आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या पंचवार्षिक सत्रातील अखेरच्या स्थायी समिति च्या निवडणुकीत भाजपाने माजी खासदार संजय काकडे यांचा आधार घेण्याचे धोरण अंगिकारले असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थायी समिति च्या रिक्त झालेल्या जागांवर भाजपने स्थायी समिती सदस्य म्हणून हेमंत रासने, राहुल भंडारे, मनीषा कदम, महेश वाबळे, राजाभाऊ लायगुडे आणि अर्चना पाटील यांची नियुक्ती केली आहे.स्थायी समितीचेविद्यमान अध्यक्ष हेमंत रासने यांना पूर्ण स्थायी समितीवर संधी मिळाली आहे. महेश वाबळे काँग्रेस मधुन गेल्या निवडणुकीत भाजपा मध्ये आलेले आहेत,त्यांना पक्षाने अखेरीस संधी दिली आहे.तर भंडारे,लायगुडे, अर्चना पाटील हे काकडे यांचे कट्टर समर्थक मानले जातात. राष्ट्रवादी च्या वतीने सुनील गायकवाड़ आणि प्रदीप गायकवाड़ यांना संधी देण्यात आली आहे.याशिवाय शिक्षण समिति वर देखील आज सदस्यांची निवड करण्यात आली. महापालििकेच्या ऑन लाईन मुख्यसभेेेत या निवडी घोषित करून सभा तहकूब करण्यात आली.
शिक्षण समितिवर मंजुश्री संदीप खर्डेकर
शिक्षण समिती- मंजुश्री खर्डेकर, अल्पना वरपे, सुभाष जगताप, बाबुराव चांदेरे, अविनाश बागवे, प्राची आल्हाट,लता धायरकर, राजश्री काळे,सुमन पठारे,मारुती तुपे, वर्षा साठे,कलिंदा पुंडे, मुक्ता जगताप