बिग टॉकिजची पहिलीच निर्मिती असलेला एक कुतुब तीन मिनार हा मराठी
चित्रपट येत्या १५ एप्रिल 2016 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. एक
कुतुब तीन मिनार ची निर्मिती मनोज यादव आणि अनिल सिंग यांनी बिग
टॉकिजच्या बॅनरखाली केली असून दिग्दर्शनाची जबाबदारी सुनिल रामचंद्र कांबळे
यांनी सांभाळली आहे.
एक कुतुब तीन मिनार च्या निमित्ताने प्रथमच मराठी सिनेमाची निर्मिती
करताना मराठी रसिकजनांचे पूर्णत: मनोरंजन होईल या अथार्ने दर्जेदार
निर्मितीमूल्ये असलेला सिनेमा देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे मत निर्माते
मनोज यादव यांनी व्यक्त केले. हा सिनेमा जरी मसालापट असला तरी यातून एक
अंडरकरंट मॅसेज आहे. रत्नागिरीसारख्या निसर्गरम्य ठिकाणावरील वेगवेगळ्या
लोकेशन्सकर चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले आहे. सर्वच कलाकारांनी उत्तम
काम केले असून प्रेक्षकांचे खºया अर्थाने मनोरंजन होईल अशी खात्री यावेळी
निर्माते मनोज यादव यांनी व्यक्त केली.
एक कुतुब तीन मिनार या सिनेमात भरत जाधव प्रमुख भूमिकेत
दिसणारअसून विजय चव्हाण, संचित यादव, श्याम ठोंबरे, पूर्णिमा काव्हळ, अमृता
देशमुख, पूजा कदम, अशोक सकने, नितीन पारेगावकर, सुरेश ढगे, प्रियांका
मुणगेकर, विजय कदम, रसिका धामणकर, चंदू कांबळे, अतुल मचंर्डे, अमित शिंदे
आणि गौरी केंद्रे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. चित्रपटाची कथापटकथासंवाद
अशोक कांबळी यांनी लिहिले असून गीतरचना बिपिन धायगुडे आणि किनय
येरापल्ले यांनी केली आहे. एक कुतुब तीन मिनार या शीर्षकाला आणि कथानकाला
अनुसरून केलेल्या अर्थपूर्ण गीतरचनांना स्वरसाज चढवताना संगीतकार विलास
गुरक यांनी कुलदीप मालुसरे, श्रीला तांबे, निलादरी देबनाद, स्वरूप भालकणकर
तसेच अनुराग सारख्या नकगायकांना पार्श्वगायनाची संधी दिली आहे. या सिनेमाचे
छायांकन करण्याची जबाबदारी कॅमेरामन राजा फडतरे यांनी सांभाळली आहे.
नृत्यदिग्दर्शन अनिल सुतार यांचे असून कलादिग्दर्शक आहेत देवेंद्र तावडे. रंजन
प्रधान, अक्षय जाधव यांनी प्रॉडक्शनची बाजू सांभाळली आहे.