अंध विद्यार्थिनींसाठी राज्यातील पहिल्या अत्याधुनिक प्रशालेच्या नूतन वास्तुचे समाज कल्याण मंत्री दिलीप कांबळे, खा.अनु आगा, मेहेर पद्मजी यांच्या हस्ते उद्घाटन

Date:

आळंदी:
‘दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांच्या पाठीशी शासन खंबीर उभे राहील’, अशी ग्वाही आज सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली. अंध मुलींच्या शिक्षणासाठी ‘नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड महाराष्ट्र’ या संस्थेच्या वतीने आळंदी येथे उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या अत्याधुनिक प्रशालेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.हा कार्यक्रम 10 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजता चर्‍होली खुर्द, आळंदी- मरकळ रस्ता, आळंदी येथे झाला.
खासदार अनु आगा,  मेहेर पदम्जी (थरमॅक्स कंपनीच्या अध्यक्ष), डॉ. ऍन्ड्रीस लॉरमन  (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्होक्सवॅगन इंडिया प्रा. लि.)प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतेे.
कांबळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये काही कमतरता आहे असे वाटू न देता मेहनत घ्यावी, मेहनतीतून मिळालेले फळ गोड असते. शासनाला या शाळांच्या अडचणीची कल्पना आहे, म्हणून आम्ही या शाळांच्या पाठीशी  खंबीर उभे राहू’.
जागृती शाळेला एकूण 200 विद्यार्थ्यासाठी अनुदानित तुकड्यांची परवानगी विशेष बाब म्हणून महिनाभरात मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
दिलीप कांबळे यांनी शाळेच्या ‘स्कील डेव्हलपमेंट सेंटर’चे उद्घाटन केले, तर अनु आगा,  मेहेर पदम्जी यांनी शाळेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केले.
 मेहेर पदम्जी म्हणाल्या,‘दृष्टीहीन विद्यार्थिनिंची जिद्द पाहता त्यांच्यातूनही यशस्वी उद्योजक तयार होतील.
अनु आगा म्हणाल्या,‘देशात मुलींच्या बाबतीत भेदभाव होतो, हीचांगली बाब नाही.शिक्षणाने भेदभाव, इतर वाईट गोष्टी दूर होतील. समाजाने दृष्टीहीन व्यक्तींच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदान करण्याबाबत जागृती केली पाहिजे.समाजाच्या या घटकांकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील बदलला पाहिजे’.
 संस्थेचे अध्यक्ष एम. वाय. गुरव यांनी अध्यक्षीय भाषण केले. सरचिटणीस वसंत हेगडे, रघुनाथ बरड, आमदार मोहन जोशी, संस्थेचे सल्लागार विजय मेहता यांनी मनोगते व्यक्त केली. संस्थेच्या प्रवक्तया सकीना बेदी,  टेक महिंद्रा फाऊंडेशनचे विजय वावरे, प्रचार्य मंगला वानखेडे, सरपंच सचिन घोलप, जी.एम. मगर उपस्थित होते. किशोर गोहिल यांनी सूत्रसंचालन केले.

या प्रशालेत महाराष्ट्र ,कर्नाटक आणि शेजारील राज्यातील 110 दृष्टिहीन विद्यार्थीनी शिकतात.
पहिली ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम संगणक प्रशिक्षणासह येथे शिकविण्यात येणार आहे. स्पीच रेकग्नायझेशन सॉफ्टवेअर असलेली एकमेव कॉम्प्युटर लॅब येथे उभारण्यात आली आहे. दृष्टिहीन विद्यार्थींनींना संगणक साक्षर करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. रोजगार प्रशिक्षणासाठी आणि कौशल्य विकसनासाठी अत्याधुनिक केंद्र उभारण्यात आले आहे. राज्यातील हा पथदर्शी प्रकल्प ठरणार आहे.
1989 पासून ‘जागृती अंध मुलींच्या’ शाळेचे कामकाज सुरू असून, येथे ब्रेल प्रेस पासून सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा शाळेने कायम ठेवली आहे. शाळेच्या माजी विद्यार्थिनी सॉफ्टवेअर इंडस्ट्रि, बँका, इन्शुरन्स कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत.
फिजोथेरपी प्रशिक्षण, परकीय भाषा प्रशिक्षण, ऑडिओ रेकॉर्डिंग प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण अशी उद्दिष्ट्ये शाळेने डोळ्यांसमोर ठेवली आहेत, त्यासाठी उद्योग आणि इतर क्षेत्रातून संस्थेला मदत मिळाली आहे.  थरमॅक्स सोशल इनिशिएटिव्ह फाऊंडेशन, आरती इंडस्ट्रीज लि.मुंबई, बी.एम. सी. सॉफ्टवेअर इंडिया प्रा. लि., डॉ. श्रीधर शुक्ला फाऊंडर ग्रेट सॉफ्टवेअर लॅब्स् पुणे, निविधा ग्राफिक्स पुणे, डी.एस.एम. इंडिया प्रा. लि., इन्फोबिन प्रा. लि., टेक महिंद्रा फाऊंडेशन आदी कंपन्यांचे  या प्रकल्पाला सहकार्य लाभले आहे. अशी माहिती ‘नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाईंड महाराष्ट्र’ या संस्थेच्या प्रवक्ता सकीना बेदी यांनी दिली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत सादर

सीडीएसएल आयपीएफकडून महिलांना त्यांचा गुंतवणुकीचा प्रवास सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्याकरता सई गोडबोले यांच्या आवाजात  मुंबई, 23 जून 2026: सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल) इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड (आयपीएफ) ने आपल्या सुरू असलेल्या ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) उपक्रमांतर्गत लोकप्रिय गायिका, अभिनेत्री आणि कंटेंट क्रिएटर सई गोडबोले यांच्या आवाजातील ‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे नवीन गुंतवणूकदार जनजागृती गीत सादर केले आहे. हे गीत महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये सहभागी होण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास आणि आत्मविश्वासपूर्ण, माहितीपूर्ण तसेच स्वावलंबी, आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्यास प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आले आहे. हे गीत एका आकर्षक दृकश्राव्य चित्रफितीद्वारे साकारण्यात आले असून, त्यामध्ये एका महिलेच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे उलगडण्यात आले आहेत. पहिली नोकरी सुरू करण्यापासून नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यापर्यंत आणि स्वतःची स्वप्ने पूर्ण करण्याच्या प्रवासापर्यंतचा हा प्रवास दाखवताना प्रत्येक महत्त्वपूर्ण यशाची सुरुवात संकोचावर मात करून पहिले पाऊल उचलण्यापासूनच होते हा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. गुंतवणुकीच्या प्रवासाशी समांतर चालत ही चित्रफीत महिलांना संशोधन, नियोजन आणि माहितीपूर्ण निर्णयांच्या आधारावर त्याच आत्मविश्वासाने गुंतवणुकीकडे पाहण्यास प्रोत्साहित करते. संपत्ती निर्माण करणारी, भविष्य घडवणारी आणि ध्येय गाठण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारी व्यक्ती बनण्याचा संदेश देत हे गीत महिलांना त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी स्वीकारण्यास आणि आत्मनिर्भर गुंतवणूकदार बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू करण्यासाठी प्रेरित करते. आज भारतातील जवळपास प्रत्येक चार गुंतवणूकदारांपैकी एक महिला आहे. देशातील गुंतवणूक क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग यातून दिसून येतो. कार्यक्षेत्रातील महिलांचा वाढता सहभाग आणि समाजातील त्यांची विकसित होत असलेली भूमिका लक्षात घेता अधिकाधिक महिला त्यांच्या आर्थिक निर्णयांवर स्वतःचे नियंत्रण प्रस्थापित करत आहेत. यामुळे भारतातील गुंतवणूकदारांच्या लोकसंख्याशास्त्रीय स्वरूपातही लक्षणीय बदल घडून येत आहे. सई गोडबोले यांचा वैशिष्ट्यपूर्ण आवाज आणि सहज आपलेसे वाटणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या माध्यमातून हे गीत विविध वयोगटांतील महिलांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना आत्मविश्वास, जागरूकता तसेच माहितीपूर्ण निर्णयक्षमतेसह गुंतवणुकीकडे वळण्यासाठी प्रेरित करते. अलीकडील वर्षांमध्ये गुंतवणुकीमधील महिलांचा सहभाग सातत्याने वाढला असला तरी या सहभागाला आणखी चालना देण्याची मोठी संधी अद्याप उपलब्ध आहे. जागरूकता, आत्मविश्वास, गुंतवणूक उत्पादनांविषयीची समज आणि विश्वासार्ह माहितीची उपलब्धता हे घटक सिक्युरिटीज मार्केटमधील माहितीपूर्ण सहभागासाठी आजही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. या उपक्रमाविषयी बोलताना सीडीएसएल आयपीएफ सचिवालय प्रमुख श्री. सुधीश पिल्लई म्हणाले, “‘बनो मिस आत्मनिर्भर इन्व्हेस्टर’ हे गीत एका साध्या पण प्रभावी संदेशावर आधारित आहे. प्रत्येक अर्थपूर्ण प्रवासाची सुरुवात पहिलं पाऊल उचलण्यापासून होते. या उपक्रमाद्वारे आम्हाला अधिकाधिक महिलांना गुंतवणुकीच्या दिशेने ते पहिले पाऊल उचलण्यासाठी प्रोत्साहित करायचे आहे, ज्ञानाच्या माध्यमातून त्यांचा आत्मविश्वास वाढवायचा आहे आणि त्यांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यास सक्षम करायचे आहे. महिला त्यांच्या आर्थिक भवितव्याची जबाबदारी अधिकाधिक प्रमाणात स्वीकारत असताना, त्या केवळ स्वतःच्या दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेलाच बळकटी देत नाहीत, तर अधिक सर्वसमावेशक आणि सक्षम गुंतवणूक परिसंस्था उभारण्यातही महत्त्वपूर्ण योगदान देतात.” सीडीएसएल आयपीएफ विविध समाज घटकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि गुंतवणूकदार जागरूकता वाढविण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे. ‘आत्मनिर्भर’ (AtmanirbHER) हा उपक्रम विविध पार्श्वभूमीतील महिलांना सिक्युरिटीज मार्केटमध्ये जबाबदारीने सहभागी होण्यासाठी आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता निर्माण करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत आहे. जाहिरात मोहिमेतील फिल्म पाहण्यासाठी लिंक: YouTube: https://www.youtube.com/watch?v=6hpots_dUR8 Instagram: https://www.instagram.com/reel/DZ1oTUkjX8e

पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम 37 (1) व (3) आदेश जारी

पुणे: पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शांतता व...

अन्न औषध प्रशासनाचे पुण्यात स्वतंत्र कार्यालय व्हावे

-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी पुणे : विविध सामाजिक संस्थांची...

खाजगी ट्रॅव्हल एजंन्सीच्या दलालांची शिवाजीनगर एसटी स्थानकात दहशत

आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचीकारवाईची मागणी पुणे : खाजगी ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या...