पुणे- साई मिडिया निर्मित ‘दिशा ‘ या लघु चित्रपटाचा मुहूर्त आज अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष , निर्माते , वितरक विजय कोंडके यांच्या हस्ते संपन्न झाला . यावेळी’ सलाम पुणे’ चे अध्यक्ष शरद लोणकर , ज्येष्ठ अभिनेते विजय कोटस्थाने ,लघु चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक गौरव देशपांडे , सहायक दिग्दर्शक नवनाथ पवार , कलाकार साहिल मरगजे, सुशीलकुमार भोसले ,आदी मान्यवर उपस्थित होते . या लघु चित्रपटाची संकल्पना पत्रकार पांडुरंग मरगजे यांची असून गरिबी ते उच्चपदस्थ अशा प्रवासाची दिशा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.