१८ ते ४४ वर्षासाठी नागरिकांसाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय निहाय स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू व्हावे- नगरसेवक महेश वाबळे

Date:

  • मुंबई महापालिकेच्या धर्तीवर मोठ्या सोसायटी मध्ये सुद्धा लसीकरणास परवानगी द्या

पुणे : १८ वर्षावरील प्रत्येकाला सरकारने लशीची परवानगी दिली आहे पण लस घेणार कोठून असा यक्ष प्रश्न नागरिकांना समोर निर्माण झाला आहे. कित्येक नागरिक लशीसाठी रोज उठल्या उठल्या रांगा लावत आहेत. मात्र तासनतास रांगेत तिष्ठत उभे राहिल्या नंतरही लस मिळेल याची शाश्वती नसते या पार्श्वभूमीवर धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत पद्मावती येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी नगरसेवक महेश वाबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल नगरसेवक राजाभाऊ लायगूडे आदी उपस्थित होते.

शहरातील वाढती कोरोना संसर्गाची आकडेवारी लक्षात घेता व कोरोना संसर्गाची दुसरी लाट व संभाव्य येणाऱ्या तिसऱ्या कोरोना लाटेचा विचार करता शहरातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सद्यस्थितीत वय वर्ष ४५ ते ६० या वयोमानातील लसीकरण पूर्ण शहरातील केंद्रावर चालू आहे, पण केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे वय वर्ष १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण करून घेणे बाबत शहरासह उपनगरांमधील विविध भागात वेगवान पद्धतीने लसीकरण पूर्ण करून घेण्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १८ ते ४४ वयोगटासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र चालू करणे गरजेचे आहे. यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांची लसीकरण लवकरात लवकर स्थानिक पातळीवर पूर्ण करून घेण्यास मदत होईल व त्या लसीकरण केंद्रावरील आरोग्य सुविधांवरील ताण कमी होईल.

डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल येथे सद्यस्थितीत अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने ४५ ते ६० वयोमानातील वर्गासाठी कोरोना लसीकरण केंद्र सुरू असून त्याच ठिकाणी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी स्वतंत्र कोरोना लसीकरण केंद्र सुरू करावे, सर्व सोयी सुविधा युक्त या ठिकाणी अजून १८ ते ४४ वर्षे वर्गातील नागरिकांसाठी स्वतंत्र केंद्र सुरू केल्यास लसीकरणाचा मोठा टप्पा आपण लवकर पूर्णत्वास नेऊ शकतो. व यामुळे आरोग्य सुविधांवरील ताण ही कमी होण्यास मदत होईल, याबाबत आपण सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा नगरसेवक महेश वाबळे यांनी केली आहे. त्याचबरोबर मुंबई महापालिकेच्या धर्तीवर मोठ्या सोसायटी मध्ये सुद्धा लसीकरणास परवानगी मिळावी अशी मागणी नगरसेवक वाबळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नागरिकांना अखंड व सुरळीत वीजपुरवठा मिळावा-महापौरांनी ऊर्जामंत्र्यांना घातले साकडे

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका...

मोदी सरकारला पहिला धक्का! महिला आरक्षण विधेयक नामंजूर; लोकसभेत गदारोळ

महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक 54 मतांनी पडले:बाजूने 298, विरोधात...

”शी कॅन अँड शी विल” उपक्रमातून पुण्यातील महिला बॉक्सर्सना नवी झेप

पुणे, दि. १७ एप्रिल २०२६ :महिला सक्षमीकरण आणि क्रीडा...

होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली..

तेहरान: इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी सर्व प्रकारच्या जहाजांसाठी खुली करण्याची...