पुणे – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महात्मा फुले पेठ परिसरात श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट आणि नगरसेवक अजित दरेकर यांच्या वतीने औषध फवारणी आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन मीठगंज पोलिस चौकीचे पोलिस निरीक्षक श्री.खंडागळे यांच्या हस्ते करण्यात आले.
गंज पेठ, गुरुवार पेठ, माशे आळी, महात्मा फुले वाडा, शुक्रवार पेठ, बलवार आळी, घोरपडी पेठ, गौरी आळी परिसराबरोबर प्रत्येक घरात औषधाची फवारणी करून सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे नगरसेवक अजित दरेकर यांनी आवाहन केले आहे.या प्रसंगी माजी नगरसेवक दत्ता सागरे ,खलील मुजाहीद , आरोग्य निरीक्षक औटी ,सदाशिव चिल्लाळ,सईद सय्यद,राजू भोसले आणि सुफियान, व श्री अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर ट्रस्ट चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.