2 ते 18 वयोगटासाठी कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या/ तिसऱ्या टप्यातील मानवी चाचणीला भारतीय औषध महानियंत्रकांची मान्यता

Date:

  • मेसर्स भारत बायोटेक 525 निरोगी स्वयंसेवकांवर चाचण्या घेणार.

देशाचे राष्ट्रीय नियामक,भारतीय औषध महानियंत्रक (डीसीजीआय) यांनी  काळजीपूर्वक तपासणी केल्यानंतर , विषय तज्ञ समिती (एसईसी) ची शिफारस मान्य केली आहे आणि  12.05.2021 रोजी लस उत्पादक भारत बायोटेक लिमिटेडला 2 ते  18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन (कोविड प्रतिबंधक लस ) ची  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्यासाठी  परवानगी दिली.

मेसर्स भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड, हैदराबाद (बीबीआयएल) ने 2 ते 18 वर्षे वयोगटासाठी कोवॅक्सीन ची  दुसऱ्या/ तिसऱ्या  टप्यातील मानवी  चाचणी घेण्याचा प्रस्ताव दिला होता. 525 निरोगी स्वयंसेवकांवर ही चाचणी घेण्यात येईल.

या चाचणीत ,  0 दिवस  आणि  28 दिवस  दरम्यान अंतस्नायुमधून लसीच्या दोन मात्रा दिल्या जातील.

जलद नियामक प्रतिसाद म्हणून, हा प्रस्ताव विषय तज्ज्ञ समिती (एसईसी) (कोविड -19) कडून  11.05.2021. रोजी विचारात घेण्यात आला. समितीने तपशीलवार विचारविनिमयानंतर प्रस्तावित टप्पा दोन / तीन च्या मानवी चाचणीला सशर्त परवानगी देण्याची शिफारस केली

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा

जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी पुणे, दि. १६:...

लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील-मुख्यमंत्री देवेंद्र...

फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना...

ओव्हरहेड केबल,अनधिकृत होर्डींग्ज प्रकरणी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या बेफिकिरीचा झाला पर्दाफाश

ओव्हरहेड केबल भूमिगत करण्यासाठी नियमावली करण्यास प्रशासनाला १० दिवसांची...