राष्ट्रीय एकता दिनी ‘एकता दौड’ कार्यक्रमात सर्व विभागांनी सहभागी व्हावे -रमेश काळे

Date:

पुणे, दि. 27 :  सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिन राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून  या दिवशी म्हणजे दि. 31 ऑक्टोबर रोजी पुणे येथे एकता दौडसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये  शालेय शिक्षण व क्रीडा विभागाबरोबरच सर्व विभागांनी सहभागी व्हावे, असे निर्देश प्र. जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी दिले.

राष्ट्रीय एकता दिन आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे श्री. काळे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली, त्यावेळी  त्यांनी ही सूचना केली. बैठकीला संबंधीत विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आयोजित एकता दौड दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजता  पुण्यातील विधानभवन येथे सुरु होवून पुन्हा याच ठिकाणी संपेल. साधारणपणे दोन किलोमीटर अंतराची ही दौड असेल. यामध्ये  जिल्हा परिषद, महानगरपालिका व खाजगी शाळांचे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी  सहभागी होणार आहेत. या दौडमध्ये शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू, क्रीडा संघटना व क्रीडा मंडळांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. काळे यांनी केले आहे. या दिवशी विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जीवनावर आधारीत चित्रकला, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धा तसेच परेड आयोजित करावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले. या दिवशी सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये,  सार्वजनिक संस्थांमध्ये राष्ट्रीय एकता दिवस शपथ देण्यात यावी, अशा सूचना त्यांनी  उपस्थितांना दिल्या.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...