Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

राज्यातील पेट्रोल पंप उद्या सुरु राहणार; कारवाईच्या इशाऱ्यानंतर संप मागे

Date:

पुणे-कमिशनवाढ आणि सुट्टीच्या मागणीसाठी पेट्रोलपंपचालकांनी उद्या, रविवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. संप केल्यास ‘मेस्मां’तर्गत कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर पंपचालकांनी संप मागे घेतला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुण्यात दिली. वाहनधारकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, याची काळजी घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले.

 राज्य सरकारची भूमिका असोसिएशनच्या विरोधात नाही त्यामुळे राज्य शासनाच्या मदतीने पेट्रोलपंपचालकांच्या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल तसेच संप मागे घेतल्यामुळे, नागरिकांची गैरसोय होणार नाही असे सांगून पालकमंत्री गिरीश बापट यांनी असोसिएशनचे अभिनंदन केले.पेट्रोल व डिझेल विक्रीमध्ये अपूर्व चंद्रा कमिटीप्रमाणे सहा महिन्यांतून एकदा कमिशन वाढ व्हावी, यासाठी जिल्ह्यासह राज्यात पेट्रोलपंपचालक असोसिएशनने संप पुकारण्याची घोषणा केली होती. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पेट्रोलपंपचालकांच्या बैठकीत संप मागे घेण्याबाबतचा निर्णय आज झाला.

पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत पेट्रोलपंप चालकांनी संप मागे घेत असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांना दिली. या बैठकीस महाराष्ट्र पेट्रोलपंप असोसिएशनचे प्रवक्ते सागर रुकारी, जिल्हा प्रशासनाचे पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, अन्न धान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, जिल्ह्यातील पेट्रोलपंपचालक तसेच असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

अणुबॉम्बच्या धमक्यांना भारत भिक घालत नाही-PM नरेंद्र मोदी

पाकिस्तानसोबत ५१ तासांच्या युद्धबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -...

ट्रम्प म्हणाले- भारत-पाककडे खूप अण्वस्त्रे, आम्ही अण्वस्त्र युध्द थांबवले

इस्लामाबाद -अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, आम्ही दोन...

उद्या दहावी बोर्डाचा निकाल:अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी 1 वाजता पाहता येणार

यंदा परीक्षेला 16 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले ...पुणे-महाराष्ट्र राज्य...

“रेड 2 ने १०० कोटींचा टप्पा पार केला, याबद्दल मी मनापासून आभारी आहे!” – वाणी कपूर

ब्लॉकबस्टर ठरलेल्या ‘रेड’ चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित सिक्वेल ‘रेड 2’ ने...