पुणे, दि. 12 – पुणे जिल्हा प्रशासनातर्फे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आज जयंतीदिनी अभिवादन करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमात तहसीलदार मनिषा देशपांडे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.