पुणे :- सीमेवर तैनात असताना पाकिस्तानी लष्कराकडून झालेल्या गोळीबारात
सातारा जिल्ह्यातील जवान दीपक घाडगे यांना वीरमरण आले. तर अत्यंत प्रतिकूल वातावरणातही देशाप्रती आपले कर्तव्य बजावताना कोल्हापूरचे जवान महादेव तुपारे यांना परिस्थितीपुढे हार मानावी लागली. आज या दोन्ही जवानांचे पार्थिव लोहगाव येथील विमानतळावर आणण्यात आले होते. पालकमंत्री गिरीश बापट यांनी जवानांना श्रद्धांजली वाहिली.