पुणे-
सुप्रसिद्ध संगीतकार शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मूड मूड के ना देख मूड मूड के… ‘ पासून ते ‘तेरी प्यारी प्यारी सुरत को….’ पर्यंत आणि ” याद किया दिल ने कहा हो तुम….. ‘पासून ‘दिल तेरा दिवाना…’ पर्यंत सादर केलेल्या अनेक लोकप्रिय गाण्यांवर रसिक प्रेक्षक अक्षरशा: ‘दिवाने’ झाले आणि त्यांनी ठेका धरला. संगीतकार शंकर-जयकिशन जोडगोळीतील शंकर यांच्या ३१ व्या पुण्यस्मृतीनिमित्त शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांचा ‘ दिल तेरा दिवाना…’ हा विशेष कार्यक्रम नुकताच पार पडला. वारजे येथील ‘जय मल्हार ग्रुप’ तर्फे सादर केल्या गेलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती राजेंद्र ढोनसले व संकल्पना अर्चना सहस्रबुद्धे यांची होती. राजेंद्र ढोनसले आणि अर्चना सहस्रबुद्धे यांच्यासह सुचेता देशपांडे, अनुराधा करंबेळकर, विजय वाघमारे, अविनाश मनुरकर आदींनी सादर केलेल्या बहारदार गाण्यांना रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यांना सर्वश्री राजेश पाषाणकर, अतुल लोंढे, किरण एकबोटे, ऋतुराज कोरे, अमित कुंटे आदी वादकांची सुरेल साथसंगत लाभली. कार्यक्रमाचे निवेदन नरेंद्र फाटक यांनी केले.
दिल तेरा दिवाना…’ कार्यक्रमातील गाण्यांमुळे रसिक प्रेक्षक ‘दिवाने’
Date: