पुणे-राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात वाढ केल्याच्या निषेधार्थ पुणे शहर काँग्रेसच्या वतीने जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व नाट्यगृहासमोर सरकारविरोधात आंदोलन करण्यात आले.
शहर अध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत असंतोष व्यक्त केला.
रमेश बागवे म्हणाले की, सरकारने अचानक केलेली दरवाढ सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचा प्रकार आहे. हे सरकार सर्वसामान्यांना छळणारे सरकार आहे, शेतक-यांच्या, कामगारांच्या, व्यापारांच्या विरोधी सरकार आहे. आणि म्हणूनच या सरकारचा खरा चेहरा पुणेकरांसमोर आणण्यासाठी पुणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्य सरकारचा तीव्र निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.