आयुक्तांनी केली अतिरिक्त आयुक्तांना अरेरावी ?
पुणे- खुर्चीवर बसलेल्या अधिकाऱ्याला नगरसेविकेच्या पतीने लाथ घातली, नगरसेवकाने अतिरिक्त आयुक्तांना चप्पल फेकून मारली , नगरसेविकेच्या पतीच्या धमक्यांनी वैतागून कोणी आत्महत्या केली, महापालिकेच्या मुख्य भवनात सुमारे सव्वाशे बोगस कर्मचारी हाताळतात महापालिकेचा कारभार अशा प्रकारच्या काही खऱ्या काही अफवा वाटणाऱ्या बातम्या मुळे महापालिकेतील ‘गंगाजल’ समोर आलेले असताना आता सुमारे अशा प्रकारचेच ‘गंगाजल’ अधिकारी वर्गात हि सुरु आहे कि काय अशी शंका वाटावी दिवाळीच्या खाजगी पार्ट्या , खाजगी सहली करत आपले लॉबिंग कायम ठेवत काम करणाऱ्या महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप होऊ लागले आहेत . अर्थात खरे खोटे देव जाणो. म्हणूनच या सर्व प्रकारांची चौकशी होणे गरजेचे असून सत्य समोर येणे महत्वाचे झाले आहे. स्थायी समिती आणि मुख्य सभेचा कारभार देखील आयुक्तांनी प्रशासकीय काळात अत्यंत गोपनीय पद्धतीने केला . आता याच आयुक्तांवर त्यांनी एका अतिरिक्त आयुक्तांना अत्यंत खालच्या भाषेत बोलून अवमान केल्याचे वृत्त पसरले आहे आहे त्यामुळेच या अतिरिक्त आयुक्तांनी आपली पुणे महापालिकेतून बदली करावी अशी मागणी केलल्याचे सांगितले जाते . सूत्रांकडून हि बातमी मिळाली असली तरी याबाबत महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर यांनी ट्वीट केल्यावर आम्ही हि बातमी प्रसिद्ध केली आहे.