वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी सकारात्मक – वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची माहिती

Date:

मुंबई, दि. १५ : वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध मागण्यांचा आढावा घेऊन या मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्यशासन सकारात्मक असून यासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येणार असल्याचे वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.

सह्याद्री अतिथीगृहात वस्त्रोद्योग, यंत्रमाग व हातमागधारकांच्या विविध संघटनांनी श्री. शेख यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या मांडल्या. त्यावेळी श्री. शेख बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार रईस शेख, विभागाचे सचिव पराग जैन आदी उपस्थित होते.

बैठकीत सहकारी संस्थांना बिनव्याजी कर्ज देणे, प्रकल्प अहवालास मान्यता देणे, कर्जाची परतफेड करण्यासाठी मुदतवाढ, सूतगिरण्यांना कापूस गाठीसाठी 10 टक्के अनुदान देणे, सहकारी सूतगिरण्यांना वीजदरातील सूट तसेच वीज बिलात सवलत, अतिरिक्त जमिनीची विक्री करण्याची परवानगी देणे, यंत्रमाग सहकारी संस्थांना एकरकमी तडजोड (वन टाईम सेटलमेंट योजना) राबविणे, साध्या यंत्रमागाचा दर्जा वाढविण्यासाठी धोरण तयार करणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगम योजनेसाठी प्रस्ताव पाठविणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

वस्त्रोद्योग मंत्री श्री.शेख म्हणाले की, सहकारी सूतगिरण्यांनी सौरऊर्जेसाठी खासगी सहभाग घेण्याचा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. वीज दर व वीजबिलातील सवलतीसंदर्भात ऊर्जामंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. एकरकमी तडजोड योजनेसंदर्भात सकारात्मक विचार करण्यात येईल. तसेच कापूस खरेदीसाठी अनुदान तसेच अतिरिक्त जमिन विक्रीसंदर्भात सविस्तर अहवाल विभागाने सादर करण्याचे निर्देशही श्री.शेख यांनी यावेळी दिले.

वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री.यड्रावकर म्हणाले, सहकारी सूतगिरण्यांना बिनव्याजी कर्जासंदर्भात शासन सकारात्मक विचार करेल. तसेच प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी नेमलेल्या समितीत राज्यशासन व वस्त्रोद्योग आयुक्तालयाचे प्रतिनिधींचा समावेश असावा.

यावेळी वस्त्रोद्योग आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, रेशीम संचालक भाग्यश्री बानायत, वस्त्रोद्योग महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक रामचंद्र मराठे, ए.बी. चालुक्य, इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे चेअरमन सतीश कोष्टी, ए.डी. दिवटे, एस.ए. कदम, श्रीकांत हजारे, शिवाजी रेडेकर, रफिक खानापुरे, नारायण दुरुगडे, खासगी यंत्रमाग संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास सुर्यवंशी, विजय निमते आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभर टक्के फी माफीमुळे मुलींच्या तंत्रशिक्षणाला गती

‘लेक शिकली, प्रगती झाली’ ही केवळ एक म्हण नाही,...

जाहिरात माफियांच्या दबावापुढे नमले,होर्डींग्ज धोरण मागे घेतले

आपल्या जाहिरात व्यवसायावर परिणाम होईल म्हणून काही जाहिरात माफियांनी...

कात्रजच्या घाटात एसटी बस आणि ऑटो रिक्षा ची समोरासमोर धडक, रिक्षाचालक ठार

पुणे: पुण्यातील कात्रज घाट परिसरात गुरुवारी (दि. 23 एप्रिल...