मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. कोरोनातून बरं होऊन राज्यपाल नुकतेच परतले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे.
याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.ट्विटमध्ये अजित पवार यांनी म्हटले आहे की, “काल मी कोरोनाची चाचणी केली; ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईन. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि लक्षणं दिसल्यास तत्काळ आपली कोरोना चाचणी करून घ्यावी”.