पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काळे झेंडे दाखवीत त्यांच्या विरोधात आज शहर काँग्रेस ने जोरदार निदर्शने केली . यावेळी माजी गृहराज्यमंत्री,शहर अध्यक्ष रमेश बागवे यांच्या सह संगीता तिवारी, बाळासाहेब शिवरकर , सुधीर जानज्योत, अभय छाजेड ,संगीता देवकर, रजनी त्रिभुवन ,सदानंद शेट्टी ,राजेंद्र भुतडा, ज्योती परदेशी ,शेखर कपोते,रशीद खान,हाजी नदाफ, आयुब शेख,अजित दरेकर, मुक्तार शेख ,यासर बागवे ,रवी आरडे, लक्ष्मण आरडे ,आनंद छाजेड,प्रदीप परदेशी ,अरुण वाघमारे,निलेश बोराटे,नदीम मुजावर, राजू शिरसाठ,सुनील घाडगे ,सुरेश चव्हाण आदी असंख्य कार्यकर्ते या निदर्शने आंदोलनात सहभागी झाले होते .