पतंग तयार करण्याच्या कार्यशाळेत चिमुकले रममाण

Date:

पुणे :- गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या ‘जीजीआयएस अथ'(प्री प्रायमरी स्कुलने)मुलांसाठी पतंग तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. रहाटणी,पिंपरी चिंचवड,बावधन यासर्व ठिकाणी ही कार्यशाळा घेण्यात आली.

 

आपल्या हाताने तयार केलेला पतंग उंच आकाशात उडविण्याचा वेगळाच आनंद मिळणार असल्याने अतिशय उत्साहात मुलांनी व पालकांनी या आगळ्या वेगळया कार्यशाळेत सहभाग घेतला .यातूनच त्यांना कार्यानुभवाचे शिक्षण ही मिळावे याउदेशाने याचे आयोजन करण्यात आले होते.

 

कला शिक्षकांच्या मदतीने सहजसोप्या पद्धतीने कागदाचे पतंग बनविण्याचे तंत्र शिकवले.पतंग तयार करण्यासाठी काड्या जोडणे ,योग्यरीतीने पतंगाला सजविण्यासाठी आकार देणे हे सर्व करण्यात चिमुकले रममाण झालेली पाहायला मिळाली .

 

आपल्याला लाभलेली सणांची संस्कृती ही यावर मात करण्याची मोठी ताकद आहे. आज या सणाच्या निमित्ताने आपण सर्वजण माणुसकीच्या भावनेने एकत्र येतो. यातूनच मानवतेचा सकारात्मक संदेश जातो.आनंदासाठी, एकोप्यासाठी असे सण-उत्सव एकत्र साजरा करण्यावर आमचा भर असतो असे मत गोयल गंगा इंटरनैशनल स्कुलच्या संचालिका सोनू गुप्ता यांनी यावेळी व्यक्त केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

US सिनेटमध्ये इराण युद्धाविरोधात प्रस्ताव मंजूर; ट्रम्प यांना लष्करी कारवाई थांबवण्याचे आवाहन

सिनेटच्या ठरावावर ट्रम्प यांची टीका; होर्मुझमधील जहाजांची वर्दळ तिप्पट,...

बरसो रे ..धरण क्षेत्रात ..मेघा..मेघा ….

पुण्यात रात्रभर ‘टिप टिप बरसा’ ; धरणांतील पाणीसाठा वाढीची...

दगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळली

सह धर्मादाय आयुक्तांचा महत्त्वपूर्ण आदेश पुणे : कै. सौ. लक्ष्मीबाई...

देवेंद्र फडणविसांची तथाकथित दैवीशक्ती शेतकरी, महिला व तरुणांचे प्रश्न सोडवताना कुठे जाते?

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली नांदेडमध्ये काँग्रेसचा शेतकरी मेळावा...