पुणे- कॉंग्रेसचे लोहियानगर कासेवाडी येथील उमेदवार अविनाश बागवे ,रफिक शेख , नुरजहा शेख ,काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार जिल्लेहूमा खान यांच्या प्रचारार्थ अभिनेता रझा मुराद यांनी गुरुनानकनगर येथे सभा घेतली . रझा मुराद यांच्या सभेला येथे नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आणि त्यांच्या वक्तव्याला शायरीला प्रचंड उत्स्फुर्तेने दाद दिली . माजी गृहराज्यमंत्री शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , तसेच मोहन जोशी, रशीद शेख , मोहन जोशी , विठ्ठल थोरात , अरुण गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .