पुणे- पुण्याच्या कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आशावास्न येथे कॉंग्रेस कार्यकर्त्यांना महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा, युवक मंत्री व पुण्याचे संपर्क मंत्री सुनील केदार यांनी दिले. आज त्यांनी पुण्यात काँग्रेस भवन येथे पुणे शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड काँग्रेस कमिटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविक भाषणात शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘महाराष्ट्राचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा, युवक मंत्री व पुण्याचे संपर्क मंत्री सुनील केदार यांनी आज आढावा बैठक बोलविली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे पुणे शहरात पक्ष संघटना नक्कीच मजबूत होईल. त्यांचे कौशल्य आणि संघटनात्मक अनुभव येणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्षाला फायदेशिर ठरेल.’’
यानंतर सुनील केदार उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘‘काँग्रेस पक्षाने माझी पुण्याचा संपर्क मंत्री म्हणून नेमणूक केली आहे. माजी संपर्कमंत्री म्हणून नेमणूक झाल्यावर नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत्या. त्या पार पडल्यावर मार्च २०२० ला कोरोनाच्या महामारीला तोंड द्यावे लागले. संघटनात्मक काम करीत असताना अनेक अडचणींना व परिस्थितीला तोंड द्यावे लागते. निवडणुकांमध्ये पक्षाला यश, अपयशाच्या सामोरे जावे लागते. प्रत्येक कार्यकर्त्याने झाले गेले मागचे विसरून पक्ष संघटना मजबूत करण्याचा संकल्प केला पाहिजे. पक्षाने माझ्यासाठी काय केले याचा विचार न करता मी पक्ष बळकट करण्यासाठी काय करू शकतो याचा विचार केला पाहिजे. यापुढे प्रत्येक १५ दिवसांत जनता दरबार घेऊन जनतेचे प्रश्न सोडविण्याचा मी प्रयत्न करीन. तालुका व ब्लॉक निहाय बैठका घेऊन तळागाळापासून काँग्रेस पक्षाला मजबूत करून येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देणार. काँग्रेस पक्षाला गतवैभव पुन्हा प्राप्त करून देणार अशी मी आपणास सांगू इच्छितो.’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप, पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष सचिन साठे, दिप्ती चवधरी, कमल व्यवहारे, महेश ढमढेरे व इतर नेत्यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचाल नगरसेवक अविनाश बागवे यांनी केले तर आभार विशाल मलके यांनी मानले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. अभय छाजेड, महाराष्ट्र प्रदेश NSUI अध्यक्ष अमीर शेख, गोपाळ तिवारी, कैलास कदम, वीरेंद्र किराड, नीता रजपूत, रफिक शेख, लता राजगुरू, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, सुनिल शिंदे, सोनाली मारणे, भुषण रानभरे, बाळासाहेब अमराळे, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, सचिन आडेकर, मुख्तार शेख, सजी थॉमस, शिलार रतनगिरी, चैतन्य पुरंदरे, सौरभ अमराळे, परवेज तांबोळी, साहिल राऊत, आबा जगताप, विजय चौधरी, सग्रांम मोहोळ, पृथ्वीराज पाटील, नरेंद्र बनसोडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.