Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

सुबोध भावे आणि दिप्ती देवी पहिल्यांद्याच एकत्र

Date:

असं म्हणतात की, ‘लग्नाच्या गाठी या स्वर्गात बांधल्या जातात’ पण रुपेरी पडद्यावरच्या रेशीमगाठी जुळून यायला सुद्धा असाच योग जुळून यावा लागतो. एकमेकांना चांगले ओळखणाऱ्या कलाकारांना एकत्र काम करण्याची संधी मिळतेच असं नाही. अनेक वर्षे चांगली मैत्री असलेल्या अभिनेता सुबोध भावे आणि अभिनेत्री दिप्ती देवीच्या बाबतीतही असंच घडत होतं. एका नाटकाच्या आणि त्यानंतर एका मालिकेच्या निमित्ताने हे दोघं एकत्र काम करणार होते पण तो योग काही जुळून आला नाही. आता मात्र ‘कंडिशन्स अप्लाय– अटी लागू’ या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध व दिप्ती चा एकत्र काम करण्याचा योग जुळून आला आहे. येत्या ७ जुलैला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

‘आम्हाला एकत्र काम करायचे होते पण तशी संधीच मिळत नव्हती. आता ‘कंडिशन्स अप्लायच्या निमित्ताने एकत्र काम करण्याची आमची इच्छा पूर्ण झाली असून चित्रपटातील आमची केमेस्ट्रीही छान जुळून आली आहे’, असं हे दोघं सांगतात. डॉ.संदेश म्हात्रे निर्मित व गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘कंडिशन्स अप्लाय’ चित्रपटात सुबोध भावे, दिप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, अतिशा नाईक, डॉ. उत्कर्षा नाईक, विनीत शर्मा यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद लेखन संजय पवार यांचे आहेत. छायांकन कृष्णा सोरेन याचं असून संकलन निलेश गावंड यांचं आहे. संगीत अविनाश–विश्वजीत यांनी दिलं आहे. सचिन भोसले व अमोल साखरकर या चित्रपटाचे सहनिर्माते असून कार्यकारी निर्माते प्रसाद पांचाळ आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...