मुंबई, दि. 9 : सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या नवीन कार्यकारिणीचा सत्कार केला.
मंत्रालयात सहकार मंत्री यांच्या दालनात आज शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि “लोक माझे सांगाती…राजकीय आत्मकथा ” हे पुस्तक भेट देण्यात आले. विधिमंडळ वार्ताहर संघाचे नवनियुक्त अध्यक्ष मंदार पारकर, उपाध्यक्ष महेश पावसकर, कार्यवाह प्रमोद डोईफोडे, कोषाध्यक्ष नेहा पुरव, प्रवीण राऊत आणि कार्यकारिणी सदस्य हरिसिंग राजपुरोहित, सोनू श्रीवास्तव, मिलिंद लिमये यांचा सत्कार करून सहकार मंत्री श्री.पाटील यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.