महसूलमंत्री साहेब ,पुणेकर रसिकांचे ६९ लाख खाणाऱ्याना काही शिक्षा नाही काय ?

Date:

पुणे – पूर्वीचा कुख्यात जकात चोर बॉलीवूडच्या स्टार समवेत हसताना खिदळताना पुणेकर आणि महाराष्ट्र पाहतो आहेच . अशाच प्रकारे  ग्राहकांकडून अनेक ठिकाणी व्यापारी शासकीय कर वसूल करतात पण तो हडप करून स्वतःची गरिबी गडप करून मोठ्ठे होतात अशाच प्रकारे पुण्यातील सिने रसिकांना देखील गंडवण्याचे प्रकार कित्येक वर्षांपासून सुरु आहेत मात्र सरकार अशा गब्बरांना नेहमीच पाठीशी घालीत आल्याचे चित्र ही वारंवार दिसून आले आहे .

करमणूक कर माफ असताना शहरातील सहा बड्या मल्टिप्लेक्‍स थिएटरच्या मालकांनी ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा कर प्रेक्षकांकडून वसूल करून खिशात घातल्याचे  प्रकरण आता निर्णायक वळणावर आले आहे. या संदर्भातील फाइल तब्बल चार वर्षांनंतर महसूलमंत्र्यांच्या कोर्टात आली असून, येत्या काही दिवसांत त्यावर निर्णय होणे अपेक्षित आहे. महसूलमंत्री सरकारच्या बाजूने उभे राहणार की मल्टिप्लेक्‍स थिएटर मालकांच्या, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांना राज्य सरकारने काही कालावधीसाठी मध्यंतरी करमाफी जाहीर केली होती; मात्र त्या कालावधीत शहरातील सिटी प्राइड, ई-स्वेअर, आयनॉक्‍स, गोल्ड ॲडलॅब, मंगला व गोल्ड बिग सिनेमा या मल्टिप्लेक्‍स थिएटर्सच्या मालकांनी प्रेक्षकांकडून परस्पर हा कर वसूल केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर या मल्टिप्लेक्‍सने नेमका किती करमणूक कर गोळा केला, याची माहिती घेण्यासाठी थिएटर्सचे दैनंदिन तिकीट विक्री अहवाल जिल्हा प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आला.

तत्कालीन करमणूक कर अधिकाऱ्यांनी मल्टिप्लेक्‍सला वसुलीच्या नोटिसा बजावल्या. मल्टिप्लेक्‍समालकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांपर्यंत या नोटिशीला आव्हान दिले होते; मात्र या दोन्ही ठिकाणी त्यांचे अपील फेटाळण्यात आले. तसेच ही रक्कम न भरल्यास जप्तीपर्यंत कारवाई करण्याची नोटीस बजावली. या कारवाईवर मल्टिप्लेक्‍सच्या मालकांनी आघाडी सरकारच्या काळातील तत्कालीन महसूलमंत्र्यांकडून स्थगिती मिळविली होती.

दरम्यान, राज्यात भाजपचे सरकार आले. भाजप सरकारमधील तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे या केसची सुनावणी झाली. त्यांनीही फाइल निकालासाठी बंद केली. खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्याकडे खात्याची जबाबदारी आली. त्यांनी मल्टिप्लेक्‍सच्या केसवर पुन्हा नव्याने सुनावणी घेतली. आता ही केस निकालासाठी बंद केली आहे.

मल्टिप्लेक्‍स थिएटर्सच्या दैनंदिन तिकीट विक्री नोंदीची तपासणी करताना सिटी प्राइड- सुमारे २२ कोटी (कोथरुड व सातारा रस्ता), ई-स्वेअर- २१ कोटी ९२ लाख, आयनॉक्‍स-९ कोटी ९४ लाख, गोल्ड ॲडलॅब- सुमारे ७ कोटी, मंगला-६ कोटी ४२ लाख, गोल्ड बिग सिनेमा – ६४ लाख ७१ हजार असा एकूण ६८ कोटी ६५ लाख रुपयांचा महसूल मल्टिप्लेक्‍सचालकांनी परस्पर खिशात घातला असल्याचे निदर्शनास आले.

उत्पन्न वाढविण्यासाठी सरकार एकीकडे महसूल विभागाला कर वसुलीचे उद्दिष्ट देते, तर दुसऱ्या बाजूला हा कर वसूल करण्यावरील स्थगिती उठविण्यास विलंब करत आहे. या पार्श्‍वभूमीवर सहा मल्टिप्लेक्‍स थिएटर्सवरील कारवाईबाबत जिल्हा प्रशासन आणि विभागीय आयुक्तांनी राज्य सरकारला वारंवार स्मरणपत्र पाठवूनही गेल्या चार वर्षांपासून निर्णयाअभावी हा महसूल अडकून पडला आहे. आता तरी सरकार सर्वसामान्यांना न्याय देऊन हा महसूल सरकार जमा करणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.