पुणे- मोहरमनिमित्त शिया समाजबांधवांच्यावतीने इमामपाड्यापासून पंजांच्या मिरवणुकीस सुरुवात झाली .हि नवव्या मोहरमची मिरवणूक अली सोमजी रोड , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , मुदलियार रोड , पावर हाऊस , संत कबीर चौक , इस्लामपूरा , लक्ष्मी रोड , शरबतवाला चौक , , छत्रपती शिवाजी मार्केट , बाबाजान चौक , भोपळे चौक , कोहिनुर हॉटेल चौक , महात्मा गांधी रोडमार्गे गवळी वाडा येथून इमामपाडा येथे समाप्त करण्यात आली .
दहाव्या मोहरमची मिरवणूक इमामपाडा , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , नेहरू मेमोरियल हॉल , साधू वासवानी रोड , साधू वासवानी चौक मार्गे आगाखान बंगला पर्यंत काढण्यात आली . यावेळी पुणे चौपाटी येथे अली सोमजी फाऊंडेशनच्यावतीने शरबतवाटप करण्यात आले .