Industrialist

पुण्यातील कोपा मॉलमध्ये ‘इंडियन ओशियन (Indian Ocean)’ चा दमदार लाईव्ह शो; त्यानंतर विपुल गोयलची धमाल कॉमेडी

पुणे : पुणेकरांच्या मनोरंजनाला नवी झिंग देण्यासाठी कोपा मॉलमध्ये यंदाच्या आठवड्याअखेर दोन खास कार्यक्रमांची मेजवानी सजली आहे; ५ आणि ६ डिसेंबर रोजी सलग दोन संध्याकाळी संगीत व विनोदाचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. ५ डिसेंबर रोजी भारतीय फ्युजन रॉक संगीताला नवा आयाम देणाऱ्या प्रतिष्ठित ‘Indian Ocean’ बँडचा बहारील ओपन-एअर लाईव्ह परफॉर्मन्स टेरेसवर होणार आहे. पुणेकरांना भावपूर्ण सुरावटी आणि बँडची खास ध्वनीशैली यांचे मनमोहक मिश्रण एका वेगळ्या वातावरणात ऐकण्याची संधी मिळणार आहे. यानंतर, दुसऱ्या दिवशी ६ डिसेंबर रोजी कॉमेडी फेस्ट अंतर्गत लोकप्रिय स्टँड-अप कॉमेडियन - विपुल गोयल, प्रेक्षकांसाठी आपली खास निरीक्षणाधारित विनोदी शैली आणि टोकदार हजरजबाबीपणा घेऊन येणार आहेत. आजच्या शहरी जीवनशैलीशी जुळणारी, सहजसुंदर कथा आणि विनोद यांचे अनोखे सादरीकरण पुणेकरांना भरभरून हसवणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी नाममात्र शुल्क ठेवण्यात आले असून, अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी व्हावे, यासाठी आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. कोपा मॉलचे हे सलग दोन संध्याकाळीचे कार्यक्रमं पुणेकरांना संगीत आणि हास्याचा दुहेरी आनंद देणारे ठरतील. शहराच्या बदलत्या सांस्कृतिक धाटणीला अनुसरून, समुदायाला अधिक समृद्ध सामाजिक आणि सांस्कृतिक अनुभव देणे, हे मॉलचे उद्दिष्ट आहे. डिसेंबरच्या उत्सवी दिवसांत या मनोरंजनमय कार्यक्रमांमुळे पुण्याचे सांस्कृतिक कॅलेंडर अधिक रंगतदार होणार आहे! कार्यक्रम: 1.       Indian Ocean Live – ५ डिसेंबर २०२५ (सायं. ७ वाजता!) 2.       Comedy Fest with Vipul Goyal – ६ डिसेंबर २०२५ (सायं. ६.४५ वाजता!)

K रहेजा कॉर्पकडून पुण्या मुंबईतील 2,916 कोटी किंमतीची मालमत्ता अधिग्रहित करण्याची घोषणा

मुंबई: माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT (BSE: 543217 | NSE: MINDSPACE) (‘माइंडस्पेस REIT’) — भारतातील 4 प्रमुख कार्यालयीन बाजारपेठांमध्ये स्थित उच्च गुणवत्तेच्या ग्रेड A ऑफिस पोर्टफोलिओचा मालक — यांनी आज K रहेजा कॉर्पकडून सुमारे ₹2,916 कोटी किंमतीची तीन प्रीमियम सीबीडी (सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट) मालमत्ता अधिग्रहित करण्याची घोषणा केली. माइंडस्पेस बिझनेस पार्क्स REIT च्या मॅनेजरच्या संचालक मंडळाने ही खरेदी तसेच ₹1,820 कोटीपर्यंतच्या प्रेफरेंशियल युनिट इश्यूला, युनिटहोल्डर्सची आणि आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन राहून, मंजुरी दिली आहे. REIT नेखालीलअधिग्रहणांचीघोषणाकेलीआहे: १) प्रमाणप्रॉपर्टीजप्रायव्हेटलिमिटेड (“प्रमाण”)  ही कंपनी मुंबईतीलवर्ली या अत्यंत प्रतिष्ठित मायक्रो-मार्केटमधील अॅसेंट - वरली या नव्याने पूर्ण झालेल्या प्रीमियम कमर्शियल टॉवरमध्ये सुमारे 0.45 मिलियनचौ. फूट क्षेत्रफळाची मालमत्ता मालकीची आहे. याशिवाय, पुणेच्याकल्याणीनगर या वाढत्या मायक्रो-मार्केटमध्ये सुमारे 0.1 मिलियनचौ. फूट क्षेत्रफळाची एक ऑफिस इमारतही प्रमाणच्या मालकीची आहे. २) सनड्यूरिअलइस्टेटप्रायव्हेटलिमिटेड (Sundew Real Estate Private Limited – “सनड्यू RE”) ही कंपनी दी स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बीकेसीअॅनेक्स) येथे सुमारे 0.2 मिलियनचौ. फूट प्रीमियम ऑफिस स्पेसची मालकी राखते. ही मालमत्ता मुंबईच्यावित्तीयकेंद्रात — बीकेसीआणिबीकेसीअ‍ॅनेक्स — अत्यंत धोरणात्मक ठिकाणी असलेली ग्रेड ए ऑफिस इमारत आहे. या अधिग्रहणांमुळे मिळणारे एकूण सुमारे 0.8 मिलियन चौ. फूट प्रीमियम लीज़ेबल क्षेत्रफळ स्वतंत्र मूल्यांकनकर्त्यांनी सुमारे ₹3,106 कोटी इतके सकल मालमत्ता मूल्य (Gross Asset Value – GAV) ठरवले आहे. अधिग्रहणाची अंतिम किंमत सुमारे ₹2,916 कोटी असेल, जी दोन्ही स्वतंत्र मूल्यांकनांच्या सरासरीपेक्षा सुमारे 6.1% कमी (डिस्काउंट) आहे. हे अधिग्रहण पूर्ण झाल्यानंतर, माइंडस्पेस REIT चे एकूण पोर्टफोलिओ सुमारे 39 मिलियन चौ. फूट इतके होईल आणि भारतातील सर्वात प्रभावशाली व्यावसायिक कॉरिडॉरमध्ये त्याची उपस्थिती आणखी मजबूत होईल. प्रोफॉर्माआधारावरयाअधिग्रहणातूनखालीललाभअपेक्षितआहेत:●        NOI मध्येसुमारे 9% वाढ●        DPU मध्येसुमारे 1.7% वाढ (accretion)●        Front-office पोर्टफोलिओव्हॅल्यूचाहिस्सावाढूनसुमारे 7.9% पर्यंतजाणे●        मार्कीटेनंट्समुळेसततआणिस्थिरउत्पन्नाचीखात्री माइंडस्पेस REIT च्या या प्रीमियम प्रॉपर्टीज त्याच्या मुख्य ऑफिस पोर्टफोलिओला अधिक सक्षम बनवतात, तसेच महत्त्वाच्या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये त्यांची उपस्थिती वाढवतात. या अधिग्रहणामुळे कंपनीची दीर्घकालीन रणनीती — म्हणजेच भारतातील सर्वात गतिमान शहरी बाजारांमध्ये स्थिर, उत्पन्न देणाऱ्या मालमत्तांचे मजबूत पोर्टफोलिओ तयार करणे — आणखी वेग घेते. या ग्रेड ए+ प्रॉपर्टीजमध्ये मार्क टू मार्केटची चांगली संधी असून, मजबूत रेंटल वाढ आणि व्हॅल्यू-ऍड करण्याची क्षमता स्पष्ट दिसते. या व्यवहारानंतर माइंटस्पेस REIT चा ग्रॉस अॅसेट व्हॅल्यू (GAV) अंदाजे 41,020 कोटी रुपयां वरून वाढून सुमारे 44,126 कोटी रुपये होणार आहे. अधिग्रहणाबद्दलबोलतानामाइंडस्पेस REIT चेएमडीआणिसीईओश्री. रमेशनायरम्हणाले, “या प्रीमियम मालमत्ता माइंडस्पेस REIT च्या पोर्टफोलिओमध्ये समाविष्ट करणे म्हणजे मुंबईतील सर्वाधिक मागणी असलेल्या सीबीडी ऑफिस डिस्ट्रिक्टमध्ये आमची उपस्थिती आणखी मजबूत करण्याचा धोरणात्मक निर्णय आहे. या उच्च-गुणवत्तेच्या, संस्थात्मक मालमत्ता आहेत, ज्यांना मजबूत कॅशफ्लो आहे आणि वॉल स्ट्रीटमधील काही मोठे अँकर टेनंट्स येथे आहेत. या व्यवहारामुळे आमच्या पोर्टफोलिओचा आकार, स्थिरता आणि दीर्घकालीन वाढ अधिक बळकट होते. आमच्यासाठी सूत्र सोपे आहे — उत्तम ठिकाणी गुंतवणूक करा, उत्कृष्ट टेनंट्ससोबत काम करा आणि आमच्या युनिटहोल्डर्ससाठी टिकाऊ मूल्य निर्माण करा. हे अधिग्रहण आमच्या ‘लव्ह्ड वर्कस्पेस, मॅक्सिमायझिंग व्हॅल्यू’ या दृष्टीकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि भारताच्या ऑफिस रिअल इस्टेट क्षेत्रातील माइंडस्पेस REIT ची नेतृत्वस्थानी भूमिका आणखी मजबूत करते.” ट्रान्झॅक्शनहायलाइट्स : अॅसेट्सवरएकनजर : ●        एकूण लीझेबल क्षेत्रफळ अंदाजे 0.8 msf. ●        स्वतंत्र मूल्यांकनानुसार एकूण ग्रॉस व्हॅल्यू अॅसेट (GAV) सुमारे 3,106 कोटी रुपये. ●        मालमत्तांमध्ये वॉल स्ट्रीटवरील सर्वात मोठ्या दोन कंपन्यांसह अनेक मार्क्यू टेनंट्स. ●        निश्चित व्यापलेली जागा : अॅसेंट-वरळी : अंदाजे 86% (इमारत वर्ष 2025 मध्ये पूर्ण), दी स्क्वेअर अव्हेन्यू 98 (बीकेसी अॅनेक्स): 100%, ऑफिस बिल्डिंग (पुणे):...

मिशो लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री बुधवार 3 डिसेंबर पासून 

·         मिशोलिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 105  रुपये  ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 111  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.   ·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या...

रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि रजनी फाउंडेशनकडून आदिवासी समुदायासाठी धान्यदान उपक्रम

रिलायन्स जनरल इन्शुरन्सने रजनी फाउंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्रातील फुलोरेपाडा येथे आदिवासी समुदायासाठी धान्यदान उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. “एक छोटा सा दान, बनाए देश महान” या भावनेने...

सारडा ग्रुपकडून ‘र्‍हायनो – रॉक सॉलिड इन्स्युलेशन’चे अनावरण

भारतातील सर्वाधिक पर्यावरण-अनुकूल रॉक मिनरल वूल, शाश्वतता व नवोन्मेषात नवे मापदंड ·  भारतातील सर्वात पर्यावरण-अनुकूल (ग्रीनेस्ट) रॉक मिनरल वूल - ऱ्हायनो, भारतातील पहिल्या आणि सर्वात मोठ्या इलेक्ट्रिक स्मेल्टरमध्ये उत्पादित...

Popular