भाजपाच्या विजयी इतिहासाचा नक्की फायदा होईल- आ.चंद्रकांतदादा पाटील

Date:

पुणे – भारतीय जनता पक्षाला विजयाचा इतिहास आहे. त्यामुळे त्याचा आगामी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नक्कीच लाभ होईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. पुणे पदवीधर निवडणुकीच्या अनुषंगाने आज पुण्यातील शुभारंभ हॉल येथे आयोजित पश्र्चिम महाराष्ट्रातील भाजपा पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर खासदार गिरीश बापट, रणजितसिंह नाईक निंबाळकर, पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार जितेंद्र पवार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर माई ढोरे, महाराष्ट्र भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा उमाताई खापरे, माजी मंत्री सुभाष देशमुख, हर्षवर्धन पाटील, आ. मुक्ताताई टिळक, शिवेंद्रसिंहराजे भोसले, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, महेश लांडगे, जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर, भीमराव तापकीर, राजेश पांडे, माजी आमदार मेधाताई कुलकर्णी, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्यासह पक्षाचे पश्र्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आ. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “२००८ साली पुणे पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघातून मी आणि भगवानराव साळुंखे निवडून आलो. त्यानंतरच्या निवडणुकीत ही भारतीय जनता पक्षाने पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवला. तर २०१४ साली भाजपाचे सरकार राज्यात आणि केंद्रात आलं. यानंतर पश्र्चिम महाराष्ट्राचे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बालेकिल्ले ढासळू लागल्याने दोन्ही कॉंग्रेसला याची जाणीव झाली. त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीने लढण्याचा ते प्रयत्न करत आहेत. पण भाजपाला विजयचा इतिहास आहे. त्याचा लाभ आगामी निवडणुकीत पक्षाला नक्कीच होईल. त्यामुळे पुणे पदवीधर सह राज्यातील इतर जागांवर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पुण्याचे खासदार गिरीश बापट म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा जसा शिस्तप्रिय आहे. तसाच तो नेत्याची आज्ञा शिरोधार्य मानून काम करत असतो. त्यामुळे चंद्रकांतदादांच्या नेतृत्त्वात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार केवळ पुढेच नाही, तर इतरही मतदारसंघातून विजयी होतील. त्यामुळे बिहारप्रमाणे भाजपाची विजयी घोडदौड सुरूच राहिल.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले की, आजपर्यंत पदवीधर मतदारसंघाचे अनेक दिग्गजांनी नेतृत्व करताना पदवीधरांची चळवळ पुढे नेली. पाटील .पुणे पदवीधर हा मतदारसंघ अक्षरशः तळहाताच्या फोडासारखा जपला. मी देखील असेच काम करेन. अन् या मतदारसंघाकडे कुणीही वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत करणार नाही, असे काम करुन दाखवेन, असा विश्र्वास यावेळी व्यक्त केला.

दरम्यान या कार्यक्रमावेळी पुणे शहरातील विविध क्रीडा संघटनांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना आपला पाठिंबा जाहीर केला. तर सोलापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुजित थिटे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...