मुंबई- प्रभादेवी भागातील वीर सावरकर रोडवरील ब्यूमॉन्ड बिल्डिंगच्या 33 व्या मजल्यावर बुधवारी दुपारी दोन वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या आणि 3 वॉटर टँकर घटनास्थळी रवाना झाले शर्थीच्या प्रयत्नांनतर आगीवर नियंत्रण मिळवले असून सध्या कुलिंगचे काम सुरु आहे.जवळपास 90 जणांना इमारतीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेळीच इमारतीमध्ये असलेल्यांना बाहेर काढल्यामुळे जीवितहानी टळली.
33 व्या मजल्यापर्यंत आगीच्या बंबांचा पाण्याचा मारा कसा पोहचेल ही एक समस्या होती याच कारणामुळे आग विझवण्यास काही प्रमाणात विलंब झाल्याचे सांगण्यात येत आहे.ब्यूमाँड असे इमारतीचं नाव असून बडे उद्योगपती, कलाकार व अनेक सेलिब्रिटी या इमारतीत राहतात. इमारतीच्या उंचीमुळे या मजल्यावरील आग विझवण्यास अडथळे येत असल्याचं उपस्थितांनी सांगितलं. याच इमारतीमध्ये 26व्या मजल्यावर दीपिका पादुकोणचाही फ्लॅट असल्याचं सांगण्यात आलं आहे. ब्युमॉन्ड बिल्डिंगमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचे घर आणि ऑफिसही आहे. या इमारतीच्या 26 व्या मजल्यावर दीपिकाचा 4 बीएचके फ्लॅट आहे. याशिवाय बिजनेसमॅन्सची आॅफिसेस याच बिल्डिंगमध्ये आहेत.ही आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अद्याप मिळू शकली नाही.