पुणे- नवतेज युवा प्रतिष्ठान सातववाडी यांच्या वतीने विविध उत्सव कार्यक्रमांना फाटा देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.यंदा शिवजयंतीचा अनावश्यक खर्च टाळून पुलवामा येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यातील शाहिद वीर जवान नितीन राठोड रा. गोवर्धन नगर ता. लोणार जि.बुलढाणा व संजय राजपूत रा. मलकापूर जि.बुलढाणा यांच्या कुटुंबियांना नवतेज युवा प्रतिष्टान , सातववाडी चे अध्यक्ष अॅड.अवधूत चंद्रकांत बरडे व इतर कार्यकर्ते यांच्या हस्ते शिवजयंती उत्सवानिमित्त प्रत्येकी रु. 25000/- चा धनादेश देण्यात आला. सदर रक्कम ही प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी सभासद वर्गणीद्वारे जमा केली. तसेच नवतेज युवा प्रतिष्टान च्या वतीने गडकिल्ल्यांची स्वच्छता मोहीम ,अपघात ग्रस्तांना अडचणीच्या वेळी रक्तदान शिबीर , गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व अनाथ आश्रमातील मुलांना आर्थिक मदत कोणत्याही राजकीय पाठिंब्याविना सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहे .