Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

रणवीर सिंगने ट्वीटरद्वारे केले ‘भिकारी’चे टिजर पोस्टर लाँच

Date:

मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य निर्मित तसेच गणेश आचार्य  दिग्दर्शित ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा चित्रपट जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. गतवर्षी मोठ्या गाजवाजात या चित्रपटाचा मुहूर्त महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्या हस्ते झाला, आणि आज हिंदीचा सुपरस्टार रणवीर सिंग याने आपल्या सोशल साईटवर ‘भिकारी’ सिनेमाचे टीजर पोस्टर ट्वीट करत, सिनेमाच्या संपूर्ण टीमला भरपूर शुभेच्छा देखील दिल्या.
या सिनेमाचं टिजर पोस्टर पाहताचक्षणी मनात भरतं. छत्री तोंडावर घेऊन एक मनुष्य झोपला असल्याचे चित्र आपल्याला दिसून येते. सुटाबुटात असलेला हा मनुष्य मराठीचा सुपरस्टार स्वप्नील जोशी असावा असे वाटते, परंतु छत्रीत त्याचे तोंड झाकले असून, त्याच्या शेजारी भिकारीचं  वाडगं दिसत असल्यामुळे, या टिजर पोस्टरवरील मनुष्य स्वप्नीलच आहे का? आणि त्याची या सिनेमात नेमकी काय भूमिका आहे, असे अनेक प्रश्न पडतात. अशाप्रकारे आपल्याला नकळत संभ्रमात  टाकणा-या या  टिजर पोस्टरने, अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे.
स्वप्नीलदेखील या सिनेमाबाबत खूप उत्सुक आहे. आतापर्यतच्या भूमिकेहून अगदी वेगळी अशी भूमिका त्याची यात असल्यामुळे हा चॉकलेट बॉय ‘भिकारी’ सिनेमामध्ये नेमका काय करणार असेल, हे पाहणे कुतुहलाचे ठरणार आहे.
बॉलीवूडचे  आघाडीचे  नृत्यदिग्दर्शक म्हणून ख्याती असलेले गणेश आचार्य यांनी याआधी काही हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. मात्र, मराठीत ते पहिल्यांदाच ‘भिकारी’ या सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. तसेच गणेश आचार्य आणि शरद देवराम शेलार यांनी मी मराठा फिल्म प्रॉडक्शनची स्थापना करून चित्रपट निर्मितीमध्ये प्रथम पाऊल टाकले आहे. या सिनेमाची कथा, पटकथा, संवाद तसेच गीत गुरु ठाकूर यांचे असून, त्यांनी यात अभिनय देखील केला आहे. आई आणि मुलाच्या हळव्या नात्यावर आधारित असलेल्या या सिनेमात रुचा इनामदार, सयाजी शिंदे, मिलिंद शिंदे, कीर्ती आडारकर, सुनील पाल आणि प्रदीप काबरा अशी तगडी स्टारकास्टदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहे.
शिवाय तब्बल एक हजार कलाकारांचा सहभाग असलेले ‘गजानना’ हे भव्य गाणे देखील या सिनेमाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे. गणेश आचार्य यांनी कोरियोग्राफ केलेले हे गाणे बॉलीवूडच्या गाण्यांना लाजवेल अशा धाटणीचे असून, मराठी गाण्यांच्या चित्रीकरणात ते ‘सुपरसॉंग’ ठरणार असल्याचा निकष देखील लावला जात आहे.  छायाचित्रकार महेश लिमये यांच्या कॅमे-यातून ‘भिकारी’ सिनेमा साकार झाला असल्यामुळे चित्रीकरणात देखील तो समृध्द ठरला आहे.  या चित्रपटाचा आशय, बांधणी आणि निर्मितीमूल्य पाहता ‘स्वामी तिन्ही जगाचा… भिकारी’ हा सिनेमा २०१७ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या मराठी चित्रपटांमधला एक महत्वपूर्ण आणि बिगबजेट सिनेमा ठरणार, यात शंका नाही.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...