Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

छोट्या पडद्यावरील अक्षयाची मोठ्या पडद्यावर एंट्री

Date:

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये एक नवा ट्रेंड पहायला मिळतोय तो म्हणजे नव्या चेह्ऱ्यांचा. हे नवे चेहरे चित्रनगरीत आपली ओळख निर्माण करू पाहतायेत. नाटक, टीव्ही मालिकांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणाऱ्या या चेहऱ्यांना आता मोठ्या पडद्याचे वेध लागलेले दिसताहेत. अक्षया हिंदळकर हे त्यातलंच एक नाव. छोट्या पडद्यावरील ‘सरस्वती’ या मालिकेत झळकलेली अक्षया आता मोठ्या पडद्यावर आपल्याला दिसणार आहे. रॉकी या आगामी अ‍ॅक्शनपॅक्ड मराठी सिनेमात अक्षया आपल्याला नायिकेच्या रूपात दिसणार आहे. संजना असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून शांत, सोज्वळ संजनाच्या आयुष्यात घडणाऱ्या अकल्पित घटना नेमकं काय वळण घेणार याची रोमांचकारी कथा म्हणजे रॉकी सिनेमा.

‘सेवेन सीज्’ व ‘ड्रीम विव्हर’ प्रोडक्शन्सच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अदनान शेख करीत आहेत. आपल्याला मिळालेल्या संधीबद्दल बोलताना अक्षया सांगते की, दिग्गज कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे माझ्यासाठी भाग्याचं आहे. प्रत्येकाकडून बरंच काही शिकायला मिळतंय. रोमान्स, फॅमिली ड्रामा व अॅक्शन याचे कॉम्बिनेशन असलेल्या या सिनेमात प्रदीप वेलणकर, अशोक शिंदे, यतीन कार्येकर, गणेश यादव, क्रांती रेडकर, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत, अक्षया हिंदळकर संदीप साळवे, हिंदीतील अभिनेते राहुल देव हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मनेश देसाई, नितीन शिलकर, प्रशांत त्रिपाठी, हिमांशू अशर आहेत. चित्रपटाचे कथालेखन अदनान शेख यांचे तर संवाद आदित्य हळबे यांचे आहेत. पटकथा अदनान शेख यांची आहे. छायांकन फारुख खान तर संगीत समीर साप्तीस्कर, वसीम सदानी व इम्रान सदानी यांचे आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...