मुंबई – मॉडेल आणि अभिनेत्री कृतिका चौधरीचा संशयास्पद मृत्यू झाला असून, तिचा मृतदेह अंधेरी येथील राहत्या घरी आढळला आहे. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी पुढील तपास सुरू केला.कृतिका चौधरीने ‘परिचय’ या मालिकेत आणि ‘रज्जो’ या चित्रपटामध्ये काम केले होते. सोमवारी संध्याकाळी अंधेरीत राहत असलेल्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजारी राहणाऱ्यांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दरवाजा उघडल्यावर पोलिसांना तिचा मृतदेह आढळला.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून तीन ते चार दिवसांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. कृतिकाची हत्या झाली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनानंतरच कृतिकाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.
– कृतिका अंधेरीच्या चार बंगलो परिसरात भैरवनाथ SRA बिल्डिंगमध्ये राहत होती.
– घटनेच्या रात्री तरुणीबरोबर आणखी कोणीतरी होते असे संकेत घटनास्थळी मिळालेल्या वस्तूवरुन मिळत आहेत.
– पोलिस खोलीत आले त्यावेळी टीव्ही आणि एसी सुरू होता. मृतदेह लवकर सडू नये यासाठी मारेकऱ्याने एसी सुरू ठेवला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
– शेजाऱ्यांच्या मते तरुणी चित्रपटांत काम करायची आणि ते तिला परि नावाने ओळखायचे. तिच्याकडे नेहमी लोकांची वर्दळ सुरू असायची.
– कृतिकाने कंगना रनोटबरोबर ‘रज्जो’ चित्रपटात काम केले होते.
– क्राइम सिरियल ‘सावधान इंडिया’सह बालाजी प्रोडक्शनच्या अनेक सिरियलमध्ये ती झळकली होती..