पुणे- पुणे- लष्कर परिसरातील महात्मा गांधी रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी आज भारत बंद मध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला .येथे आज दुपारी १२ वाजता कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी ने मोर्चाचे आयोजन केले होते . कॉंग्रेस चे शहराध्यक्ष आणि माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,महापालिकेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष चेतन तुपे पाटील अखिल भारतीय काँग्रेसच्या चिटणीस श्रीमती सोनल पटेल,तसेच आ. दीप्ती चवधरी,मोहन जोशी ,उल्हास पवार, कमल व्यवहारे,आबा बागुल ,म वि .अकोलकर ,अजित दरेकर, विरेंद्र किराड, वाल्मिकी जगताप , रवींद्र माळवदकर,संगीता तिवारी ,नीता रजपूत ,आदी कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले . मोर्चा सुरु होताच काही क्षणात येथे येऊन खासदार सुप्रिया सुळे देखील मोर्चात सहभागी झाल्या .पहा आणि ऐका यावेळी या तिघांनी काय म्हटले आहे ….
आम्ही लोकांसाठी रस्त्यावर …कॉंग्रेस -राष्ट्रवादी (व्हिडीओ)
Date: