पुणे- ‘बंद’ ..म्हटला ..कि प्रथम लोकांची नजर लक्ष्मी रस्त्यावर वळते ..या रस्त्यावरील व्यापारी बंद पाळतात कि नाही याबाबत सर्वांना नसली तरी अनेकांना उत्सुकता असते . माध्यमे देखील लक्ष्मी रस्त्याचे चित्रीकरण ,छायाचित्रे घेतल्या शिवाय राहवत नाही . आज भारत बंद ..पण लक्ष्मी रस्त्यावरील व्यापाऱ्यांची दुकाने तर दर सोमवारी बंदच असतात .मग तिथे का जायचे ? असा प्रश्न माध्यमांच्या मनात असतानाच .. काही नेते घोडागाडीने फिरून लक्ष्मी रस्त्यावर बंदचे आवाहन करण्यास निघाल्याचे समजले . आणि मग आम्ही पोहोचलो .. घोडागाडी वर नेते होतेच अर्थात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी चे होते …कॉंग्रेसच्या ‘बंडखोर’ मानल्या जाणाऱ्या सव्यंघोषित नेत्यांच्या अशा प्रचारगिरीत निष्ठावंत माजी आमदारांनी उपस्थिती लावली हे विशेष . .पण उशिरापर्यंत बहुधा कोणाच्या लक्षात आले नसावे ..सोमवार .आज येथे विकली ऑफ असतो …
यानंतर थोड्या वेळात पहा .. लष्कर परिसरातील म. गांधी रस्त्यावरील ..इंधन दरवाढी विरोधातील बंद आणि आंदोलन ..
लक्ष्मीरस्त्याचा विकली ऑफ अन नेत्यांनी घोडागाडीवरून केले बंद चे आवाहन (व्हिडीओ)
Date: