Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे सर्व शाखांमध्ये ग्राहकांना सहभागी करणाऱ्या उपक्रमांचे आयोजन

Date:

 

मुंबई: आर्थिक साक्षरता सप्ताहानिमित्त (जून 5 – 9, 2017) आर्थिक समावेशकतेला चालना देण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे 1895 शाखांमध्ये, ग्राहकांना सहभागी करून घेणारे अनेक उपक्रम आयोजित करण्यात आले. हा उपक्रम नाशिक, पुणे, सातारा, ठाणे, औरंगाबाद, जालना व पालघर येथील बँकेच्या सात आर्थिक साक्षरता केंद्रांमध्येही (एफएलसी) राबवण्यात आला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने निश्चित केलेल्या नो युवर कस्टमर (केवायसी), क्रेडिटविषयी शिस्त पाळणे, तक्रार निवारण व डिजिटल होणे (यूपीआय व *99# यावर प्रामुख्याने भर देऊन) या चार संकल्पना या अभियानाच्या केंद्रस्थानी होत्या. रिझर्व्ह बँक, नाबार्डचे अधिकारी व लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर्स यांच्या उपस्थितीत आठवड्यातील सर्व पाच दिवशी आर्थिक साक्षरता शिबिरे घेण्यात आली. अंदाजे 2600 लोकांपर्यंत पोहोचत एकूण 52 शिबिरे झाली. वरील संकल्पनांबरोबरच, बँक ऑफ महाराष्ट्रने मुद्रा कर्जे व कार्डे, स्टँड अप इंडिया योजना, सामाजिक सुरक्षा योजना, आधार व मोबाइल लिंकिंग आणि अन्य आर्थिक समावेशकता कार्यक्रमांवरही भर दिला. राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य जण यामध्ये सहभागी झाले होते. सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. या वेळी बोलताना, बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभाकर मराठे यांनी सांगितले, “आर्थिक समावेशकतेला चालना देणे हा दीर्घ प्रयत्न आहे आणि त्यासाठी वर्षभर काम करावे लागणार आहे. टिअर III/टिअर IV शहरांत लक्षणीय कार्य करणारी बँक म्हणून आम्ही याचे महत्त्व पुरेपूर जाणतो. आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा करण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या उपक्रमामुळे बँकिंग सेवा नसलेल्या लोकांना शिक्षित करून व अधिकाधिक लोकांना औपचारिक बँकिंग व्यवस्थेत समाविष्ट करून आर्थिक समावेशकता साधण्याची आवश्यकताही अधोरेखित होणार आहे.” जूनच्या सुरुवातीला, बँक ऑफ महाराष्ट्रने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 135व्या स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीचे (एसएलबीसी) समन्वयन केले. त्यामध्ये बँकिंग सुविधा मिळत नसलेल्या देशातील विविध भागांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व राज्यस्तरीय बँकांना प्रेरित करण्यात आले. बँकेने इंग्रजी, हिंदी व मराठी या भाषांमध्ये आपल्या सर्व शाखांमध्ये, एटीएममध्ये व वेबसाइटवर रिझर्व्ह बँकेचे संदेश प्रसिद्ध केले आहेत. तसेच, बँकेने आर्थिक साक्षरतेचे विविध पैलू असलेले पोस्टर, फ्लायर्स व तक्तेही लावले आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...